अंतर्मनाची शक्ती भाग २
अंतर्मनाची शक्ती भाग २ रा
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
पुनः प्रकाशन:- दि.१६.१०.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे...
Telekinesis हा विषय सर्वांच्या परिचयाचा असेलच. Telekinesis ही अशी एक शक्ती आहे जी निसर्गाने काही लोकांना जन्मतःच दिलेली आहे तर काही लोक ती प्रयत्नाने मिळवू शकतात. Telekinesis म्हणजे मनाची एक अशी शक्ती जिच्या साहाय्याने आपण एखाद्या गोष्टीचे हाताचा वापर न करता चलन करू शकतो. साधारणतः Kinesis चे एकूण १८ प्रकार आहेत, त्यात टेलीकायनेसीस, बायोकायनेसीस, ऐरोकायनेसीस असे प्रकार येतात. कायनेसीस चा विषय निघाला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते काही सुपरहिट सिनेमे ते म्हणजे मॅट्रिक्स आणि एक्स-मेन, ह्या सिनेमांतील काही नायकांमध्ये अशा काही अनैसर्गगिक शक्ती आहेत की त्याच्या साहाय्याने ते अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी ह्या पंच महाभूतांवर कंट्रोल करून त्यांना पाहिजे ते करू शकतात किंवा घडवून आणू शकतात. अशा प्रकारच्या चित्रपटांचा मानवी जीवनावर खूप खोल परिणाम होत असतो. ते पाहता पाहता आपण इतके गुंग होऊन जातो की काहीकाही वेळेला आपल्याला असे वाटते की हे सर्व खरचं असेल तर आपल्याला पण अशा शक्ती मिळाल्या असत्या तर, अशा एक ना अनेक कल्पना आपल्या मनात यायला सुरवात होते, मग आपण त्याचा शोध करतो, पण आपल्या हाती साध्या महितीशिवाय जास्त काहीच लागत नाही, मग आपल्याला असे वाटायला लागते की, एक तर अशा शक्ती अस्तित्वातच नाहीत किंवा असल्या तरी त्या अशा माणसांकडे आहेत जे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. परंतु अशा शक्ती आहेत, फक्त त्या कुठेतरी अज्ञात ठिकाणी किंवा अज्ञात लोकांकडेच आहेत किंवा काही अशा व्यक्तींकडेही असून त्या अपल्यातच वावरत असून अज्ञानीपणाचा आव आणत असतात.
परंतु एक प्रश्न असाही पडतो की ह्या गोष्टींचा उपयोग काय, तसेच ह्या गोष्टी कोणाच्या हाताला लागल्या तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, कोणाची मानसिकता काय असू शकते, हे कोणालाच माहिती नसल्याने त्या शक्ती कोण कोणाला शिकवत नाही किंवा उघडपणे शिकवायला कचरतात. परंतु मला असे वाटते की ह्या सर्व गोष्टींची माणसाल थोडीतरी कल्पना असावीच कारण जगात वाईट माणसांसारखी चांगली माणसेही आहेतच ज्यांना आपल्या कर्माचे फळ काय मिळू शकेल ह्याची जाण असते आणि म्हणूनच मी ह्या विषयात खोलवर शिरायचं ठरवलं आणि त्यांचा अभ्यास करून काही निष्कर्षाप्रति पोहोचलो, काही अनुभव घेतले आणि ते सर्व अनुभव मला तुमच्या सर्वांसमोर आणायचे आहेत. त्यासाठी मी माझे स्वतःचे अनुभव आणि त्या त्या प्रकारचे kinesis कसे करायचे ह्यासबंधात माहिती तुमच्यासमोर सादर करणार आहे. Kinesis जवळपास १८ प्रकारचे आहे, सर्वच kinesis हे बाहेरील जगावर परिणाम घडवतात परंतु काही kinesis हे आपल्या शरीरात बदल घडविण्यास ही सक्षम आहेत. आज पासू रोज जमेल तसे काईनेसीस चे प्रकार आणि ते साध्य करण्याची विधी, मी घेतलेले काही अनुभव ह्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे तरी सर्वांनी हे लेख काळजीपूर्वक वाचून आत्मसात करावेत. काही प्रश्न असतील तर न लाजता विचारावेत कारण आता तुम्ही एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर चालत आहात.....
१. एरोकाईनेसीस (Aerokinesis) :- एरोकाईनेसीस हा शब्द वाचला की ढोबळ मनाने ह्याचा हवेशी काहीतरी संबंध असेल हे लगेच लक्षात येते. एरोकाईनेसीस म्हणजे हवेवर किंवा वायुवर म्हणजेच वायू तत्वावर नियंत्रण असणारी शक्ती. मग तो वायू कुठलाही असू शकतो. ह्या शक्तीमुळे माणसाला वायू तत्वावर नियंत्रण मिळवता येते आणि वायूतत्वावर नियंत्रण करता आले तर तुम्ही इतरही दुसऱ्या तत्वांवर नियंत्रण मिळवू शकता जसे पाऊस, ह्या शक्तीच्या साहाय्याने पाऊस थांबविता येऊ शकतो, आता पाऊस थांबवण्याचा आणि ह्या शक्तीचा संबंध काय असा प्रश्न कोणालाही पडू शकले किंवा पाऊस थांबवण्याचा उपयोग काय असेही वाटू शकते. त्याचा उपयोग तुम्ही कित्येक ठिकाणी करू शकता जिथे खूप पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झालेली असेल इत्यादि, अजून एक प्रश्न असा पडतो की जर अशा काही शक्ती काहि लोकांकडे आहेत तर मग ते त्याचा उपयोग का करत नाहीत. ह्याला दोन करणे असू शकतात एक म्हणजे त्यांना तशी परवानगी नसावी आणि दुसरे म्हणजे त्यांची शक्ती कमी पडत असावी. निसर्ग चक्रात ढवळाढवळ करायची अनुमती कोणालाही दिलेली नसली तरी काही गोष्टी आपण करू शकतो, ज्या गोष्टी आपल्या स्वार्थाच्या नसतील. आपल्या इथे होऊन गेलेल्या साधू संतांच्या चरित्रात असे कित्येक प्रसंग वर्णन केलेले आहेत की अमुक अमुक संतांने आपल्या योग शक्तींने काही काळापुरता पाऊस थांबवला, काईनेसीस ही शक्तीही योग शक्तीचा एक लहानसा भाग आहे, आणि तुम्ही ती शक्ती काही सोप्प्या पध्दतीने सराव करून पण मिळवू शकता परंतु योगशक्ती इतकी सहज साध्य नाही.
साधारणतः १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी मी माझ्या एक सद्गुरुंच्या सानिध्यात राहून काही साधना शिकत होतो त्याच प्रमाणे काही वनस्पतींचे गूढ ज्ञान मिळवत होतो. वनस्पतींचे ज्ञान मिळविण्यासाठी निसर्ग सानिध्यात म्हणजेच जंगलात इत्यादी जावे लागत असे. त्यासाठी आमच्या इथे जवळच्या तुंगारेश्वर च्या जंगलात आम्ही जात असू कारण तो डोंगर हा हिमालयातील द्रोणागिरी पर्वताचा छोटासा तुकडा असल्याचे मानले जाते त्यामुळे तिथे अशा प्रकारच्या वनस्पती सापडतात. असेच एकदा तिथे जाण्याचा आम्ही एक मुहूर्त काढून त्या मुहूर्तावर जाण्याचा संकल्प केला होता. त्या दिवसांत मी एरोकाईनेसीस ह्या शक्तीचा अभ्यास करीत होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते आणि सतत ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. माझी एक सवय म्हणजे एकदा का मी एखादी गोष्ट करण्याची ठरवली की ती केल्याशिवाय मला चैन पडत नाही, की कुठलेही संकट माझा रस्ता रोखू शकत नाही. ज्यादिवशी आम्हाला जायचे होते त्याच्या आदल्या दिवशीही खूप पाऊस पडत होता, त्यावेळी संध्याकाळी मी सद्गुरूंकडे येऊन त्यांना उद्याचे काय करायचे ह्या बद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की पाऊस खूप असल्याने जाणे शक्य होणार नाही, कारण तुंगारेश्वर येथे पाणी भरून कित्येकदा लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आपल्याला उद्या जायला मिळणार नाही ह्या कल्पनेनेच मला खूप वाईट वाटले होते आणि माझा चेहरा रडवेला झाला होता कारण ज्या वनस्पतीच्या शोधत आम्ही जाणार होतो तिचा मुहूर्त टळून गेल्याने मला परत एक वर्ष तिची वाट पहावी लागणार होती. माझा चिंताग्रस्त चेहरा पाहून ते मला म्हणाले की उद्या आपल्याला सूर्यनारायणाने दर्शन दिले तर आपण नक्की जाऊया, त्यांच्या ह्या बोलण्याने मला जरा हायसे वाटून मी सद्गुरूंना सांगितले की गुरुदेव तुम्हीच का पाऊस थांबवत नाहीत, त्यावर ते मला हसून म्हणाले की तू का प्रयत्न नाही करून पाहत, त्यांचे हे बोलणे म्हणजे त्यांचा आपल्या साधनेला मिळालेला आशीर्वादाच आहे असे समजून मी त्यांना म्हणालो की आपण उद्या काहीही झाले तरी तुंगारेश्वरला जाऊच.
त्यारात्री ८ वाजता मी ती क्रिया करायला सुरवात केली, माझा हा पहिलाच प्रयत्न होता म्हणून मला ध्यान लावून हे करायला साधारण २० मिनिटे लागली, त्या २० मिनिटांत काहीच घडले नाही पण अजूनच जोरात पाऊस पडू लागला होता, म्हणून मला वाटले की आता काय आपल्याला जायला मिळणार नाही असा विचार करून मी झोपून गेलो. (ती क्रिया मी PSI बॉल च्या सहाय्याने केलेली होती, ज्याला पॉवर बॉल असेही म्हणतात, त्यावर वेळ मिळाला की स्वतंत्र्य लेख लिहिण्याचा प्रयत्न करीन. परंतु मी ज्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे त्या शास्त्रशुद्ध आहेत.) रात्री २ वाजता अचानक कसल्याश्या आवाजाने मला जाग आली तेव्हा दिसले की आकाशात खूप गडगडाटासह विजा चमकत होत्या आणि वादळासारखी स्थिती निर्माण झाली होती, मी परत झोपलो ते सकाळी ६:३० ला मला जाग अली तेव्हा मी पाहिले की पाऊस पूर्णपणे थांबलेला होता आणि आकाशात सूर्यनारायणाचे आगमन होत होते. मी पटापट आवरले आणि सद्गुरूंकडे गेलो, त्यांनी मला हसून विजयी भव असा आशिर्वाद दिला. कोणाकोणाला हा अनुभव खरा वाटेल तर कोणाला वाटणारही नाही. ज्यांना नाही वाटणार त्यांनी विषय सोडून द्यावा परंतु स्वतः प्रयत्न करून पाहिल्याशिवाय काही नकारात्मक कंमेंट करू नये ही नम्र विनंती.
एरोकाईनेसीस चे तीन प्रकार आहेत आणि तेच प्रकार हे शिकण्याचेही आहेत. म्हणजे खालील प्रकारा नुसार स्टेप बाय स्टेप सराव करावा लागतो, ते करण्याची क्रिया म्हणजेच त्याचा सराव आहे.
अ) हवेची निर्मिती करणे:- ह्या प्रकारात आपल्याला PSI व्हील ह्या यंत्राचा वापर करायचा असतो. PSI व्हील चा फोटो सोबत देत आहे. हे यंत्र हलक्या कागदाच्या साहाय्याने बनवले जाते. PSI व्हील समोर ठेऊन टेलीकायनेसीस (मनाच्या शक्तीने भौतिक वस्तूचे चलन करणे) चा वापर न करता आपल्याला हाताने हवा निर्माण करायचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या वापरत्या हाताचा तळवा त्या व्हील समोर धरावा आणि अशी कल्पना करावी की तुमच्या तळ हातातून वाऱ्याची झुळूक निर्माण होऊन त्या व्हील ला जाऊन लागत आहे आणि ते व्हील फिरायला लागले आहे. हे करत असताना तुम्हाला ती संवेदना अनुभवण्याचा प्रयत्न करावा लागेल जी संवेदना खऱ्या वाऱ्याच्या झुळुकीमुळे निर्माण होऊ शकते. आधिआधि काही दिवस काहीच घडणार नाही परंतु लवकरच तुम्हाला असे दिसून येईल की तुमच्या हाताच्या बाजूने हवेचे चलन होत आहे आणि PSI व्हील हे यंत्र फिरू लागले आहे. हा हवेचा जोर दिवसेंदिवस वाढत जाईल आणि भविष्यात तुम्ही केवळ ह्या अभ्यासाने किंवा क्रियेने कुठल्याही दिशेने आणि प्रभावाने हवेचे वहन करू शकण्याचे सामर्थ्य प्राप्त करू शकाल.
ब) हवेवर नियंत्रण मिळविणे:- हवेवर ताबा मिळविणे हे हवेची निर्मिती करण्यापेक्षा खूप पटींनी कठीण काम आहे. ह्यासाठी हवेच्या दिशादर्शक यंत्राचा वापर केला जातो, त्यामुळे आपल्याला हवेची दिशा समजण्यास मदत होते. हवेचे दिशादर्शक अशा ठिकाणी ठेवावे की जिकडे हवेचे वहन होत असेल. त्यानंतर मागच्या क्रियेत सांगितल्या प्रमाणे हवेला वाहण्यासाठी प्रवृत्त करायचे, असे करत असताना हवेचे चलन होऊ लागते आणि दिशा दर्शकामुळे ती कुठल्या बाजूने वाहत आहे हे तुम्हाला समजू शकते, एक वेळ अशी येते की तुम्ही आणि ती हवा दोन्ही एक आहेत अशी जाणीव तुम्हाला होऊ लागते आणि अशा वेळी तुम्ही कुठल्याही दिशेने किंवा वेगाने हवेचे वहन करू शकता आणि तिच्यावर नियंत्रण मिळवू शकता.
क) हवेची निर्मिती करणे:- हा एरोकाईनेसीस शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्वात कठीण प्रकार समजला जातो, परंतु एकदा का तुम्हाला हवेची निर्मिती करता येणे शक्य झाले की तुम्हाला पूर्ण वायूतत्वावर नियंत्रण मिळविता येते. ह्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लहानपणी शाळेत असताना केलेला प्रयोग करावा लागतो. तो प्रयोग असा होता की एक बशीत पाणी घेऊन त्यात एक मेणबत्ती पेटवायची आणि त्यावर एक काचेचा ग्लास ठेवायचा, ज्यावेळी त्या ग्लासातला प्राणवायू (ऑक्सिजन) संपायाला लागतो तसे तसे बशीतले पाणी ग्लासात वर वर चढायला लागते, बस इथूनच पुढे आपला प्रयोग सुरू होतो. आता आपल्याला अशी कल्पना करायची असते की एक पांढऱ्या रंगाचा बिंदू जो ऑक्सिजन पासून बनलेला आहे आणि जो त्या ग्लासच्या आत आहे, तो हळूहळू मोठा मोठा होत आहे. ह्या क्रियेत यश मिळविण्यासाठी तुमच्या सय्यमाची कसोटी लागते कारण ही सहजसाध्य होणारी क्रिया नाही. परंतु हळूहळू तुमची मनाची शक्ती असणारा तो बिंदू प्राणवायूची निर्मिती करू लागतो आणि ग्लासातले पाणी हळूहळू खाली खाली जाऊ लागते. पहिले पहिले काहीच झाले नाही तरीही काही दिवसांच्या सततच्या सरावानंतर तुम्हाला पाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनात येईल म्हणून चिकाटी सोडू नका. ह्या क्रियेच्या साहाय्याने तुम्ही बाहेरून बांधलेल्या फुग्यातही केवळ कल्पनेनेच हवा भरू शकता. ह्याचा फायदा म्हणजे जिथे ऑक्सीजनची पातळी काही कारणाने कमी झाल्याने होणाऱ्या धोक्यापासून तुम्ही लोकांचे रक्षण करू शकता. पुढच्या भागात आपण atmokinesis ह्या शक्तीबद्दल विचार करणार आहोत, क्रमशः, धन्यवाद...
अॅड. अंकुश सू. नवघरे.
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment