तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक ३

 तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक ३


लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)

(ज्योतिष विशारद)

प्रकाशन:- दि.०८.०८.२०२०

©Ankush S. Navghare ®२०२०

(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)


अंक ३

ह्या अंकांच्या अमलाखाली ३,१२,२१,३० ह्या जन्मतारखेना जन्माला आलेल्या जातकांचा समावेश होतो.

१. अंक ३ वर गुरु ह्या ग्रहाचा प्रभाव असतो. 

२. १९ फेब्रुवारी पासून २१ मार्च, २१ जून ते २१ जुलै, २१ नोव्हेंबर ते २१ डिसेम्बर ह्या महिन्यात ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो. (अंकुश नवघरे)

३. ह्या अंकावर गुरु ग्रहाचा जास्त प्रभाव असल्या कारणाने ह्या अंकाचे जातक जास्त धार्मिक असतात परंतु काही वेळा त्यांच्यात अहंकारहि जास्त प्रमाणात दिसून येतो.

४. स्वभाव: ह्या अंकाचे जातक अति महत्वकांक्षी असतात तसेच ह्यांना कुणाच्या वर्चस्वाखाली राहाणे आवडत नाही. आपल्या अधिकाराचे आणि ऐश्वर्याचे प्रदर्शन करणे ह्यांना आवडते. त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, शिस्तप्रिय, कोणाकडेही याचना न करणे, वचक बसवणे तसेच अपमान होऊ नये ह्याची सतत काळजी घेणे हे ह्यांचे अंगभूत गुण असतात.

५. ह्या अंकाच्या जातकांना भगवा, पिवळा आणि गुलाबी ह्या रंगाची जास्त आवड असते. (अंकुश नवघरे)

६. ह्या अंकाच्या जातकांना पुष्कराज हे रत्न भाग्यशाली ठरू शकते परंतु ह्या व्यक्ती प्रकृतीने स्थूल असल्या कारणाने ह्यांना हमखास मधुमेह होऊ शकतो, आणि पुष्कराज रत्न धारण केल्यामुळेही मधुमेह झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत त्यामुळे, पत्रिका पाहिल्याशिवाय ह्या अंकाच्या जातकांनी हे रत्न वापरू नये.

७. ३,१२,२१,३०,३९,४८ हि वर्षे ह्या अंकांच्या जातकांसाठी महत्वाची वर्षे असतात. ह्याच वर्षात ह्यांचा भाग्योदय होत असतो. (अंकुश नवघरे)

८. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस ३ अंकाच्या जाताकांसाठी शुभ मानले जातात. त्यांनी ह्या दिवशी महत्वाची कामे करावीत.

९. ५, १४ आणि २३ हता तारखा ३ अंकांच्या जाताकांसाठी अत्यंत मानल्या गेलेल्या असल्याने ह्या तारखेना कुठलेही महत्वाचे व्यवहार करू नयेत. (अंकुश नवघरे)

१०. अंक ३ च्या जातकांनी अंक ३, ६ आणि ९ हे अंक असणाऱ्या जाताकांशी विवाह करणे अत्यंत चांगले मानले गेलेले आहे.

११. अंक ३ च्या जातकांना वकिली, संशोधन, प्रकाशन, पुस्तकांचे दुकान इत्यादी क्षेत्रांत फायदा होतो.  

अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)

9004389042

माहिती आवडली असेल तर इथे लाईक आणि कंमेंट करायला विसरू नका.


टीप:- प्रत्येक भागासाठी दिलेले वॉलपेपर हे सिद्ध यंत्र आहेत, ही यंत्रे पांढऱ्या कागदावर लाल शाईने काढून तुमच्या पाकिटात ठेवली तरी तुम्हाला सकारात्मक अनुभव येतील. 



Comments

  1. Number 2 tantra is not seeing clearly .specially the right side down word .

    ReplyDelete
  2. माझी जन्मतारीख ९'१०_०५ १९७० आहे मी कोणतती जन्मतारीख समजू

    ReplyDelete
  3. खुप छान आणि परफेक्ट सांगितले

    ReplyDelete
  4. माहिती मस्त डिटेल्स

    ReplyDelete
  5. Majhi DOB 13-04-1990 ahe majha nub.4 asel ka mg sir..

    ReplyDelete
  6. खुप खुप धन्यवाद सर 🙏

    ReplyDelete
  7. खुप खुप धन्यवाद सर 🙏

    ReplyDelete
  8. छान माहिती भेटली दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...