अनाकलनीय...

ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक संकेत... भाग ४

अनाकलनीय...

लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.१२.०७.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

.....नमस्कार मित्रांनो कधी कधी काही जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करताना काही अगम्य अशा गोष्टी बाहेर येतात, पत्रिकेत सर्वकाही ठीक ठाक असते आणि समस्या काहीतरी वेगळीच असते, हे असे का होते त्याचे उत्तर माझ्याकडेही नाहीय, मीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की ज्योतिषांनी सर्व प्रकारच्या अनुभवांतून जायला तयार असले पाहिजे. कारण कोण जातक तुमच्यासमोर काय ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.(अंकुश नवघरे)
     काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण १५ दिवसांपूर्वी रात्री एक अशी काही घटना घडली की त्यानंतर पूर्ण रात्रभर विचार करून मी झोपुच शकलो नव्हतो. कारण, कारणच तसे घडले होते. आज पर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योतिष किंवा अध्यात्मिक प्रकारातील केसेस सोडविल्या आहेत परंतु त्यादिवशी एक अनाकलनीय म्हणता येईल अशी एक केस माझ्या हातून सोडवली गेली. कधी कधी काही गोष्टींचे आकलन होत नाही तेव्हा त्यांना अनाकलनीय असे म्हणतात. माझ्या एक क्लायंट सोबत घडलेला हा प्रसंग आहे. पण त्यात जे घडलं, जे झालं त्याच माझं मलाच काहीच स्पष्टीकरण होऊ शकलेलं नाहीय, म्हणूनच माझ्यासाठी हे अनाकलनीय अस आहे. एखादी साधी गोष्ट, एखादा साधा तोडगा, एखाद्याचे कित्येक वर्षांपासून हरवलेले सुख, समाधान परत आणू शकते, ह्यावर आता माझा पूर्णपणे विश्वास बसला आहे. फक्त त्यासाठी हवी सद्गुरू कृपा. म्हणजे कर्ता करविता सर्व सद्गुरूंच असतात आणि आपण मात्र नाममात्र असतो. हा प्रसंग वाचून तुम्हालाही कळेल की सद्गुरू कृपा आपल्याकडून काय काय घडवू शकते. (अंकुश नवघरे)
        माझ्या एक क्लायंट आहेत, त्यांची जन्मपत्रिका पाहून मी त्यांना मार्गदर्शन केलेलं होते. त्यांच्या पत्रिकेत बाहेरील बाधा होण्याचे योग काही प्रमाणात होते, त्यावर मी त्यांना उपाय ही दिलेले होते. बराच फरक पडला ही होता, पण एक समस्येचे समाधान काही केल्या मिळत नव्हते. ते असे की त्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून एक त्रास होत होता, तो त्रास असा होता की, त्यांच्याजागी इतर कोणी असत तर त्याने आत्महत्याच केली असती. त्यांचा प्रेम विवाह झालेला आहे, परंतु त्यांच्या नवऱ्याच्या जाती पेक्षा त्यांची जात थोडी कमी असल्या कारणाने त्यांच्या सासरच्याना हे लग्न मान्य नव्हते. हे लग्न मोडावे अशी त्यांची खूप इच्छा होती आणि म्हणूनच त्यातून त्यांनी असे काही षडयंत्र रचले की माझ्या क्लायंटला वेड लागावे. लग्नाच्या आधी त्यांच्याबाबत असे काहीच होत नव्हतं. माझ्या क्लायंट पेशाने डॉक्टर असून एक हॉस्पिटल मध्ये कामाला आहेत. सध्या कोविडची ड्युटी असल्याने ते हॉस्पिटलच्या वस्तीगृहातच राहत आहेत. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी त्यांना एक त्रास होऊ लागला. पहिले पहिले त्यांना असे वाटले की दैवयोगाने त्यांना काही नवीन वीजन(दैवी दृष्टी) मिळाले म्हणून असे होत असावे. परंतु, नंतर असे दिसून आले की त्या गोष्टी फक्त त्या सासरी असतानाच घडायच्या. त्यांच्या सासरचे लोक त्यांच्या घरी  काही ना काही बांधत असत. माझ्या क्लायंटना असा त्रास सुरू झाला की, त्यांना घरात सर्वत्र काळ्या सावल्या दिसू लागल्या. कधी कधी त्या सावल्या कुठेही असत, कधी किचन मध्ये, कधी बेडरूम मध्ये, कधी एकाच जागी स्तब्ध उभ्या असत. त्या इतर कोणालाही दिसत नसत. ह्या डॉक्टर असल्याने त्यांना भूत प्रेत इत्यादी कुठल्याच गोष्टींवर विश्वास नव्हता. तरीही त्रास खूप वाढल्यानंतर त्यांनी नाईलाजाने त्यावर खूप लोकांकडे जाऊन उपाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कुठल्याच प्रयत्नांना यश आले नाही. मानसतज्ञा पासून ते बाबा, फकीर, बुवा अस सर्व करून झाल, देवस्थाने फिरून झाली पण सावल्या काही दिसायच्या बंद झाल्या नाहीत. हळूहळू हे प्रकार इतके वाढले की हॉस्पिटल मध्येही त्यांना त्या सावल्या दिसू लागल्या होत्या. (अंकुश नवघरे)
        त्यांची माझी ओळख सुमारे एक वर्षांपूर्वी झाली होती. ते स्वतः पेशाने डॉक्टर असल्याने असल्या कुठल्याही गोष्टींवर त्यांना विश्वास नव्हता, ज्योतिषावर जास्त विश्वास नव्हता, पण माझी कुठलीतरी एक पोस्ट वाचून त्यांना असे वाटले की कदाचित मी त्यांची मदत करू शकेन. त्यानंतर त्यांची माझी एकदा भेट झाली होती त्यावेळी मी त्यांना एक रक्षा ताविज गळ्यात घालायला दिले होते. ते ताविज घातल्यानंतर त्यांना त्या सावल्या दिसत असत पण भीती वाटत नसे. त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यादिवशी खूप दिवसानी रात्री अचानक त्यांचा मला कॉल आला, त्या खूप घाबरलेल्या होत्या. त्या म्हणाल्या की अचानक सावल्यांचे प्रमाण वाढले आहे. कोविडची ड्युटी लागली असल्याने त्या हॉस्पिटलच्या हॉस्टेल वरच रहात होत्या. त्या साईबाबांच्या भक्त होत्या आणि नियमित श्रीसाईसचरित्र वाचत होत्या. तरी आता त्या सावल्या त्यांना स्पर्श करू लागल्या होत्या. त्यांना दिलेले ते रक्षा ताविज आतून खराब झालेले होते. मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी माझ्या सद्गुरूंना मनातून हाक मारत होतो. त्यावेळी अचानक मला संकेत आला की त्यांना श्रीसाईसचरित्राच्या ग्रंथातून एक पान उघडून मोठ्याने वाचायला सांगा. त्यांनी तसे केल्यानंतर मला ध्यान लागले आणि त्यात मला असे दिसले की एक बाई स्मशानात बसलेली असून तिच्या समोर एक तांत्रिक बसला होता. त्याच्या हातात एक काळी बाहुली असून त्या बाहुलीला कोणाचीतरी केस गुंडाळलेले होते. तो तांत्रिक त्या बाहुलीवर काहितरी मंत्र पुटपुटत होता. त्यानंतर त्याने ती बाहुली जमिनीत गाढली आणि तो म्हणाला की तुमचे काम झाले आहे. आता तिला लवकरच वेड लागेल, त्यावर ती बाई म्हणाली की, पण आपण केलेले हे तंत्र तुटले तर, त्यावर तो तांत्रिक म्हणाला की, (त्यावेळी तो काय म्हणाला हे मला ऐकू आले नाही). त्यानंतर माझे ध्यान खंडित झाले आणि मला दुसरा संकेत आला की त्या मॅडमनी त्यांचे केस जाळावेत आणि ते जाळत असताना बोलावे की (........). जे दिसले ते मी मॅडमना सांगितले आणि केस जाळायला सांगितले. मला हे आश्चर्य वाटत होते की हा माझा भास तर नाही ना. असे केस जाळून काही होईल का. इतक्या वर्षापासूनचा त्रास नुसता केस जाळण्याने जाइल का, असे प्रश्न मला पडत होते. मला स्वतःवरच विश्वास वाटत नव्हता की मला जे दिसले ते खरे आहे, तरीही मी मॅडमना सांगितले की, जे आहे ते आहे, तुम्ही केस जाळा. मी सांगितल्या प्रमाणे मॅडम ने केस जाळले आणि ते जळत असताना ते वाक्य म्हटलं. ते केल्यानंतर काय झाले माहीत नाही, त्या मॅडमचे डोके जड झाले, आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. मी कॉल वर त्यांना हाक मारत होतो पण त्यांचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. मला काळजी वाटत होती की काय झालं असेल. काही वेळाने मॅडम चा हॅलो असा आवाज आला आणि त्या म्हणाल्या की मला एकदम फ्रेश वाटत आहे, खूप हलकं वाटत आहे, असे वाटत आहे की कित्येक वर्षानंतर मी मोकळा श्वास घेत आहे. त्यांना दिसणाऱ्या सर्व सावल्या गायब झाल्या होत्या किंवा त्यांच्या मितीत गेल्या होत्या. त्यांनी माझे खूप आभार मानले आणि नंतर मी फोन बंद केला. ज्या कामासाठी त्यांनी बाहेर हजारो रुपये खर्च केले ते काम अगदी विनामूल्य झाले. नाहीतर कितीतरी लोक असे असतात की अशा कामांसाठी २५००० ते २००००० पण घेताना मी पाहिलेले आहेत. कारण त्यांना लोकांची मदत करायची नसते तर फक्त पैसा कमवायचा असतो. मदत करायचा नुसता आव आणत असतात. मोठेमोठे बडेजाव, माझ्यावर हा देव प्रसन्न आहे, मी नावनाथांची भक्ती करतो, ते माझ्याशी बोलतात, असे बोलणारे खूप पाहिलेत. तुम्ही निस्वार्थी मनाने लोकांची सेवा करायची ठरवले तर देव अशी आपली मदत करत असतो, ज्यासाठी काहीच लागत नाही, फक्त ते करण्याची इच्छाशक्ती लागते. (अंकुश नवघरे)
        पण मला झोपच येत नव्हती, मी सारखा हाच विचार करत होतो की नुसतं केस जळण्याने अस इतकं मोठं काय घडलं असावं. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी परत ध्यान लावलं. तो प्रसंग संकल्पाने डोळ्यासमोर आणला, आणि मला परत त्या बाईचे आणि त्या तांत्रिकचे संभाषण ऐकू आले. ती बाई म्हणत होती की ते तंत्र तुटले तर काय होईल. त्यावर तो तांत्रिक म्हणाला की ते इतकं सोपं नाही,ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा ती तिचे केस जाळेल आणि हे वाक्य (.....) बोलेल. त्यावर ती बाई म्हणाली की इतकं सोपं आहे, तिने केस जाळला तर, त्यावर तो तांत्रिक म्हणाला की, कसं काय, केस जाळण्या इतक्या सोप्या गोष्टीचा कोण कसा विचार करू शकेल. तुम्ही तरी नुसते कधी तुमचे केस जाळले आहेत का. कोणीच तस करत नाही म्हणूंन ते तंत्र तुटणार नाही, त्यामुळे निश्चिन्त राहा. तो अस बोलल्यानंतर मी विचार करू लागलो की आपल्या केसात अस नक्की काय असावं की अस होऊ शकते. ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी मी परत सद्गुरुंवर ध्यान लावेले आणि वाट पाहू लागलो. काही वेळाने मला अज्ञानातून संकेत येऊ लागले त्यात तो प्रश्न होता की केसामध्ये इतकं काय असेल की असे केल्याने ते तंत्र तुटेल. त्यावर मला असे समजले की मानवाच्या केसमध्ये त्याचे गुणसूत्र असतात, त्याची सर्व गताजन्मची कर्मे पण केसांवरून पाहता येतात. केस जाळणे म्हणजे साधी गोष्ट नाही, तर पूर्ण देह जळण्या सारखाच आहे. म्हणून माणूस मरण पावल्यावर त्याचे नातेवाईक केस कापतात, तसे करण्याने मृताचा लिंग देह बनत असतो (काही लोकांना हे पटेलच असे नाही). केस हा आपला अहंकार असतो. लोक काहीही म्हणत असतील पण एक केस जळणे म्हणजे देह जळण्यासरख आहे, आणि देह जळला तर त्यावर असलेली सर्व बंधने जळतात. इतकं ऐकल्या नंतर माझं ध्यान तुटल. केसांवर खूप काही होऊ शकते, जसे वशीकरण, मारण प्रयोग होऊ शकतात, हे फक्त ऐकलं होत, पण आता सर्व अनुभवलं. म्हणूनच माता भगिनी किंवा कोणीही आपले केस कुठेही टाकू नयेत, कारण ते कोणाच्याही चुकीच्या माणसाच्या हाती लागून अनर्थ घडू शकतो. आजपर्यंत मला अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे ध्यानातून मिळालेली आहेत. 
        त्यानंतर मी अस विचार केला की आपणही एकदा आपला केस जाळून पाहूया काय होईल, आणि माझ्या एक ताई आहेत त्यांनाही मी ते करायला सांगितले. त्यांना त्या रात्री खूप शांत झोप लागली. आता हे सर्व मनाचे खेळ होते की अजून काही माहीत नाही, पण मलाही खूप छान झोप लागली. आता हे सर्व वाचून तुम्ही ते काम करू नका. ह्या अनुभवाच्या माध्यमातून मला इतकच म्हणायचं आहे की प्रत्येक समस्येला काहीतरी उत्तर आहेच. पण ते उत्तर तुम्हाला शोधता आले पाहिजे, त्यासाठी साधना हवी, अभ्यास हवा. तो अभ्यास सातत्याने व्हायला हवा. मी पत्रिका मार्गदर्शन करताना काही लोक प्रश्न विचारतात की उपासना किती दिवस करायच्या, त्यांना मला इतकंच म्हणायचं आहे की तुमच्या इतक्या मोठ्या समस्येसमोर हा प्रश्न गौण नाही का. उपासना ह्या फायद्यासाठी करू नयेत तर आपल्या प्रगतीसाठी, उन्नती साठी कराव्यात. पुढे अजून असे वेगवेगळे अनुभव कथन करणारच आहे, त्यातून नक्कीच काहीतरी नवीन तुमच्यासमोर मंडण्याचा प्रयत्न करीन. आता त्या मॅडम ना कसलाच त्रास नाही, ते अगदी पूर्वीसारखं आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण अस जीवन जगत आहेत. लेख कसा वाटला ते कंमेंट करून सांगा, आवडला तर लाईक आणि शेयर करायला विसरू नका. धन्यवाद. 

अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)

वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.

लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका. 




Comments

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...