तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ८
तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ८
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०१.१०.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
१. अंक ८ वर शनी या ग्रहाचा प्रभाव असतो. जन्मदिनांक ८, १७, २६ ह्या दिवशी जन्मलेले जातक ह्या नंबरच्या अंमलाखाली येतात.
२. २१ डिसेंबर ते २० जानेवारी ह्या महिन्यात ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी हे शुभ ग्रह मानले जातात..
३. या अंकाचे जातक खुप जास्त कष्टाळू असतात. जीवनात खुप महत्वाची कामे करतात. यांचा स्वभाव खुप गूढ, अनाकलनीय, गोंधळात टाकणारा असतो. यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे ओळखणे अवघड असते. तयंची निर्णय क्षमता चांगली असून घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात. या अंकांच्या जातकांना कितीही विरोध झाला तरी ते आपले मत आणि निर्णय कधीही बदलत नाहीत.
४. ८, १७, २६ या अंकाच्या जातकांच्या शुभ दिनांक आहेत या तारखेस केलेल्या कामात यश मिळू शकते.
५. ह्या अंकाच्या जातकांना काळा, निळा, सफेद, लाल, फायदेशीर ठरणारे रंग आहेत त्याच प्रमाणे या अंकांच्या जातकांना गडद रंग आवडत नाहीत परंतु मंद प्रकाशीचे रंग आवडतात.
६. नीलम, ब्लू, झिरर्कोन हे अंक ८ च्या जातकांसाठीचे यशदायी आहेत.
७. ८, १७, २६, ३५, ४४, ५३, ६२, ८० हि वर्षे ह्या अंकांच्या जातकांसाठी महत्वाची वर्षे असतात. ह्याच वर्षात ह्यांचा भाग्योदय होत असतो.
८. डोकेदुखी, सांधेदुखी असे छोटे मोठे विकार यांना होतात त्याचप्रमाणे रक्तदाब, गुडघ्यांच्या व्याधी, अपचन हे आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते.
९. अंक ८ च्या जातकांनी अंक १, ५, ६ आणि ८ हे अंक असणाऱ्या जाताकांशी विवाह करणे अत्यंत चांगले मानले जाते.
१०. अंक ८ च्या जातकांना इन्कमटँक्स, सेल्सटँक्स, वकिली, तेलाची मिल, धार्मिक संस्था, संगणक इत्यादी क्षेत्रांत फायदा होतो.
११. शनिवार, रविवार, सोमवार हे अंक ८ चे शुभवार आहेत.
अंकुश नवघरे...
ज्योतिष मार्गदर्शनासाठी 9004389042 ह्या मोबाईल नंबर वर दुपारी 2 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत कॉल करणे.
🙏🙏
ReplyDelete