तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ९

तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग १ अंक ९ लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.०१.१०.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) १. अंक ९ वर मंगळाचा या ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या अंकाचे जातक जरा तापट स्वभावाचे असतात. जन्मदिनांक ९,१८ आणि २७ असणारे जातक ह्या अंकांच्या अंमलाखाली येतात. २. एप्रिल आणि नोव्हेंबर ह्या महिन्यात ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो. ३. या अंकाचे जातक प्रचंड कार्यशक्ती आणि प्रेरणाशक्तीचा संगम म्हणून ओळखले जातात. अतिशय परखडपाने आपली मत मांडणारे आणि यांच्या नजरेमध्ये करडेपणा असतो. आपलेच म्हणणे खर करणे हा यांचा स्वभाव असतो. झटपट निर्णय घेण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. तुसडे बोलणे, शूर, धाडसी आणि माघार न घेणे हे गुण यांच्या मध्ये आढळतात. प्रतिकार शक्ती प्रचंड मजबूत असते. ४. ९, १८, २७ या अंकाच्या जातकांच्या शुभ दिनांक आहेत या तारखेस केलेल्या कामात यश मिळू शकते. ५. ह्या अंकाच्या जातकांना शेंदरी, लाल, चॉकलेटी, गुलाबी हे फायदेशीर ठरणारे रंग आहेत. ६. पोवळे आणि पुष्कराज हे अंक ९ च्...