जातक क्र. 11
नाव : सांगण्यास परवानगी नाही
जन्मतारीख : 9.09.1982
जन्मवेळ : 02.10 दुपारी
जन्मठिकाण : पुणे
जातक : स्त्री
समस्या
1. पती पत्नीचे पटत नाही
2. संशय घेतला जातो
3. आर्थिक अडचणी
4. मुलगा ऐकत नाही
मार्गदर्शन
1. तुमच्या सप्तम् स्थानात उच्चीचा राहू आहे आणि तुम्हला नोव्हेंबर 2019 पर्यंत राहू ची महादशा चालू होती, राहू हा गैरसमज पसरवणारा ग्रह आहे, राहू हा अंतर्जतीय विवाहासाठी चांगला ग्रह मानला जातो, पण सप्तम् स्थानात राहू असणाऱ्या जातकाला वैवाहिक सुख मिळत नाही, आणि त्यात राहू महादशा म्हणजे त्रासाचा कळसच. आता जरी महादशा संपली असली तरी मूळ कुंडली प्रमाणे तो त्याच स्थानात असल्याने आणि सध्या गोचारीचा राहू मिथुनेतच असल्याने अजून काही दिवस तुम्हाला त्रास सहन करावाच लागेल. राहू बुध ग्रहण योग शांती करून घ्यावी.
2. आता तुमची गुरुची महादशा चालू झालेली आहे, गुरू तुमच्या लग्न आणि चतुर्थ स्थानाचा स्वामी असून स्वतः गुरू हा लाभात बसलेला आहे, गुरू लाभात असल्याने आणि आता गुरुची महादशा असल्याने काही गोष्टींचे लाभ तुम्हाला मिळायला हवेत पण लग्न स्थानात केतू असल्याने केतू गुरू चांडाळ योग निर्माण झालेला आहे, त्याच केतू ची एक दृष्टी सप्तमावर पण आहे आणि सप्तम स्थानात बुधाची रास आहे. हे सर्व योग पुनर्विवाह दाखवतात, तुम्हाला गुरुचे पूर्ण लाभ हवे असतील तर केतू गुरू चांडाळ योग शांती करणे महत्वाचे आहे.
3. द्वितीय स्थानात शनीची रास असल्याने तुमचे बोलणे थोडे कडक असेल, त्यामुळे माणसे दुरावतील, म्हणून बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे.
4. जानेवारी 2022 पर्यंतची परिस्थिती खरंतर खूप चांगली आहे. त्यामुळे काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा आहे.
5. संतती स्थानावर मंगळची दृष्टी असल्याने आणि मंगळ लाभाचा स्वामी असल्याने मुलाशी कमी पटेल, तसेच मुलं ऐकणार नाहीत.
6. बाकी पत्रिका चांगली असून दिलेले उपाय केले तर परिस्थितीत सुधारणा होईल. उपाय स्वतंत्र देण्यात येतील.
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment