संकट निवारण तोडगा क्र. 3
संकट निवारण तोडगा क्र. ३ संकलन:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.२०.११.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) जारण मारण उच्चाटन प्रयोग नष्ट करणे... नमस्कार मित्रांनो हल्ली प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी काही न काही मेहेनत करत असतो. पण काही लोक असेही असतात जे स्वतः काहीच करत नाहीत पण दुसऱ्यांनी केलेलं मात्र त्यांच्या डोळ्यात खुपत असते. दुसऱ्यांनी कमावलेला पैसा त्यांना दिसत असतो पण त्यामागची मेहेनत दिसत नसते. अशी लोक मग त्रास देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. त्यात मुख्यतः बाहेरील प्रयोग जास्त असतात. आपल्यापैकी काही लोक हे मानतात तर काही मानत नाहीत. जे मानतात ते त्यावर उपाय करतात पण जे मानत नाहीत ते काहीच करत नाहीत आणि मग त्यांचे नुकसान होते. हे नुकसान कधी कधी न भरून निघणारे पण असते. हे नुकसान होऊ नये, आणि अशा गोष्टीना आळा बसावा ह्या साठी माझ्या सद्गुरूंनी एक साधा सोपा तोडगा मला सांगितला होता तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना घरासमोर लिंबू, हळद कुंकू, बिब्बे असे काही वस्तू वारंवार आढळून येतात त्यांन...