तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ६
तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ६...
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०१.१०.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
१. अंक ६ वर शुक्र ह्या ग्रहाचा प्रभाव असतो. जन्मदिनांक ६, १५ आणि २४ वर जन्मलेले जातक ह्या नंबरच्या अमलाखाली येतात.
२. २१ एप्रिल ते २१ मे, २१ जून ते २१ जुलै ह्या महिन्यात ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो.
३. ह्या अंकावर शुक्र ग्रहाचा जास्त प्रभाव असल्या कारणाने ह्या अंकाचे जातक शौकीन असतात, अतिशय आकर्षक असतात. भोगवृत्ती या जातकांमध्ये आढळून येते. गरजवंताना मदत करणे, त्यांचे कल्याण करणे, दान-धर्म करण्याची यांची वृत्ती असते. खऱ्या विश्वासावर कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्याची यांची तयारी असते. काही प्रमाणात अध्यात्माकडे यांचा कल दिसून येतो.
४. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस ६ अंकाच्या जाताकांसाठी शुभ मानले जातात. त्यांनी ह्या दिवशी महत्वाची कामे करावीत.
५. ह्या अंकाच्या जातकांना हिरवा, निळा ह्या रंगाची जास्त आवड असते.
६. ६ १५ आणि २४ या तारखा ६ अंकांच्या जाताकांसाठी शुभ आहेत.
७. ६, १५, २४, ३३, ४२, ५१, ६०, ६९ हि वर्षे ह्या अंकांच्या जातकांसाठी महत्वाची वर्षे असतात. ह्याच वर्षात ह्यांचा भाग्योदय होत असतो.
८. लिव्हरशी जोडलेले आजार तसेच स्वर भंजन आणि गंडमाळा या सारख्या आरोग्याशी संबंधित समस्या या जातकांना जडण्याची शक्यता असते.
९. अंक ६ च्या जातकांनी अंक १, ३, ६ आणि ९ हे अंक असणाऱ्या जाताकांशी विवाह करणे अत्यंत चांगले मानले जाते.
१०. अंक ६ च्या जातकांना सिनेकलावंत, गायक, प्रवास एजंसी, लेखन, इंटेरियर डेकोरेटर, कागद कारखाना इत्यादी क्षेत्रांत फायदा होतो.
११. हिरा, स्फटिक, व्हाईट जिरकॉन हे अंक ६ च्या जातकांसाठीचे भाग्यरत्न आहेत.
ज्योतिष मार्गदर्शनासाठी 9004389042 ह्या मोबाईल नंबर वर दुपारी 2 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत कॉल करणे.
Comments
Post a Comment