अंतर्मनाची शक्ती भाग ४
अंतर्मनाची शक्ती भाग ४
हायर काँशीयस
लेखक:- अॅड.अंकुश नवघरे., (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- ०८.०२.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रानो आज मी तुमच्यासाठी एक खूप वेगळा विषय घेऊन आलोय. हायर काँशीयस म्हणजे अतिउच्च भावनिक पातळी. प्रत्येक माणसाचे जीवन हे भावनांवर आधारलेले आहे. द्वेषाची भावना, प्रेमाची भावना, अशा कित्येक प्रकारच्या भावनांनी माणूस घेरलेला असतो. ह्या भावनाच माणसाला चांगली वाईट कृत्य करायला भाग पाडत असतात. काही माणसे आपल्या भावनांवर नियंत्रण करू शकतात तर काही, नाही करू शकत, जे नाही करू शकत त्यांना भावनिक किंवा इमोशनल असे म्हणतात, आणि जे नियंत्रित करू शकतात त्यांना स्थितप्रज्ञ असे म्हणतात. ही भावना साधी गोष्ट नाही, ह्या भावनेला कित्येक पातळ्या असतात, त्या पातळ्यांवरून माणसाची किंमत ठरत असते. त्यातच जी एक भावनेची पातळी येते तिला इंग्रजी मध्ये हायर काँसियस किंवा अतिउच्च भावनिक पातळी असे म्हणतात. हायर म्हणजे अतिउच्च. अतिउच्च भावनिक पातळी ही एक अवस्था आहे, ह्या अवस्थेत तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा काहीतरी जास्त प्राप्त होत असते किंवा झालेले असते. ते जास्त म्हणजे काय? उदाहरण द्यायचे झाले तर, कधीकधी तुमची कोणी आवडती व्यक्ती कुठेतरी संकटात असते त्यावेळी तिच्याशी संपर्क न होऊ शकल्याने तुमच्या मनात उगाच काही वाईट किंवा काळजीचे विचार येत असतात, तुम्हाला अस्वस्थ वाटत असते, त्या माणसाची खूप ओढ वाटत असते, ती व्यक्ती जवळ नसूनही हे असे कशामुळे वाटते, तर त्यावेळी तुमचे मन पूर्णपणे त्या व्यक्तीवर लागलेले असते, ते त्या व्यक्तीसाठी एकाग्र झालेले असते, अशा वेळी तुमची भावनिक पातळी तुमचे अंतर्मन नियंत्रित करू लागते, आणि आनंतर्मन हे एक दिव्य मन आहे, अंतर्मन हे सर्वज्ञानी आहे, त्यामुळे सर्व व्यवहार अंतर्मनाच्या नियंत्रणात गेल्यानंतर ते त्या माणसाला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते आणि तो माणूस कुठे आहे, कुठल्या अवस्थेत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते, त्या स्थितीत तो माणूस भावनेच्या एक उच्च पातळीत प्रवेश करतो. पण हे झालं एक सामान्य माणसाचे, म्हणजे अशा लोकांचे ज्यांची भावनिक पातळी फक्त त्यांच्या लोकांच्या बाबतीतच जागृत होत असते. परंतु काही लोक अशीही असतात ज्यांची भावनिक पातळी इतकी उच्च असते की ते कोणाच्याही मनाला कनेक्ट करू शकतात, जसे आपले सद्गुरू. पण ही सोपी गोष्ट नाही, कारण हे करण्यासाठी एक उच्च पातळीची साधना असावी लागते. पण ही एक अशी गोष्ट आहे की जी एकदा साध्य झाली की झाली.
उदाहरण द्यायचे झाले तर ज्योतिष पाहत असताना माझ्याकडे आलेल्या कित्येक जातकांच्या मनात काय चालले आहे हे मला सहज कळू शकते, तो खोटं बोलतो का खर, हे पण मला कळू शकते, कधी कधी काही जातक पैसे असूनही नाही मिळत असे सांगतात तेही मला कळते, तर कधीकधी एखाद्या कडे पैसेच नसतात म्हणून मी त्यांची कामे फ्री करतो कारण तेही मला कळते, कारण मी भावनेची एक अतिउच्च पातळी गाठली आहे. जिथे काहीच लपून राहू शकत नाही. कित्येक लोकांशी नुसतं बोलताना त्यांचा कुठला ग्रह बिघडला आहे हेही मला कळू शकते, कारण मी माझ्या ह्या शक्तीचा उपयोग फक्त ज्योतिष पाहण्यासाठी करतो पण ह्याहून खूप काही मी करू शकतो जे वाचून कदाचित कोणाला अतिशयोक्तीही वाटू शकेल. माझा हा लेख माझ्या अंतर्मनाची शक्ती ह्या लेख मालेतील चौथा भाग असावा. ह्या लेखाच्या पुढच्या भागातून मला ती भावनेची अतिउच्च पातळी कशी गाठता येऊ शकते हे सर्वांसमक्ष आणायचे आहे. हे जर तुम्हाला साध्य करता आले तर खूप प्रमाणात नाही पण काही प्रमाणात तुम्ही दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेऊ शकता. त्याच्या वर येणारी संकटे आधीच जाणून घेऊ शकता, त्याचे दुःख, त्याच्याकडून येणारे प्रेम समजून घेऊ शकता. त्याला आलेला राग तुम्हाला आधीच कळू शकतो, समोरच्याला काय हवे काय नको किंवा तो तुमच्यावर का रागावला आहे हे जाणता आल्यामुळे त्यावर काही होण्याआधीच उपाययोजना करू शकता. हे सर्व अस असलं तरी प्रत्येक गोष्टीला एक वजा बाजू पण असते. प्रत्येक गोष्टीचे चांगले परिणाम आणि दुष्परिणाम असतातच म्हणून सामान्य लोकांनी ह्याच्या मागे जास्त न लागलेलंच बरं, कारण समजा तुमची एखादी आवडती व्यक्ती जिच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता ती तुम्हाला चिट करत आहे, तुमच्यापासून काही लपवत आहे, ते लापावण्यामागचे कारण अगदी तुमच्या हिताचे असले तरीही, त्यामुळे तुम्ही हर्ट होऊ शकता, कारण त्याने आडपडदा न ठेवता तुम्हाला सर्वकाही सांगावे ही तुमची अपेक्षा असते, आणि असा अपेक्षा भंग झाला तर तुमचा त्याच्यावरच विश्वास उडू शकतो, तुमचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, कारण बरेचशे लोक नेहमी अशाच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्नात असतात. ह्या साधनेची एक पातळी गाठल्याने मला ह्या गोष्टी विनासायास कळत असतात, त्यासाठी मला एकाग्रतेची आवश्यकता पडत नाही. मी ह्या लेखात सांगणार आहे ती ह्या साधनेची एक सामान्य पातळी जरी तुम्ही गाठू शकलात तरी तुमच्यासाठी खूप झाले, ह्यावरची पातळी खूप मोठी आहे, तिच्या साहाय्याने तुम्ही एखाद्याच्या मनात घुसून त्याच्या आयुष्यातील कटू प्रसंग पुसून टाकू शकता, त्याचे मन बदलवू शकता, माफ करा हे जे काही आहे ते अनुभवाचे आहे म्हणून इथे सांगू शकत नाही. ज्या कोणी माझा अंतर्मनाची शक्ती भाग एक वाचला असेल त्यांना ही अवस्था प्राप्त करायला काहीच कठीण नाही, पण लोक लक्ष देत नाहीत. मी आजपर्यंत लोकांना खूप काही नवीन, वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कोणी ते किती घेतलं हे मला माहीत नाही. ह्या लेखाचे पुढचे भाग तुम्ही अवश्य वाचाल अशी मला आशा आहे, तत्पूर्वी मला असे वाटतेय की तुम्हालाही काही प्रश्न पडायला हवेत, कारण ज्याला प्रश्न पडतात त्यालाच काहीतरी शिकता येते असे मला वाटते. तुम्ही प्रश्न कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, तर तयार व्हा एक वेगळ्या मितीत प्रवेश करण्यासाठी. धन्यवाद...
अॅड.अंकुश नवघरे., (पालघर)
ज्योतिष विशारद
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे.
लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment