जातक क्र. 12
नाव
जन्म दिनांक : 21/12/1975
जन्म वेळ सकाळी : 2.20
जन्मठिकाण : कोल्हापूर
समस्या
1. जमिनी संबंधी फसवणूक झालेली आहे, पैसे अडकलेले आहेत.
मार्गदर्शन
१. पत्रिकेमध्ये धन स्थानाचा स्वामि मंगळ हा अष्टमात बसलेला आहे. त्यामुळे धनाची हानी संभवते. तसेच धन स्थानामध्ये नेपचून आहे. नेपचून हा फसवणूक करणारा ग्रह आह्गे. कर्म स्थानामध्ये शनी आणि चंद्र युती आहे. या युतीला विषयोग असे म्हणतात. हि युती ज्या स्थानामध्ये असते त्या त्या स्थानाच्या कारकत्वाप्रमाणे माणसे फसवणूक करणारी भेटतात. हि युती तुमच्या कर्म स्थानात असल्यामुळे तुम्ही करीत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा जे व्यवसाय करणार त्यामध्ये फसवणूक करणारे माणसे भेटणार.
२. सप्तम स्तःचा स्वामि मंगळ असून तो अष्टमात बसलेला आहे आणि सप्तमात केतू आहे. तसेच धन स्थान सुद्धा मंगळाच्या अधिपत्याखाली येते. मंगळ हा भूमीचा कारक ग्रह आहे. सप्तमातील केतू मुळे केतू मंगळ हा अंगारक योग निर्माण झाला आहे त्यामुळे तुमचे धन स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान हे बाधित झालेले आहे. मंगळ हा भूमीचा कारक ग्रह असल्यामुळे आणि अंगारक योगामुळे बाधित झाल्यामुळे तुमची घर संबंधात फसवणूक झाली आहे. कारण याचा संबंध धन स्थानाशी म्हणजेच धनाशी येतो, सप्तम स्थानाशी म्हणजेआपण ज्यांच्याशी व्यवहार करतो त्यांचाशी येतो आणि अष्टम स्थान म्हणजे मृत्यू म्हणजेच नाशाशी येतो. तुमच्या पत्रिकेनुसार केतू-मंगळ अंगारक, योग राहू-शुक्र ग्रहण योग आणि शनी-चंद्र विषयोग हे योग निर्माण झाल्यामुळे फसवणूक झालेली आहे. त्यासाठी या तिघांची शांती करणे गरजेचे आहे म्हणजे भविष्यामध्ये फसवणूक होणे टाळता येऊ शकेल.
३. तुम्हाला मे २०१९ पर्यंत केतूची महादशा चालू होती आणि वर पाहिल्याप्रमाणे तुमच्या फसवणुकीला केतूच जबाबदार आहे. आता केतूची महादशा संपून शुक्राची महादशा चालू झाली आहे. त्यात शुक्र अंतर्दश सप्टे.२०२२ पर्यंत आहे आणि शुक्राची एक रास अष्टमात आहे. तसेच लग्न स्थानामध्ये शुक्र राहू ग्रहण योग आहे आणि शुक्र हा धन संपत्तीचा कारक ग्रह आहे. पण तो राहू बरोबर असल्यामुळे तसेच अष्टमात त्याच्ची एक रास असल्यामुळे राहू शुक्र ग्रहण योग सक्रीय आहे आणि अष्टम स्थान सुद्धा सक्रीय आहे. अष्टम स्थान पत्रिकेतील खराब स्थान मानले जाते. त्यामुळे हि स्थिती अजून सप्टे.२०२२ पर्यंत राहील.
४. खालील उपाय केल्याने परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा होईल.
Comments
Post a Comment