तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक २
तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक २
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०७.०८.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
अंक २
ह्या अंकांच्या अमलाखाली २,११,२०,२९ ह्या जन्मतारखेना जन्माला आलेल्या जातकांचा समावेश होतो.
अंक २ वर चंद्र ह्या ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणून ह्या अंकाचा जास्त प्रभाव जातकाच्या मनावर होत असतो.
१. २० जून ते २७ जुलै, ऑक्टो. व मे हे महिने अंक २ च्या जाताकांसाठी शुभ मानले गेलेले आहेत.
२. २, ११, २०, २९ ह्या तारखा ह्या अंकाच्या जाताकांसाठी शुभ मानल्या गेलेल्या आहेत.
३. ह्या अंकाचे जाताकांचा स्वभाव सौम्य, निरुपद्रवी, सात्विक असला तरी खुप जास्त अस्थिर असतो. ते ५ मिनिटाच्या वर एके ठिकाणी कधी स्थिर बसू शकत नाहीत. त्यांच्या शरीराची ठेवण गोलाकार असते. ह्यांचे मत स्थिर नसून सतत बदलत असते. (अंकुश नवघरे)
३. ह्या अंकाच्या जातकांच्या मैत्री मुख्यतः १, ३, ९ ह्या अंकांच्या जाताकांशी चांगली होऊ शकते.
४. २ ह्या अंकाचे जातक स्वभावतःच कल्पना विलासात विराजमान होणारे, अत्यंत गतिमान, चंचल, विचार, स्वप्नाळू असतात. यांना अंतःप्रेरणा जबरदस्त असते. अध्यात्मावर विश्वास राहतो. परंतु मनाचे अतिशय हळवे असल्यामुळे कुठचीही कमतरता यांना सहन न होऊन हे स्वतःला लगेच आधारहीन समजू लागतात. मनाचा तोल लवकर ढळून विचारशक्ती व निर्णयशक्ती कमकुवत होऊन मनाच्या गोंधळामुळे आत्महत्येस लवकर प्रवृत्त होतात. सतत फिरायला ह्यांना खुप जास्त आवडते. उतावळ्या व अस्थिर स्वभावामुळे ह्यान जीवनात खुप त्रास सहन करावे लागतात.(अंकुश नवघरे)
५. अंक २ च्या जातकांना सफेद, हिरवा, फिक्का अथवा भगवा रंगाची विशेष आवड असते.
६. अंक २ च्या जातकांनी मोती किवा पाचू हि रत्ने वापरली तर त्यांचा भाग्योदय होण्यास सुरवात होते.
७. अंक २ च्या जातकांना आंबट व काही प्रमाणात खारट, फलाहार जास्त आवडतो तर जलाचे म्हणजे द्रव्य रुपी पदार्थ अतिशय आवडतात.
८. अंक २ च्या जातकांना मुख्यत्वेकरून पोटाचे विकार व मंद पचनक्रिया, फुफ्फुसांचे विकार सर्वात मुख्य मानसिक अवस्थेचे आजार जास्त प्रमाणात होतात, परतू हे आजार मनाच्या अवस्थेवर आधारित असल्याने त्यांनी आपल्या मानावे ताबा ठेवणे गरजेचे असते. (अंकुश नवघरे)
९. ११, २०, २९, ४७, ५६, ६५ हि अंक २ च्या जाताकांसाठी महत्वाची वर्षे असतात.
१०. मे, जुलै, ऑक्टोंबर हे महिने अंक २ च्या जाताकांसाठी महत्वाचे असतात.
११. अंक २ च्या शुभ तारखा २, ११, २०, २९ या आहेत.
१२. अंक २ चा शुभ वार हा सोमवार मानला गेलेला आहे.
१३. व्यवसायचा विचार करता २ अंकाचे जातकांमध्ये फिरते एजंट, फार्मासिस्ट, बँकिंग, हॉटेल, लेखक, ज्योतिषी ह्या व्यवसायात यश भरपूर लाभते.
१४. विवाहाचा विचार करताना अंक २ चे जातक २, ७, ९ ह्या अंकाच्या जातकांची वैवाहिक जोडीदार म्हणून निवड करू शकतात पण अंक ११ च्या जातकाशी विवाह राहिला दूर पण मैत्रीही करू नये. धन्यवाद.
अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
9004389042
माहिती आवडली असेल तर इथे लाईक आणि कंमेंट करायला विसरू नका...
टीप:- प्रत्येक भागासाठी दिलेले वॉलपेपर हे सिद्ध यंत्र आहेत, ही यंत्रे पांढऱ्या कागदावर लाल शाईने काढून तुमच्या पाकिटात ठेवली तरी तुम्हाला सकारात्मक अनुभव नक्कीच येतील.
खुप छान माहिती
ReplyDeleteKhup chaan mahiti sir
ReplyDeleteखुप सुंदर माहिती दिली आहे
ReplyDeleteखूपच छान माहिती, धन्यवाद सर
ReplyDeleteKhup Chan ani important information dili sir.Tsir.Thank you
ReplyDeletePerfect ..Swami Om
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteखुपच छान माहिती दिली
ReplyDeleteसर्वांचे खूप खूप धन्यवाद...
ReplyDeleteMast 👌🙏🙏
ReplyDeleteBhag ank 8 che kdhi publ
ReplyDeleteBhag ank 8 che publish kshi hoil sir pls sangave
ReplyDeletemaze konatehi kaam vyavasthit hot nahi, vayaktik ayushyat satat ulathapalath aste, krupaya kahi upaay sangal ka?
ReplyDelete29-3-1987 janmatarikh ahe