तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ७

तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ७

लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०१.१०.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

१. अंक ७ वर नेपचून या ग्रहाचा प्रभाव असतो. नवीन काही करता येईल का नेहमीच या शोधामध्ये या अंकांचे जातक असतात. जन्मदिनांक ६, १६ आणि २५ ह्या दिवशी जन्मलेले जातक ह्या अंकाच्या प्रभावाखाली येतात.

२. २१ एप्रिल ते २४ मार्च, २१ जून ते २५ जुलै, २१ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर ह्या महिन्यात ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो.

३. ह्या अंकावर नेपचून ग्रहाचा जास्त प्रभाव असल्या कारणाने ह्या अंकाच्या जातकांना प्रवास करण्याची अतिशय जास्त आवड असते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची धमक यांच्यामध्ये असते तसेच संशोधन आणि प्रयोग करणे हे नसानसांत असते. दान-धर्मामुळे भरपूर जास्त प्रमणात पैसा खर्च होतो. आपल्या कर्तुत्वाच्या जोआर्क़व्र आपण भरपूर पैसा कमवू शकता आणि मनात तशी आशासुद्धा असते. स्त्रियांमध्ये मोठेपणा करण्याची सवय असते. स्फूर्तीची निसर्गाने दिलेली देणगी असते. स्वप्न दृष्टांत अनेक वेळेस पडतात. 

४. ७, १६, २५ या अंकाच्या जातकांच्या शुभ दिनांक आहेत या तारखेस केलेल्या कामात यश मिळू शकते.  

५. ह्या अंकाच्या जातकांना आकाशी, निळा, सोनेरी, भगवा, केशरी छत असलेले रंग या जातकांना जास्त आवड असते. 

६. चंद्रमणी, मोती, पांढरा सफायर हे अंक ७ च्या जातकांसाठीचे भाग्यरत्न आहेत.

७. ७, १६, २५, ३४, ४३, ५२, ६१, ७० हि वर्षे ह्या अंकांच्या जातकांसाठी महत्वाची वर्षे असतात. ह्याच वर्षात ह्यांचा भाग्योदय होत असतो.

८. मजबूत प्रकृतीचे असतात. आतड्यांचे विकार, बद्धकोष्ठ्ता, अधून मधून गँस होणे असे आजार होतात. नैराश्य या जातकांना जास्त येते व त्यामुळे कर्तुत्व शक्तीचा ऱ्हास होतो. पण तरीही यामधून ते बाहेर पडून प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढतात.  

९. अंक ७ च्या जातकांनी अंक ७ आणि २ हे अंक असणाऱ्या जाताकांशी विवाह करणे अत्यंत चांगले मानले जाते.

१०. अंक ७ च्या जातकांना तांत्रिक-मांत्रिक, ज्योतिषी, विशिष्ट इंजिनिअर, आर्चीटेक्ट, डॉक्टर-औषधी, परदेश व्यापार इत्यादी क्षेत्रांत फायदा होतो.   

अंकुश नवघरे...

ज्योतिष मार्गदर्शनासाठी 9004389042 ह्या मोबाईल नंबर वर दुपारी 2 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत कॉल करणे. 



Comments

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...