जातक क्र. ७
जातकाचे नाव:- सांगण्यास परवानगी नाही
जन्मतारीख:- १०.०७.१९७२
जन्मवेळ:- ०५.१५ सकाळी
जन्मठिकाण:- मुंबई सेंट्रल
प्रश्न:-
१. आम्ही घर renovation केले आणि प्रॉब्लेम सुरु झाले मिस्टराना कंबर दुखी सुरु झाली, आणि व्यवसाय बंद झाला,
२. कस्टम कुरिअर लाईन्स घेतलं भाड्याने आणि व्यवसायावर परिणाम झाला
३. Business डेव्हलोपमेंट आहे का?
मार्गदर्शन
1. ह्यांच्या पत्रिकेत बुध महादशेत शुक्र अंतर्दशा चालू आहे, शुक्र हा ह्यांच्या व्ययस्थानाचा स्वामी असून तो स्वतःच त्याच स्थानात बसल्यामुळे ह्यांना व्ययस्थानाची अंतर्दशा चालू आहे, ही अंतर्दशा जानेवारी 2020 ला चालू झाली असून ती ऑक्टोम्बर 2022 पर्यंत आहे. त्यामुळे ह्यांचे व्ययस्थान आता सक्रिय आहे, आणि व्यय म्हणजे नाश, त्यामुळे आताच्या घडीला हे सर्व होत आहे.
2. त्याच प्रमाणे बुधाची महादशा ही ह्यांना ऑगस्ट 2016 पासून चालू आहे, आणि बुध हा त्यांच्या पत्रिकेत धनस्थानात असून तिथे कर्क रास म्हणजे बुधाची शत्रू रास आणि केतू असल्याने केतू बुध ग्रहण योग निर्माण झालेला आहे. ह्याच स्थानावरून आपले घराचे सुख इत्यादी पाहिले जाते.
3. ह्या महादशा आणि अंतर्दशेचा परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात आलेले हे चुकीच्या गोष्टी आहेत, बुधाची महादशा अजून 2033 साला पर्यंत आहे, जर तुमच्या बाबत घडलेली गोष्ट 2016 पासून घडली असेल तर त्याला केतू बुध ग्रहण करणीभूत झालेले आहे आणि जर 2019 पासून घडली असेल तर व्ययस्थान सक्रिय झाल्यामुळे घडलेली आहे,
4. तसेच अष्टम स्थानात मकरेंचा राहू हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला योग नाही. बाकी पत्रिका चांगली आहे, सध्या कुठलेही आर्थिक व्यवहार करताना जपून करावे. अन्यथा फसवणूक होऊ शकते.
5. आता गोचारीचा शनीही अष्टमात बसलेला आहे त्या मुळे श्रापित योग सक्रिय आहे, ह्या सर्वच एकत्रित परिणाम म्हणजे ह्या सर्व अडचणी आहेत, त्या खाली दिलेल्या उपायांनी दूर होतील.
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment