Posts

Showing posts from July, 2020

जातक क्र. 12

Image
नाव जन्म दिनांक : 21/12/1975 जन्म वेळ सकाळी : 2.20  जन्मठिकाण : कोल्हापूर समस्या  1. जमिनी संबंधी फसवणूक झालेली आहे, पैसे अडकलेले आहेत. मार्गदर्शन  १. पत्रिकेमध्ये धन स्थानाचा स्वामि मंगळ हा अष्टमात बसलेला आहे. त्यामुळे धनाची हानी संभवते. तसेच धन स्थानामध्ये नेपचून आहे. नेपचून हा फसवणूक करणारा ग्रह आह्गे. कर्म स्थानामध्ये शनी आणि चंद्र युती आहे. या युतीला विषयोग असे म्हणतात. हि युती ज्या स्थानामध्ये असते त्या त्या स्थानाच्या कारकत्वाप्रमाणे माणसे फसवणूक करणारी भेटतात. हि युती तुमच्या कर्म स्थानात असल्यामुळे तुम्ही करीत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा जे व्यवसाय करणार त्यामध्ये फसवणूक करणारे माणसे भेटणार.     २. सप्तम स्तःचा स्वामि मंगळ असून तो अष्टमात बसलेला आहे आणि सप्तमात केतू आहे. तसेच धन स्थान सुद्धा मंगळाच्या अधिपत्याखाली येते. मंगळ हा भूमीचा कारक ग्रह आहे. सप्तमातील केतू मुळे केतू मंगळ हा अंगारक योग निर्माण झाला आहे त्यामुळे तुमचे धन स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान हे बाधित झालेले आहे. मंगळ हा भूमीचा कारक ग्रह असल्यामुळे आणि अंगारक योगामुळे बाधित झाल्...

जातक क्र. 11

Image
नाव : सांगण्यास परवानगी नाही जन्मतारीख : 9.09.1982 जन्मवेळ : 02.10 दुपारी जन्मठिकाण : पुणे जातक : स्त्री समस्या 1. पती पत्नीचे पटत नाही 2. संशय घेतला जातो 3. आर्थिक अडचणी 4. मुलगा ऐकत नाही मार्गदर्शन 1. तुमच्या सप्तम् स्थानात उच्चीचा राहू आहे आणि तुम्हला नोव्हेंबर 2019 पर्यंत राहू ची महादशा चालू होती, राहू हा गैरसमज पसरवणारा ग्रह आहे, राहू हा अंतर्जतीय विवाहासाठी चांगला ग्रह मानला जातो, पण सप्तम् स्थानात राहू असणाऱ्या जातकाला वैवाहिक सुख मिळत नाही, आणि त्यात राहू महादशा म्हणजे त्रासाचा कळसच. आता जरी महादशा संपली असली तरी मूळ कुंडली प्रमाणे तो त्याच स्थानात असल्याने आणि सध्या गोचारीचा राहू मिथुनेतच असल्याने अजून काही दिवस तुम्हाला त्रास सहन करावाच लागेल. राहू बुध ग्रहण योग शांती करून घ्यावी.  2. आता तुमची गुरुची महादशा चालू झालेली आहे, गुरू तुमच्या लग्न आणि चतुर्थ स्थानाचा स्वामी असून स्वतः गुरू हा लाभात बसलेला आहे, गुरू लाभात असल्याने आणि आता गुरुची महादशा असल्याने काही गोष्टींचे लाभ तुम्हाला मिळायला हवेत पण लग्न स्थानात केतू असल्याने केतू गुरू चांडाळ योग निर्माण झालेला आहे, त्याच ...

जातक क्र. 10

Image
नाव:- सांगण्यास परवानगी नाही जन्मतारीख:- 22.06.1986 जन्मवेळ:- 9.59 सकाळी जन्मठिकाण:- अमरावती समस्या 1. मानसिक त्रास 2. पोटाचा आजार पण diagnos होत नाही 3. कर्ज झाले आहे 4. आर्थिक विवंचना 5. एकूण अडचणी दूर होण्यासाठी उपाय मार्गदर्शन 1. पत्रिकेत 2 राज योग आहेत, पत्रिका चांगली आहे,  2. अष्टम स्थानाचा स्वामी गुरू हा त्या स्थानाचा व्ययात बसलेला आहे,त्या मुळे लहान सहान आजारपण होतील, पण कुठलाही  मोठा आजार दिसत नाही 3. पराक्रमांत केतू असल्याने ह्यांचा विश्वास डळमळीत होतो, आणि अनामिक भीती वाटत राहते, तसेच वृश्चिक राशीचा शनी मूळेही सतत मानसिक विचार करण्याची वृत्ती वाढलेली आहे,  4. नवमांश कुंडलीत मात्र रवी मंगळ पितृदोष अष्टम स्थानात आहे त्यामुळे अष्टम स्थान बिघडले आहे, त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होत आहे, आणि जास्त आजारी असल्यासारखं वाटत आहे. कारण असा कुठलाही ग्रह सक्रिय दिसत नाही जो पोटाचे विकार देतो, मानसिक समस्येमुळे हे होत आहे,  5. आता सध्या चंद्राची महादशा चालू असून ती 2025 पर्यंत आहे, चंद्राची रास ही व्ययस्थानात आहे, त्यामुळे हे स्थान सक्रिय आहे, ह्या स्थानावरून कुठल्याही...

जातक क्र. ९

Image
नाव:- सांगण्यास परवानगी नाही जन्म तारीख:- 25.06.1979 जन्मवेळ:- 6 सकाळी जन्मठिकाण:- बसवकल्याण (कर्नाटक) समस्या 1) Let me know in Which Field I will Succeed.? ln which location ? 2) Which Field will suites me. 3) Which Business shall I do ? 4 ) I am looking forward for Domestic Gas Agency. By my wife name will I be Succesful in This Business ? 5) If not wht shall I do ? 6) How will be my Financial Status in Future life.  7) Will I earn as I am wanting? Guruji Pls as I have frwdd my Kundali Details pls go Trough it and Give me exact way and proper solutions to Achieve money and Big success. As I have frwdd my family details. Go through it. Is anyone form them are trying to spoil me with Financial and my career. Because  of what I am Struggling with Financial. मार्गदर्शन १.पत्रिकेमध्ये पराक्रम स्थानात शनी राहू श्रापित योग बनलेला आहे. ज्यावेळी घराण्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा अपमृत्यू होतो त्यावेळी शापित योग होत असतो. घराण्यामध्ये असे काही झाले असल्यास त्याचा शोध घेणे. शापित योगामु...

श्रावण प्रभावी तोडगे आणि मंत्र साधना...

Image
श्रावण प्रभावी तोडगे आणि मंत्र साधना... लेखक:- अॅड.अंकुश सू. नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.२९.०७.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रांनो नाथ संप्रदायाने आपल्याला खूप काही दिलेले आहे. प्रसिद्ध शाबरी विद्या ही नाथ संप्रदायातूनच उदयाला आली. त्यातील काही मंत्र हे किलीत केलेले आहेत ज्यांना मुक्त करून त्यांची सिद्धी करावी लागते पण, आताही काही मंत्र असे आहेत जे स्वयंसिद्ध असून त्यांचा एक विशिष्ट संख्येने जाप केला असता ते फळ द्यायला सुरुवात करतात. हे सर्व मंत्र मी सुर्यग्रहणाच्या वेळी पोस्ट केलेले होते, त्यावेळी त्यांचे अनुष्ठान करून बऱ्याच लोकांनी अनुभव घेतला. परंतु ज्या लोकांना त्यावेळी ते सिद्ध करता आलेले नाहीत, त्यांनी ह्या पवित्र म्हणजेच श्रावण महिन्यात त्या मंत्रांची सिद्धी करायला घेतली तरी चालणार आहे. हे सर्व मंत्र मला माझ्या सद्गुरूंकडून प्राप्त झालेले होते. त्यांच्या आदेशाने मी ते तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे. सर्वांचे सद्गुरू शरीराने जरी वेगवेगळे असले तरी गुरुतत्व हे एकच आहे त्यामुळे कुठलीही शंका न घेता ह्या श्रावण ...

अंतर्मनाची शक्ती भाग ४

Image
अंतर्मनाची शक्ती भाग ४ हायर काँशीयस लेखक:- अॅड.अंकुश नवघरे., (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- ०८.०२.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रानो आज मी तुमच्यासाठी एक खूप वेगळा विषय घेऊन आलोय. हायर काँशीयस म्हणजे अतिउच्च भावनिक पातळी. प्रत्येक माणसाचे जीवन हे भावनांवर आधारलेले आहे. द्वेषाची भावना, प्रेमाची भावना, अशा कित्येक प्रकारच्या भावनांनी माणूस घेरलेला असतो. ह्या भावनाच माणसाला चांगली वाईट कृत्य करायला भाग पाडत असतात. काही माणसे आपल्या भावनांवर नियंत्रण करू शकतात तर काही, नाही करू शकत, जे नाही करू शकत त्यांना भावनिक किंवा इमोशनल असे म्हणतात, आणि जे नियंत्रित करू शकतात त्यांना स्थितप्रज्ञ असे म्हणतात. ही भावना साधी गोष्ट नाही, ह्या भावनेला कित्येक पातळ्या असतात, त्या पातळ्यांवरून माणसाची किंमत ठरत असते. त्यातच जी एक भावनेची पातळी येते तिला इंग्रजी मध्ये हायर काँसियस किंवा अतिउच्च भावनिक पातळी असे म्हणतात. हायर म्हणजे अतिउच्च. अतिउच्च भावनिक पातळी ही एक अवस्था आहे, ह्या अवस्थेत तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा काहीतरी जास्त प्राप्त होत...

अंतर्मनाची शक्ती भाग ३

Image
अंतर्मनाची शक्ती भाग ३ लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) पुनः प्रकाशन:- १९.१२.२०१९ ©Ankush S. Navghare ®२०१९ (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रांनो मी काही दिवसांपूर्वी मी रिंगटोन एक ट्रिगर हा लेख लिहिला होता. त्यात माझ्या ह्याच लेखाचा उल्लेख मी केला होता. काही लोकांनी हा लेख वाचायला मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती म्हणून वाचकांसाठी हा पोस्ट करत आहे. ह्या पोस्ट च्या माध्यमातून मला कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे नाही. ह्या लेखामध्ये मी, मला आलेले काही परानॉर्मल अनुभव शेयर करत आहे, ते अनुभव माझे भास पण असतील आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. ट्रिगर म्हणजे एक कळ जी मानवनिर्मित असू शकते किंवा प्रभावी विचारांनी निर्माण झालेली असू शकते. आपल्या जीवनात आपण खूप प्रकारचे ट्रिगर बनवत असतो, जसे सकाळी लवकर उठण्यासाठी आदल्यादिवशी रात्री झोपताना मला लवकर जाग येऊ दे असे मनाला सूचना करणे, हे एक ट्रिगर आहे, काही लोकांना सकाळी चहा, बिडी घेतल्याशिवाय टॉयले...

अंतर्मनाची शक्ती भाग २

Image
अंतर्मनाची शक्ती भाग २ रा लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर) पुनः प्रकाशन:- दि.१६.१०.२०१९ ©Ankush S. Navghare ®२०१९ (ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे... Telekinesis हा विषय सर्वांच्या परिचयाचा असेलच. Telekinesis ही अशी एक शक्ती आहे जी निसर्गाने काही लोकांना जन्मतःच दिलेली आहे तर काही लोक ती प्रयत्नाने मिळवू शकतात. Telekinesis म्हणजे मनाची एक अशी शक्ती जिच्या साहाय्याने आपण एखाद्या गोष्टीचे हाताचा वापर न करता चलन करू शकतो. साधारणतः Kinesis चे एकूण १८ प्रकार आहेत, त्यात टेलीकायनेसीस, बायोकायनेसीस, ऐरोकायनेसीस असे प्रकार येतात. कायनेसीस चा विषय निघाला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते काही सुपरहिट सिनेमे ते म्हणजे मॅट्रिक्स आणि एक्स-मेन, ह्या सिनेमांतील काही नायकांमध्ये अशा काही अनैसर्गगिक शक्ती आहेत की त्याच्या साहाय्याने ते अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी ह्या पंच महाभूतांवर  कंट्रोल करून त्यांना पाहिजे ते करू शकतात किंवा घडवून आणू शकतात. अशा प्रकारच्या चित्रपटांचा मानवी जीवनावर खूप खोल परिणाम होत असतो. ते पाहता पाहता आपण इतके गुंग होऊन जा...

अंतर्मनाची शक्ती भाग १

Image
अंतर्मनाची शक्ती... भाग १  लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) पुनः प्रकाशन:- दि.०५.०६.२०१९ ©Ankush S. Navghare ®२०१९ (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या अंतर्मनाची शक्ती जगवण्याचा आणि आपले तेजोवलाय मजबूत करण्याचा एक छोटासा प्रयोग सांगणार आहे, ह्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचा ऑरा मजबूत करून नकारात्मक शक्तींपासून निश्चितच स्वतःचे रक्षण करू शकता. नकारात्मक शक्ती म्हणजे भूत प्रेत हेच असतात असे काहीच नाही. नकारात्मक शक्ती ह्या कुठल्याही असू शकतात जसे एखाद्याने अतिशय रागाने तुमच्या बद्दल काढलेले उद्गार हेही नकारात्मक शक्तीचे रूप घेऊ शकतात त्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकते. दरवेळी अध्यात्माचा विषय आला की लोक त्याला अंधश्रद्धेच लेबल लावतात परंतु काही गोष्टी काही प्रमाणात विज्ञानानेही मान्य केल्या आहेत तसेच नकारात्मक गोष्टींचे अस्तित्व मानले आहे फरक इतकाच की देव धर्म मानणारे लोक त्याला भूत प्रेत हे नाव देतात आणि ते न मानणारे लोक त्याला नकारात्मक ऊर्जा असे म्हणतात. तीच नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून घालवण्यासाठी मी नेहमीच...

अनाकलनीय...

Image
ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक संकेत... भाग ४ अनाकलनीय... लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.१२.०७.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) .....नमस्कार मित्रांनो कधी कधी काही जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करताना काही अगम्य अशा गोष्टी बाहेर येतात, पत्रिकेत सर्वकाही ठीक ठाक असते आणि समस्या काहीतरी वेगळीच असते, हे असे का होते त्याचे उत्तर माझ्याकडेही नाहीय, मीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की ज्योतिषांनी सर्व प्रकारच्या अनुभवांतून जायला तयार असले पाहिजे. कारण कोण जातक तुमच्यासमोर काय ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.(अंकुश नवघरे)      काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण १५ दिवसांपूर्वी रात्री एक अशी काही घटना घडली की त्यानंतर पूर्ण ...

ह्याला बोलतात अनुभव...

Image
ह्याला बोलतात अनुभव.... लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.०१.०७.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी पारद शिवलिंगावर पारदेश्वर नावाचा एक लेख टाकला होता. त्या लेखात मी पारद शिवलिंगाची स्थापना घरात केल्याने काय फायदा होतो त्या संबंधी माहिती टाकली होती. पारद शिवलिंग हे साक्षात भगवान शंकरांचे दुसरे रूप किंवा आत्मलिंग मानले जाते, त्याची सेवा केल्याने प्रत्यक्षात महादेवाची पूजा केल्याचे पुण्य फल प्राप्त होत असते. जेव्हा कधी कोणावर काही गंडांतर येते, दुर्धर आजारपण येते, मृत्यूयोग येतो त्यावेळी भगवान शिव शंकरांच्या महामृत्युंजय मंत्राने जाप आणि अभिषेक केला जातो, हे करण्याने मृत्यू, गंडांतर टळून माणसाचा जीव वाचतो, असे कित्येक अनुभव कित्येकांना आलेले आहेत. परंतु ते शुद्ध आणि व्यवस्थित सिद्ध केलेले असेल तरच असे अनुभव येऊ शकतात. तर पारद शिवलिंगाची स्थापना घरात केल्याने किंवा नुसतं तुमच्या नावावर संकल्प करून सिद्ध केल्यानेही तुमच्यावर आलेले गंडांतर टळू शकते ह्याचा ग्रहणाच्याच दिवशी आलेला हा ...

पारदेश्वर...

Image
ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक संकेत... भाग ३ पारदेश्वर... लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.१६.०६.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)      नमस्कार मित्रांनो कधी कधी काही जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करताना काही अगम्य अशा गोष्टी बाहेर येतात, पत्रिकेत सर्वकाही ठीक ठाक असते आणि समस्या काहीतरी वेगळीच असते, हे असे का होते त्याचे उत्तर माझ्याकडेही नाहीय, मीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की ज्योतिषांनी सर्व प्रकारच्या अनुभवांतून जायला तयार असले पाहिजे. कारण कोण जातक तुमच्यासमोर काय ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.(अंकुश नवघरे)       तो अनुभव आठवला तरी काळजात चरर होत. कोणावरही अशी वेळ येऊ नये जी त्या कुटुंबावर ...

जातक क्र. ७

Image
जातकाचे नाव:- सांगण्यास परवानगी नाही जन्मतारीख:- १०.०७.१९७२ जन्मवेळ:- ०५.१५ सकाळी जन्मठिकाण:- मुंबई सेंट्रल प्रश्न:-  १. आम्ही घर renovation केले आणि प्रॉब्लेम सुरु झाले मिस्टराना कंबर दुखी सुरु झाली, आणि व्यवसाय बंद झाला, २. कस्टम कुरिअर  लाईन्स घेतलं भाड्याने आणि व्यवसायावर परिणाम झाला ३. Business डेव्हलोपमेंट आहे का? मार्गदर्शन 1. ह्यांच्या पत्रिकेत बुध महादशेत शुक्र अंतर्दशा चालू आहे, शुक्र हा ह्यांच्या व्ययस्थानाचा स्वामी असून तो स्वतःच त्याच स्थानात बसल्यामुळे ह्यांना व्ययस्थानाची अंतर्दशा चालू आहे, ही अंतर्दशा जानेवारी 2020 ला चालू झाली असून ती ऑक्टोम्बर 2022 पर्यंत आहे. त्यामुळे ह्यांचे व्ययस्थान आता सक्रिय आहे, आणि व्यय म्हणजे नाश, त्यामुळे आताच्या घडीला हे सर्व होत आहे.  2. त्याच प्रमाणे बुधाची महादशा ही ह्यांना ऑगस्ट 2016 पासून चालू आहे, आणि बुध हा त्यांच्या पत्रिकेत धनस्थानात असून तिथे कर्क रास म्हणजे बुधाची शत्रू रास आणि केतू असल्याने केतू बुध ग्रहण योग निर्माण झालेला आहे. ह्याच स्थानावरून आपले घराचे सुख इत्यादी पाहिले जाते.  3. ह्या महादश...