ह्याला बोलतात अनुभव...
ह्याला बोलतात अनुभव....
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०१.०७.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी पारद शिवलिंगावर पारदेश्वर नावाचा एक लेख टाकला होता. त्या लेखात मी पारद शिवलिंगाची स्थापना घरात केल्याने काय फायदा होतो त्या संबंधी माहिती टाकली होती. पारद शिवलिंग हे साक्षात भगवान शंकरांचे दुसरे रूप किंवा आत्मलिंग मानले जाते, त्याची सेवा केल्याने प्रत्यक्षात महादेवाची पूजा केल्याचे पुण्य फल प्राप्त होत असते. जेव्हा कधी कोणावर काही गंडांतर येते, दुर्धर आजारपण येते, मृत्यूयोग येतो त्यावेळी भगवान शिव शंकरांच्या महामृत्युंजय मंत्राने जाप आणि अभिषेक केला जातो, हे करण्याने मृत्यू, गंडांतर टळून माणसाचा जीव वाचतो, असे कित्येक अनुभव कित्येकांना आलेले आहेत. परंतु ते शुद्ध आणि व्यवस्थित सिद्ध केलेले असेल तरच असे अनुभव येऊ शकतात. तर पारद शिवलिंगाची स्थापना घरात केल्याने किंवा नुसतं तुमच्या नावावर संकल्प करून सिद्ध केल्यानेही तुमच्यावर आलेले गंडांतर टळू शकते ह्याचा ग्रहणाच्याच दिवशी आलेला हा अनुभव आहे.
माझा पारदेश्वर हा लेख वाचून कित्येकांनी माझ्याकडे पारद शिवलिंगाबद्दल चौकशी केली होती, त्यात काही लोकांनी ते घेण्याचीही तयारी दर्शवली. पण म्हणतात ना अशा दैवी आणि चमत्कारी वस्तू ह्या फक्त भाग्यवंतांच्याच नशिबात असतात. असेच मला माझ्या एक डॉक्टर कलाइन्टचा ग्रहणाच्या आदल्या दि. २०.०६.२०२० ह्या दिवशी फोन आला आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी अचानक विचारले की त्यांनाही असे पारद शिवलिंग मिळू शकेल का. मी म्हटले का नाही मिळू शकणार, त्यावेळी अनायसे माझ्याकडे काही लोकांच्या श्रावणातील मागणीप्रमाणे पारद शिवलिंग घरी आणून ठेवलेली होतीच. परंतु, ग्रहणात ते सिद्ध करण्याचा माझा मानस नव्हता. पण म्हणतात ना की कर्ता करविता हा परमेश्वरच असतो. त्याला आपल्या आपल्या भक्तांची सदैव काळजी असते. त्याप्रमाणे माझ्या क्लायंट कडून पारद शिवलिंगाची मागणी मागे काहीतरी परमेश्वरी हेतूच असावा असे मानून ग्रहणात शिवलिंग सिद्ध करायचा निर्णय घेतला. ह्यावेळी आलेले सुर्यग्रहण जवळपास ८०० वर्षांनी आलेले होते, त्यामुळे ते काहीतरी खास असणारच, त्यामुळे त्यावेळी सिद्ध केलेल्या गोष्टीमध्ये काहीतरी विशेष शक्ती येणारच ह्याची मला कल्पना होतीच, पण एक असा अनुभव पण अनुभवायला मिळेल ह्याची मलाही कल्पना नव्हती. त्यादिवशी मी डॉक्टरांची ऑर्डर घेतल्यानंतर अजून काही लोकांच्या ऑर्डर घेतल्या. हे ग्रहण जरी खूप काळ चालणारे असले तरी साधनेला वेळ पुरत नसतोच, म्हणून मी त्यादिवशी वेध लागल्यापासून रात्रभर साधना करत असताना मला संकेत आले की आपल्याला सकाळी बरोबर ८ वाजून ३० मिनिटांनी पारद शिवलिंग सिद्ध करायचे आहेत, आणि त्यानंतर परत ग्रहण सुटताना करायचे आहेत. त्यानुसार मी बरोबर त्यावेळेत जातकाच्या नावाने संकल्प करून पारद शिवलिंग सिद्ध केले आणि परत ग्रहण सुटताना पण केले. सर्व आटोपल्यावर बसलो असता मला माझे क्लायंटचा दुपारी मेसेंजरला मेसेज आलेला दिसला, त्यांनी काही फोटो शेयर केलेलं होते, त्यांनी लिहिले होते की त्यांचा बरोबर ९ वाजता खूप मोठा अकॅसिडेंट झाला पण त्यांना कुठे थोडसंही खरचटलं नाही. आता ह्याला काय म्हणावे, शेवटी देवाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही. त्या अकॅसिडेंट चे काही फोटो मी लेखात देत आहे. तर सांगायचं हे आहे की तुमची साधना तीव्र आले तर असे अनुभव ही येऊ शकतात. हा अनुभव त्यांच्या परावनगीनेच शेयर करत आहे. काही लोकांना असेही वाटेल की मी माझी मार्केटिंग करत आहे, पण जे आहे ते सर्वांसमक्ष आहे. मला कोणाची पर्वा नाही, मला फक्त माझ्याकडे येणाऱ्या जातकांची पर्वा आहे. आजपर्यंत केलेल्या ज्योतिष मार्गदर्शनात मी फक्त माझ्या कलाइन्टना चांगला अनुभव कसा येईल हेच पाहत आलेलो आहे, आणि पाहत राहील. तुमच्याकडे कोणाकडे पारद शिवलिंग असतिल तर त्याची मनोभावे पूजा करत रहा आणि आणि सुखी राहा. माझ्या लेखाची लिंक खाली देत आहे. धन्यवाद.
अॅड. अंकुश नवघरे.
लिंक:-
https://www.facebook.com/824461247927559/posts/1113525929021088/
Comments
Post a Comment