संकट निवारण तोडगा क्र. १
संकट निवारण तोडगा क्र. १
संकलन:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.१६.११.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
संकटनाशक गणेश मंत्र...
संकटे कधी कोणावर कशी कोसळतील ह्याचा काही नेम नाही, ती मोठी होण्याआधीच किंवा अशी संकटे येण्याआधीच काहीतरी उपाययोजना करणे महत्वाचे ठरते. आपल्या संस्कृतीत श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हटले गेलेले आहे. गणपतीची उपासना योग्य रीतीने केली तर आपण सर्व संकटांवर मात करू शकतो. मी ह्याआधीही श्रीगणेश हृदय नावाचा एक लेख टाकलेला आहे. श्री गणेशाची उपासना राहू आणि मंगळ ह्या ग्रहांच्या दोषावर रामबाण उपाय आहे. ह्या दोन पैकी राहू ह्या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात खूप मोठया मोठ्या समस्या निर्माण होतात आणि त्यांची उकल होईपर्यंत आपले अधिकाधिक नुकसान झालेले असते. ह्यासाठी श्रीगणेशाची नियमित उपासना करून आपण आलेल्या आणि येणाऱ्या सर्वच संकटांवर मात करू शकतो.
हा विधी खरेतर ज्याच्यावर संकट आलेले आहे त्याने करायचा असतो पण इतरांनीही केला तर अपल्यावर संकटेच येणार नाहीत.
प्रथम श्री गणेशाची पूजा करून त्याच्यासमोर अगरबत्ती आणि साजूक तुपाचा दिवा लावावा. मग उजव्या हातात पाणी आणि अक्षता घेऊन " मी हा मंत्र जप अमुक अमुक संकटाच्या निवारणासाठी करत आहे" असा संकल्प सोडून पाणी जमिनीवर सोडावे. त्यानंतर खालील स्तोत्राचा २१ वेळ जाप करावा.
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।
वक्रतुंड शूर्पकर्णो हेरम्बः स्कंदपूर्वजः।।
जाप करताना हात जोडलेले असावेत आणि चित्त श्री गणेशाच्या मूर्तीवर असावे. जाप पूर्ण झाल्यावर तो श्री गणेशाला अर्पण करावा. त्यापूर्वी " हे श्री गणेशा हा जाप मी तुला अर्पण करत आहे असे म्हणत डाव्या हातात पळी पकडून उजव्या हातावर पाणी सोडावे आणि पुन्हा एकदा संकटातून सोडवण्यासाठी विनंती करावी.
हा जप सकाळ दुपार संध्याकाळ करावा लागतो. त्यासाठी सकाळी 6 दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 ह्या वेळा निवडल्या तर लगेच अनुभव येतात. कमीत कमी २१, ४८ किंवा १२१ दिवस करावा लागतो. पण २१ दिवसांतच संकट निवारण होते असे अनुभव आहेत. शुभम् भवतू।।
Comments
Post a Comment