अंतर्मनाची शक्ती भाग ३

अंतर्मनाची शक्ती भाग ३

लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
पुनः प्रकाशन:- १९.१२.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो मी काही दिवसांपूर्वी मी रिंगटोन एक ट्रिगर हा लेख लिहिला होता. त्यात माझ्या ह्याच लेखाचा उल्लेख मी केला होता. काही लोकांनी हा लेख वाचायला मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती म्हणून वाचकांसाठी हा पोस्ट करत आहे. ह्या पोस्ट च्या माध्यमातून मला कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे नाही. ह्या लेखामध्ये मी, मला आलेले काही परानॉर्मल अनुभव शेयर करत आहे, ते अनुभव माझे भास पण असतील आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. ट्रिगर म्हणजे एक कळ जी मानवनिर्मित असू शकते किंवा प्रभावी विचारांनी निर्माण झालेली असू शकते. आपल्या जीवनात आपण खूप प्रकारचे ट्रिगर बनवत असतो, जसे सकाळी लवकर उठण्यासाठी आदल्यादिवशी रात्री झोपताना मला लवकर जाग येऊ दे असे मनाला सूचना करणे, हे एक ट्रिगर आहे, काही लोकांना सकाळी चहा, बिडी घेतल्याशिवाय टॉयलेट ला होत नाही, हे पण एक ट्रिगर आहे, असे कुठले ट्रिगर तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्माण करून ठेवले आहेत त्याचा शोध घ्या, कारण त्यातील सर्वच ट्रिगर तुमच्या हिताचे असतीलच असे नाही, तर वेळीच त्याची दखल घ्या. अर्थात हा सर्व आपल्या अंतर्मनाचा खेळ आहे.

     आज मला तुमच्याशी माझ्या आयुष्यात घडलेला एक अनुभव शेयर करायचा आहे. साधारणतः १८ वर्षांपूर्वी जेव्हा मी F.Y.B.Com. ला शिकत होतो तेव्हाच आमच्याकडे माझ्या भावाने कॉम्पुटर आणला होता. त्यावेळी त्याची Harddisk फक्त 2.1 Gb आणि RAM 8 Mb होती. माझा भाऊ त्यावर ऑफिस चे काम करत असे आणि मी Game खेळत असे. मेमरी कमी असल्याने 2D गेम चालत असत. त्या गेम्स मध्ये Nuke2 असा एक जादुई गेम होता. त्या गेम मध्ये एक वेपन होते त्याचे नाव पॉवर ऑफ टोन. ती एक वही होतीे आणि त्यात जे लिहिले जाईल ते घडत असे आणि म्हणून मला ते वेपन खुप आवडायचे. 
     त्यावेळी मला असे वाटायचे की आपल्याकडे पण असे एक बुक असेल तर किती मजा येईल म्हणून मी माझी सर्वात आवडती वही घेऊन तिच्या पहिल्या पानावर हेडिंग टाकले Power of Tone. ती वही मला कुठेतरी सापडली होती. ती कोणाची होती काही माहीत नाही पण तिच्या सुरुवातीच्या काही पानांवर कुठल्यातरी वेगळ्या भाषेत काहीतरी लिहिलं होतं. त्या पानांना स्टेपल करून मी पुढची पाने वापरायला घेतली होती. नंतर मी त्या वहीत नियमितपणे काही ना काही गोष्टी लिहायला सुरुवात केली. मला आवडणाऱ्या बऱ्याच व्यक्ती, माझी आजी, भाऊ, त्या नंतर मला आवडणाऱ्या जागा, त्या नंतर ज्या गोष्टी व्हायला हव्यात असे मला वाटायचे त्या गोष्टी मी त्यात लिहून ठेवल्या होत्या. मला असे वाटायचे की मी जे काही लिहीत आहे ते कधी न कधी खरे होईलच किंवा व्हावे. झाले तर किती मज्जा येईल इत्यादी. काही दिवस असेच गेले होते. एकेदिवशी माझे कॉलेज सुरू असताना माझे आणि एका मुलाचे खुप मोठे भांडण झाले. तो मुलगा खुप श्रीमंत होता आणि त्याच्या खूप गुंडांबरोबर ओळखी होत्या.  कॉलेज मध्ये त्याची खूपच दहशत होती. माझी काहीच चूक नसताना त्याने मला धक्का दिला होता आणि त्यात माझा चष्मा वाकला होता. इतके होऊन ही मी त्याला जाब विचारल्यावर त्याने मलाच धमकी दिली की तुला बघून घेईन, कॉलेज मध्ये दिसल्यास तर तुझी खैर नाही इत्यादी.
     झाल्या प्रकाराने मी खूप घाबरलो होतो. असे कोणीच नव्हते की माझी मदत करू शकेल किंवा मला संरक्षण देऊ शकेल. माझे वडील पेशाने शिक्षक होते आणि त्यांचा स्वभाव एकदमच शांत आणि साधा होता त्यामुळे त्यांची मदत पण मी घेऊ शकत नव्हतो. रात्र रात्र मला झोप येत नव्हती. तो मुलगा आपल्याला काही इजा करेल ह्या भितिने मी ३ दिवस कॉलेज ला पण गेलो नव्हतो. गेले तीन दिवस मी माझ्या लाडक्या वहीचे दर्शन पण घेतले नव्हते. ४थ्या दिवशी मला अचानक एक स्वप्न पडले की मी त्या मुलाच्या भीतीने खूप घाबरलो होतो तितक्यात माझी डायरी आली आणि माझ्याशी माणसासारखी बोलू लागली. ती म्हणाली अरे मी असताना घाबरतोस काय! तुला जे पाहिजे ते लिही आणि स्वप्न तुटले. 
     त्यावेळी माझी मनस्थिती इतकी खराब झाली होती की काय करू आणि काय नको असे झाले होते. कसही करून मला त्या मुलाला धडा शिकवायचाच होता म्हणून मी एक स्टोरी लिहिली आणि त्या स्टोरी चा शेवट असा केला की तो मुलगा बाईक वरून पडतो आणि हॉस्पिटलाईस होतो. एकीकडे मला असे वाटत होते की असे सर्व लिहून काय होणार आहे. ही काय जादू आहे की काय आणि एकीकडे असं लिहून मनाला खूपच बरं पण वाटलं की, काही का होईना माझ्या गोष्टीत तरी त्याला धडा मिळाला. त्यानंतर अजून दोन दिवस गेले आणि ती वहीची गोष्ट मी साफ विसरून गेलो होतो. चवथ्या दिवशी सकाळीच मला बातमी समजली की त्या मुलाचा खूप मोठा अपघात झाला. त्याच्या बाईक ला एक ट्रक ने उडवल होत आणि कित्येक तास तो रस्त्यावर पडून होता परंतु त्याच्या वाईट वागणुकीमुळे त्याला कोणीही मदत न केल्याने त्याने त्याचा एक पाय फ्राक्टर झाला होता आणि त्याला आतमध्ये खूप ब्लडिंग झाले होते, त्याची प्रकृती चिंताजनक होती. ती बातमी ऐकून मला जरास वाईट वाटलं करण मी इतका काही व्हावं अशी अपेक्षा केली नव्हतीच. परंतु एकीकडे चांगलही वाटलं कारण की आता बरेच दिवस मला त्याच्यापासून काहीच धोका नव्हता.
     त्यानंतर मी नियमित कॉलेज ला जाऊ लागलो आणि एक दिवस अचानक मला माझ्या त्या वहीची आठवण आली. बरेच दिवस मी त्यात काहीच लिहिलं नव्हत. घरी जाऊन मी वही उघडून पाहिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला की मी जशी स्टोरी लिहिली होती अगदी तसच त्या मुलाचं अकॅसिडेंट झाले होते. आता मी वहितील सर्व गोष्टी वाचू लागलो आणि काही घटनांचा त्याच्याशी संदर्भ लावून पाहू लागलो असता मला असे दिसले की बर्याचश्या घटना त्या वहीत लिहिल्या प्रमाणेच घडत गेल्या होत्या. ते सर्व वाचून मला एकदम भारी वाटलं की आता आपल्या हाती जसा काही अल्लाउद्दीन चा जादूचा दिवाच लागला होता. मी त्या वहीच्या साहाय्याने माझ्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करू लागलो होतो. त्यात काही लिहिले की ते मला अगम्य रीतीने मिळत होते. माझ्याच इच्छा नाही तर दुसऱ्यांच्या बाबतीतील गोष्टीही मी घडवू शकत होतो. पण ती जादू नक्कीच नव्हती तर काहीतरी वेगळच अमानवी वाटत होते. आता त्या वहि शिवाय मला करमेनासे झाले होते. एक दिवस जर वही लिहिली नाही तरी मला बेचैनी वाटत असे. त्या वहीने जशी माझ्यावर मोहिनी घातली होती. कधीकधी वाटायचे की त्या वहीला स्वतःचे एक आतित्व आहे. काही घटना घडण्यामध्ये अंतर पडले की ती वही मला लिहायला भाग पाडत असे. ती वही आता भरायला आली होती. तिची शेवटची ५ पाने उरली होती. ती वही संपणार म्हणून मी खूपच दुःखात होतो म्हणून मला तिच्यात काहीच लिहायची इच्छा होत नव्हती, त्यानंतर जवळपास ४ वर्ष मी त्या वहीत काहीच लिहिले नाही. त्या वहिबद्दल मी पूर्णपणे विसरून गेलेलो होतो. अचानक परत ती वही माझ्या निदर्शनास आली आणि मग सुरू झाला तो थरार. 
     अशातच तो दिवस उजाडला. नजरेआड गेलेली ती वही परत मला सापडली होती. परंत त्या वहिची ओढ मला वाटू लागली होती. मनाला खूप समजावूनही मला खूपच राहवलं नाही म्हणून शेवटी ती वही घेतली आणि लिहू लागलो. खरेतर मी काय लिहितोय हेच मला निट कळत नव्हते. मी एका मुलाची स्टोरी लिहीत होतो जो विरार वरून संध्याकाळी ५.१० ला सुटणारी शटल ट्रेन पकडत असतो. तेवढ्यात सिग्नल होतो आणि ट्रेन चालू होते परंतु ती क्रॉसिंग ला असल्यामुळे तिचा वेग खूपच कमी असतो. वास्तविक पाहता ती ट्रेन गेली तर १५ मिनिटांच्या अंतराने समोरच दुसरी ट्रेन लगेचच असते परंतु हा घरी लवकर जाण्याच्या हेतूने झपाटला गेलेला असतो. ट्रेन ला खूपच गर्दी असते त्यामुळे हा पुढे पूढे चालत जाऊन इंजिनच्या तीन डब्बे मागे असलेल्या एका डब्ब्यात चढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु खुप गर्दीमुळे त्याला चढता येत नाही. ह्याला वाटते की लोकल मध्ये चढताना जसे मागून लोक ढकलून आत घुसवतात तसे काही होईल पण तसे काहीच होत नाही. म्हणून त्याच्यावर दरवाजावर लटकण्याची वेळ येते. पण हा जीवाला घाबरुन रिस्क नको म्हणून तो डबा सोडतो आणि इंजिनच्या दिशेने धावतो आणि इंजिनला लागून असलेल्या माल डब्ब्यात पुढच्या बाजूने चढण्यासाठी दरवाजाचे हॅंडल पकडतो. माल डब्ब्याला एकदम पुढे आणि एकदम मागे अशी दोन ठिकाणीच हँडल असतात आणि त्याच जागेवर पायऱ्या असतात (नक्की माहीत नाही). ह्याच्या एक हातात ब्याग असते तो ती उजव्या हातात घेतो आणि डाव्या हाताने हँडल पकडतो. गाडी चा वेग अजूनही मंदच असतो. गाडी आणि फलाटामधले अंतर खुप जास्त असते. अचानक त्याचा हात सुटतो आणि मग काहीच आठवत नाही... डोळ्यापूढे मिट्ट अंधार ... परत समोरून दिसते ते पाहून त्याची बोबडीच वळते... त्याचे दोन्ही पाय ट्रॅक वर असतात आणि समोरून मंदगतीने गाडीचे एक मोठं चाक त्याच्या पायांच्या दिशेने येत असते... त्या चाकात आणि त्याच्या पायांत फक्त २ सेकंदाचेच अंतर असेल... परत डोळ्यासमोर मिट्ट अंधार.... 
     तीन पाने लिहून झाली असतील इतक्यात मला माझ्या एका मित्राची मला हाक ऐकू आली कि चल उशीर होतोय सत्संग चालू व्हायला आता जास्त वेळ राहिला नाही आणि अजून काहीच तयारी झाली नाहीय म्हणून मला मदत करायला चल, असे म्हणत त्याने जवळ जवळ मला ओढतच नेले. त्याच्या काकांच्या घरी कसलातरी सत्संग ठेवला होता. त्यामुळे त्यादिवशी मी राहिलेली स्टोरी पूर्ण करु शकलो नाही. नंतरचे दिवस खूपच बीसी गेले. त्यामुळे मी परत ती गोष्ट विसरून गेलो. आठ दिवसांनंतर मला मुंबईला जावे लागले. परत येत असताना गाडीत एक तृतीय पंथियाने माझ्याकडे पैसे मागितले आणि मी पाच रुपये दिले असता तो मला ५० रुपये देण्यासाठी जबरदस्ती करू लागला असता मी त्याला सुनावले की " प्यार से लेना हे तो लो नाहीतो वोह भी वापीस देदो" हे ऐकून तो माझ्यावर खूप भडकला आणि त्याने माझ्याकडे ते पाच रुपये भिरकावले आणि शिव्या देऊन मला म्हणाला तेरा चष्मा फूट जायेगा, तू मरेगा इत्यादी. मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता माझे काम करत राहिलो. लोकल विरार ला आली आणि पालघर ला जाण्यासाठी दुसरी गाडी लागली होती. गाडीला खूप गर्दी होती म्हणून मी इंजिनाच्या दिशेने धावलो. इंजिनपासून मागे तिसऱ्या नंबरचा डबा पकडण्याचा प्रयन करू लागलो परंतु खूप गर्दी असल्याने मला ते जमले नाही म्हणून मी माल डब्बा पकडण्यासाठी धावलो आणि त्याचे इंजिन च्या बाजूचे हॅंडले पकडत असताना माझा हात सुटला... आणि डोळ्यापुढे मिट्ट अंधार... त्यानंतर त्यानंतर समोर जे दिसले ते पाहून माझी बोबडीच वळली... मला असे दिसले की गाडीचे मोठे चाक माझ्याच दिशेने मंदगतीने येत होते... त्यानंतर परत डोळ्यापुढे अंधार... चाकात आणि माझ्यात २ सेकंदाचेच काय ते अंतर असेल... त्यानंतर मला असे दिसले की मी प्लॅटफॉर्म वर होतो... दोनतीन लोक माझे दोन्ही हात पकडून मला मागे खेचत होते आणि मीही स्वतःला मागे रेटण्याचा प्रयत्न करत होतो. फलाटावर खूप लोक हा खेळ पहात होती आणि बोलत होती काय इतकी घाई आहे. मागे १५ मिनिटांत दुसरी गाडी आहेच ना. त्यांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरलो की आता जर का मी इथे थांबलो तर मला अजून बरच काही ऐकावे लागेल म्हणून परत मी त्याच डब्यांत चढलो. 
     पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहतात की ती वहीत लिहिलेली स्टोरी आणि माझ्यावर ओढवलेला तो प्रसंग ह्यात काही दुआ होता का? अजूनही ती वही माझ्याकडे आहे आणि त्यात शेवटची २ पाने शिल्लक आहेत. कदाचित ती २ पाने कुठल्यातरी स्टोरीची वाट पाहत असतील. पण झाल्या प्रकारामुळे त्या दिवसापासून ती डायरी उघडून पाहण्याची माझी कधीच हिम्मत झाली नाही.  तुमच्यापैकी कोणाला ह्या असल्या प्रकाराबद्दल काही माहीत असेल किंवा तश्या प्रकारचा काही अनुभव आला असेल तर मला नक्की कंमेन्ट करून सांगा. ती डायरी मी कित्येक दिवसांपासून दोराने गुंडाळून एका अज्ञात जागी ठेवली आहे. कधी कधी मला लिहिण्याची उर्मी येते पण मी ती टाळतो. पण आज इतक्या दिवसांनी परत ती दोन पाने भरण्याची मला इच्छा सतावत आहे. काय माहित माझ्या नकळत कधी कोणी अवधानाने ती अपूर्ण राहिलेली स्टोरी पूर्ण करेल आणि... परत माझ्या डोळ्यासमोर मिट्ट अंधार असेल... 

हा लेख तुम्ही वाचला असेल तर आता तुमच्या मनात असे आले असेलच की तुमच्याकडे पण अशी एखादी वही असती तर. तर मित्रांनो मी आतापर्यंत जे काही लेख लिहिले त्यात काही ना काही तुमच्या पर्यंत नवीन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, काहीतरी वेगळा विषय ठेवला आहे, आजही मला तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे. काहीतरी अस की ज्याच्यामुळे आयुष्यात तुम्हाला खूप काही मिळवता येईल. जशी ह्या लेखात डायरी होती तशीच एक डायरी कशी बनवायची ते पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या साहाय्याने तुम्हीच तुमचे स्वतःचेच काय पण इतरांचेही भूत भविष्य वर्तमान पाहू शकाल. हो थोडासा वेळ लागेल पण हे शक्य आहे. पण ह्या लेखात जशी डायरी होती तशी डायरी बनवायची आवश्यकता नाही, पण मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही अमलात आणले तर पुढील आयुष्यात खूप काही मिळवाल. हे मला माझ्या एक ज्योतिष सद्गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आहे तेच तुमच्यासमोर ठेवणार आहे. तुम्ही बनवणार असलेली डायरी ही त्या डायरी सारखी नसून दैवी असणार आहे. 
धन्यवाद....
अंकुश सू. नवघरे. (पालघर)


वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.

लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका. 




Comments

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...