कितीही पूजा आराधना, साधना करून अनुभव का येत नाही..

 कितीही पूजा आराधना, साधना करून अनुभव का येत नाही.. 

(हे माझ्या सद्गुरूंचे मार्गदर्शन आहे)


लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)

(ज्योतिष विशारद)

प्रकाशन:- दि.०५.०९.२०२०

©Ankush S. Navghare ®२०२०

(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)



नमस्कार मित्रांनो

काल सकाळी आपण एक विषय घेतला होता की कित्येक लोक असे विचारतात की आम्ही इतका जपतप करतो, ध्यान धारणा करतो, पोथ्या पुराणे वाचतो तरीही आम्हाला त्याचे फळ का मिळत नाही. माझ्या सद्गुरूंनी ह्यावर सुंदर असे स्पष्टीकरण दिलेले होते ते मला तुमच्यासमोर मांडायचे आहे. असे होण्याचे करण म्हणजे, हे सर्व अशा गोष्टी करणारे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात, ते कधीही कोणाला दुखावत नाही, त्यांच्याकडून कोणासाठीही कुठला श्राप इत्यादी निघत नाही, पण आशिर्वाद मात्र निघत असतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण असे कित्येकदा तुमच्या बाबतीतही होत असेल की तुम्ही कोणाला असे सहजपणे सांगता की तुझं भल होईल, तुझं कल्याण होईल, तेव्हा नेमकं काय होतं? तर ते बोललेलं कधीही फुकट जात नाही, म्हणजे त्यावेळी तुम्ही जी रोज साधना करत असता, त्या साधनेचे पुण्य त्या माणसाला जाऊन त्याचे खरोखरच भले होत असते, आणि तुमच्या वाट्याला मात्र काहीच शिल्लक राहत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याच फळ मिळत नाही. मग आता प्रश्न हा आहे की, अस असेल तर मग कोणाविषयी चांगलं काही बोलूच नये का? तर तस नाही चांगलं बोलण हे नेहमीच चांगलं पण तुम्ही केलेल्या साधनेची शक्ती खर्च न करता. 

      तर ते कस करायचं, त्यासाठी काही लोकांनी किंवा सत्पुरुषांनी एक पद्धत शोधून काढली ती म्हणजे आपण केलेली साधना त्या त्या देवतेला अर्पण करायची. तुमच्यापैकी किती लोक हे करत असतील हे माहीत नाही. पण तुम्ही ज्यावेळी नवनाथ भक्तीसार किंवा श्रीगुरुचरित्र ह्यासारखे प्रासादिक ग्रंथ वाचता तेव्हा काय करता? त्यात जेव्हा प्रत्येक अध्याय संपतो तेव्हा एक शब्द लिहिलेला असतो, तो म्हणजे श्रीकृष्णार्पणमस्तू किंवा श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तू, हे तुम्ही वाचले असेलच. तर हे असे का लिहिलेले असते, तर ह्याचे करण म्हणजे तुम्ही जे काही वाचले किंवा ईश्वर आराधना केली ती सर्व तुम्ही देवाला अर्पण केली, त्याने काय होते? त्याने असे होते की ते बोलल्यामुळे तुमची ती उपासना त्या त्या दैवताकडे डिपॉसिट केली जाते, आता जेव्हा केव्हा तुमच्यावर वाईट वेळ ओढवेल तेव्हा तुम्ही त्या देवाचा धावा कराल तेव्हा तो ते तुमचे त्याच्याकडे असलेले डिपॉसिट खर्च करून तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. पण ज्यावेळी आपण कित्येक जण दैनिक साधना करतो त्यावेळी ह्याबद्दल काहीही माहिती नसल्याने ती साधना आपल्या इष्ट देवाला अर्पण न करत नाही, म्हणजे ती आपल्या जवळच ठेऊन घेतो, आणि मग जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या बद्दल चांगले बोलता, त्याला आशिर्वाद देता तेव्हा ती खर्च होते आणि तुमच्या स्वतःच्या कामाला येत नाही. त्यासाठी रोज दैनिक उपासना झाल्यावर ती तुमच्या उपास्य देवतेला, इष्ट देवतेला किंवा तुमच्या कुलदेवतेला अर्पण करायची, ती सुरक्षित करायची. त्यासाठी साधे शब्द वापरले तरी चालतात. माळ जपल्यानंतर जसे आपण म्हणतो की शिवार्पणमस्तू, कृष्णार्पणमस्तू, ब्रह्मर्पणमस्तू हे जरी नाही जमले तरी आपल्या साध्या शब्दात ती उपासना देवाला अर्पण करून सुरक्षित ठेवायला सांगायची आणि कुठले मोठे संकट आले तरच देवाला त्याची मागणी करायची, अन्यथा ती तुमच्याकडून कधी खर्च होईल तुम्हालाही नाही कळणार. 

     आता हेच पहा की सद्गुरु का करायचे असतात, कारण की ज्यावेळी आपण सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो तेव्हा ते आपला सर्व भार त्यांच्या डोक्यावर घेत असतात, ते ईश्वरीय अंश असल्याने, महान तपस्वी असल्याने तसेच नेहमी साधना रत असल्याने त्या भाराने त्यांना तसा काहीच फरक पडत नसतो, त्यांनी आपल्याला कितीही भरभरून आशिर्वाद दिले तरी त्यांची शक्ती संपत नसते कारण सतत ईश्वरचिंतनात राहून ते त्याची भरपाई करत असतात, परंतु आपले तसे नसते, आपण काय करतो की थोडीफार साधना करतो आणि मिळालेले फळ दुसर्यांना कळत न कळत आशिर्वाद देऊन घालवून टाकतो. कधीकधी आपण आपल्या समस्यांसाठी एखाद्या तांत्रिक, महाराज ह्यांच्याकडे जाऊन वाट्टेल ते पैसे मोजून आपल्या समस्या सोडवून घेणे असे प्रकार ही करतो, त्याने काय होत? तंत्राच्या नियमानुसार आपल्याला समोरच्याला काहीतरी द्यावे लागते तेव्हा त्याचे फळ आपल्याला मिळते, आपण त्याला पैसे देतो, ते पैसे तो वस्तू आणण्यावर खर्च करतो, पण मग त्या देवाला काय मिळते, देव काय नुसता कोंबडे आणि बकऱ्यांवर संतुष्ट होतो असे तुम्हाला वाटते का, तर नाही, तो देव तिकडे तुमचा आत्मा गहाण ठेऊन तुमची साधना, आत्मशक्ती हे देखील घेत असतो, परंतु ते तुम्हाला कळत नाही, त्याचा परिणाम म्हणजे खरतर तुमच्या त्या शक्तीनेच ती कामे होतात पण तुम्हाला वाटते की त्या तंत्रिकाने ते काम केले. त्यानंतर त्याचे वाईट परिणाम तुमच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात, कारण तंत्र फक्त पैशाची अपेक्षा ठेवत नाही तर तंत्रातील क्षुद्र स्तरावरील देवता तुमची साधना, तुमची जीवनशक्ती घेत असतात, आणि त्याबदल्यात तुम्हाला हवे ते देत असतात. पण तुम्हाला ते कळत नाही, कारण ह्याची वाच्यता तुम्हाला कोणीही करत नाही. तुम्हाला वाटते की समानाला पैसे खर्च झाले, ते तर होतातच पण, त्याबरोबर त्यांचा तुमच्या आत्म्याशी संबंध बांधला जातो, तुम्हाला त्या शक्तीचे गुलाम केले जाते, ते सर्व तुमच्या नकळत केले जाते, त्यामुळे त्याचा तात्पुरता फायदा दिसतो पण नंतर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे तुम्ही नुकसान करत असता. ह्या कारणानेही तुमच्या साधनेचे फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणूंन कोणाही तांत्रिक साधना करणाऱ्या महाराजाकडे जाताना सावध राहा, आताच नाही तर पुढचा विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीला हे सर्व काहीच माहिती असेलच असे नाही, किंवा तुम्ही तेव्हा सांगायला नसाल. त्यामुळे त्यांच्या बरबादीला तुम्हीच कारणीभूत ठराल म्हणूंन उपाय फक्त तेचं करा जे देवाच्या सानिध्यात घेऊन जातील, देवाची उपासना करायला लावतील, कारण मनुष्य जन्म हा भोग भोगण्यासाठी आहे, नाकी त्यांना बगल देण्यासाठी नाहीतर कित्येक मोठ्या साधू संतांना मोठे आजार होते, कॅन्सर सारखे आजार होते, त्यांना सहज ते त्यांच्या तपाने घालवता आले असते पण त्यांनी तसे केले नाही, म्हणून आपल्या सद्गुरूंना शरण जा जे सात्विक क्रिया करवून घेतात. हे ज्याला कळलं त्याने सर्व मिळवलं. धनवाद.

अंकुश नवघरे... 

Comments

  1. Khupch chan sangital

    aahe tumhi sir🙏

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. खूप उपयुक्त माहिती सर. मी ह्यापुढे केलेला जप, प्रार्थना देवाला अर्पण करत जाईन. धन्यवाद !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...