जातक क्र. ९

नाव:- सांगण्यास परवानगी नाही
जन्म तारीख:- 25.06.1979
जन्मवेळ:- 6 सकाळी
जन्मठिकाण:- बसवकल्याण (कर्नाटक)


समस्या

1) Let me know in Which Field I will Succeed.?
ln which location ?

2) Which Field will suites me.

3) Which Business shall I do ?

4 ) I am looking forward for Domestic Gas Agency. By my wife name will I be Succesful in This Business ?

5) If not wht shall I do ?

6) How will be my Financial Status in Future life. 

7) Will I earn as I am wanting?

Guruji Pls as I have frwdd my Kundali Details pls go Trough it and Give me exact way and proper solutions to Achieve money and Big success.

As I have frwdd my family details. Go through it. Is anyone form them are trying to spoil me with Financial and my career. Because  of what I am Struggling with Financial.


मार्गदर्शन

१.पत्रिकेमध्ये पराक्रम स्थानात शनी राहू श्रापित योग बनलेला आहे. ज्यावेळी घराण्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा अपमृत्यू होतो त्यावेळी शापित योग होत असतो. घराण्यामध्ये असे काही झाले असल्यास त्याचा शोध घेणे. शापित योगामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात जसे कुठलेही काम न होणे, व्यापारात नुकसान, तोंडाशी आलेला घास जाणे. ज्यावेळी शापित योगाशी संबंधित ग्रहांच्या अंतर्दश महादशा येतात त्यावेळी त्रास होतो.

२. दशम स्थानात मीन रास आहे आणि दशमेश गुरु दान स्थानात उच्चराशीत बुधासोबत आहे. तसेच दशम स्थानावर गुरूची नववी दृष्टी आहे. लग्न रास आणि चंद्र रास एकाच आहे आणि हा एक दुर्मिळ योग आहे. धन स्थानात कर्क रास असून धनेश लग्नात आहे त्यामुळे चंद्राने दर्शित व्यवसाय म्हणजे द्रव पदार्थाचा व्यापार जसे पेट्रोल,दुध,मद्यव्यवसाय इ. व हॉटेल व्यवसाय लाभदायक आहे.

३. तुमच्या धन स्थानाचा स्वामि चंद्र हा लग्नामध्ये रवी सोबत युतीत बसलेला असून तो त्यचा शत्रू बुधाच्या मिथुन राशीमध्ये आहे. रवी आणि चंद्रामुळे अमावस्या योग बनलेला आहे. लग्नस्थान हे धनस्थानाचे व्ययस्थान आहे त्यामुळे क्र.२ मध्ये सांगितल्याप्रमाणे पैसा येत राहील पण ऐनवेळी कामाला येत नाही आणि धनासंबधित अडचणी निर्माण होतात. तसेच धन स्थानात गुरु असल्यामुळे ते स्थान खराब झालेले आहे कारण गुरु स्थान नाश करतो. परंतु तिथे बुध ग्रह असल्याने व्यापार क्षेत्र तुमच्यासाठी लाभदायक आहे. तुम्ही खाण्या-पिण्या संबंधित हॉटेल व्यवसाय इ. करू शकतात.

४. भाग्य स्थानात शनी केतू ग्रहण योग तयार झालेला आहे त्यामुळे पाहिजे तेव्हा भाग्य साथ देणार नाही.

५. सध्या तुम्हाला शनीची महादश चालू आहे. शनीमुळे सर्व काम हळू होतात. शनीची महादशा octomber २०२० पर्यंत आहे आणि शनी हा तुमच्या शापित योगाशी संबंधित आहे त्यामुळे शापित योग आता सक्रीय आहे आणि तो पराक्रम स्थानाशी संबंधित आहे. पराक्रम स्थानावरून आपले आपली काम करण्याची कुवत पहिली जाते आणि लोकांचे आपल्याबद्दल मत तयार होत असते. शनी  राहू शापित योगामुळे काम अधिक हळू गतीने होत आहेत. खरतरं ऑक्टो २०२० पर्यंतचा काळ व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे पण शापित योगामुळे समस्या निर्माण होत आहेत.

६. गोचरचा शनी आता तुमच्या अष्टम स्थानात असून त्याची तिसरी दृष्टी कर्म स्थानावर असल्याने व्यवसायामध्ये हवी तशी गती येणार नाही. त्याची सातवी दृष्टी धन स्थानावर असल्याने धनाच्या समस्या निर्माण होणार आणि धन लवकर येणार नाही.

७. लग्न स्थानात रवी आणि लग्न रास आणि चंद्र रास मिथुन हा एक मोठा राजयोग आहे. रवी म्हणजे उच्च पद, या योगाचे जातक राजकारणामध्ये तसेच व्यवसायामध्ये उच्चपदावर कार्यरत असतात.

८. नवमांश कुंडलीमध्ये धन स्थानात चंद्र मंगल हा लक्ष्मीकारक राजयोग आहे आणि सप्तमात बुध शुक्र हा लक्ष्मियोग आहे.

९. पत्रिका चांगली असून शनी महादशा आणि शनीचे अष्टमातील गोचर भ्रमण आणि शनी राहू शापित योग यामुळे सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत.


वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.

पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका. 






 

Comments

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...