तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग २ "नक्षत्र" १. अश्विनी नक्षत्र...

तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग २ "नक्षत्र"


१. अश्विनी नक्षत्र...


लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)

(ज्योतिष विशारद)

प्रकाशन:- दि.२८.०८.२०२०

©Ankush S. Navghare ®२०२०

(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)



     नमस्कार मित्रानो नक्षत्र हा जन्मकुंडलीचा एक अविभाज्य भाग आहे. एकूण २७ नक्षत्र असतात. मंगल कार्य किंवा कुठल्याही शुभ कार्याच्या मुहूर्तासाठी नक्षत्रांचा आधी विचार केला जातो. पौर्णिमेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव हिंदू महिन्यांना दिलेले आहे. जसे मार्गाशीष महिन्यात चंद्र मृग नक्षत्रात असतो. ह्या नक्षत्रांच्या राशी अधिपती आहेत आणि ह्या राशींचे जे अधिपती ग्रह आहेत ते ह्या नक्षत्रांचे स्वामी ग्रह मानले जातात. ह्याप्रमाणे जातक ज्या नक्षत्रावर जन्म घेतो त्या नक्षत्राच्या स्वामी ग्रहाची महादशा त्याच्या जन्माच्या वेळी असते. अंकुश नवघरे.

     जसे आपल्या आयुष्यातील यश अपयश हे ग्रहांवर अवलंबून असते तसेच त्यावर नक्षत्रांचाही खूप मोठा प्रभाव असतो. जसे जातकाच्या कुंडलीतील एखादा ग्रह हा जरी चांगल्या परिस्थितीत असला तरी तो कुठल्या नक्षत्रात म्हणजे नक्षत्र स्वामींशी संबंधित आहे ह्यावरून तो कसे फळ देणार हे पाहिले जाते. ह्या लेखामध्ये मी नक्षत्रांबद्दल काही महत्वाची माहिती देणार आहे त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचे जन्मनक्षत्र कुठले आहे हे पाहून ह्या माहितीच्या आधारे काही प्रमाणात आपल्या समस्यांचे समाधान करू शकाल किंवा माहिती म्हणून ह्या लेखाचे जतन करू शकाल, कारण तसे पाहिले तर नक्षत्र हा एक खूप मोठा विषय आहे आणि तो पूर्णपणे इथे देणे शक्य होण्यासारखे नसले तरीही काही प्रमाणात फायदा नक्कीच होऊ शकतो. अंकुश नवघरे

     जसे की नक्षत्राचे योग्य दान दिल्यास कार्य सिद्धी अथवा रोग निवारण निश्चित होत असते. काही वेळेस काही नक्षत्रांमूळे किंवा ग्रहांमुळे काही समस्या निर्माण झालेल्या असतात जसे कार्यसिद्धी न होणे, दीर्घ आजार, मानसिक स्वास्थ्य नसणे, ई, त्यावेळी नक्षत्र देवतांची उपासना करून त्या देवतेचा जप-मंत्र, होम केल्यास देवता प्रसन्न होऊन कार्यसिद्धी होऊ शकते. धनिष्ठा, ष्टतर्क, पूर्वाभाद्र, उत्तराभाद्र, रेवती ह्या पाच नक्षत्रांना नक्षत्र पंचक म्हटले जाते. ह्या नक्षत्रात शुभ कार्य, घर बांधणी, गृहप्रवेश करू नये. ह्या नक्षत्रावर मृत्यू झाल्यास पंचक लागणे असे म्हणतात. अंकुश नवघरे.


अश्विनी नक्षत्र


     नक्षत्र मालेतील हे पहिले नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्राचे चारही चरण मेष राशीत आहेत. त्यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र म्हणून ओळखले जाते. ह्याचा आराध्यवृक्ष कुचला असून दान-अन्न, देवता-अश्विनीकुमार हे आहेत. या नक्षत्रावर पाय हे अवयव येतात. अश्विनी नक्षत्र हे अग्नी तत्वाचे असल्याने, प्रकृती उष्ण व पित्तकारक असते. ह्या नक्षत्राच्या जातकाना सतत डोके दुखण्याचा त्रास होतो. डोळ्यांचे विकार, उन्हात जाण्याने उन्हाचा अत्यंत त्रास होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी अश्विनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष ‘वासा’ (अडुळसा) सांगितलेला आहे. ह्यामुळे ह्या औषधींचा वापर केल्याने कफ  दोष, फुफ्फुसे, हृदयदोष नाहीसे होतात. अंकुश नवघरे.

      अश्विनी नक्षत्राचे दान ‘अन्न’ हे आहे. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तीनी नेहमी अन्नदान करत राहावे. घरी कोणत्याही कारणाने माणसांना बोलवून जेवायला घालणे. गरजू व्यक्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वारकरी यांना जेवायला घालणे ह्यांना फायद्याचे ठरते. तसेच ह्या नक्षत्राच्या देवतेचा जाप "ओं अश्विनीकुमारांभ्यां नमः। हा जप करण्याने खूप फायदा होऊ शकतो. अश्विनी नक्षत्रापासून ३ रे, ५वे, आणि ७ वे नक्षत्र ह्या जातकाना त्रासदायक असते.

      एक महत्वाचा उपाय म्हणजे अश्विनी नक्षत्रात रोगी आजारी पडल्यास गव्हाच्या पिठाची वानराची आकृती तयार करून तिच्या मुखात गुळ-भात ठेवून रोग्याच्या सर्वांगावरून तीन वेळा उतरवून दक्षिण दिशेस निर्जन जागेत ठेवल्याने, रोगी लवकर रोगमुक्त होतो, हा अनुभूती घेतलेला प्रयोग आहे. कुठल्याही शुभ कार्याला ह्या नक्षत्रावर सुरूवात केल्यास कार्यात यश मिळू शकते. हे नक्षत्र विद्याभासी असल्याने कुठलेही शिक्षण सुरु करताना ह्या नक्षत्राचा विचार करावा. औषधे ठेवण्याच्या जागी अश्विनीकुमाराचे चित्र लावल्याने औषधे जास्त परिणामकारक ठरतात. अंकुश नवघरे

      अश्विनी नक्षत्र मंगळवारी आल्यास गृहप्रवेश टाळावा अन्यथा काहीतरी अघटित घडू शकते. अश्विनी नक्षत्र चरमुखी असल्याने ह्या नक्षत्रावर प्रवास सुरु केल्याने तो लाभदायक ठरतो. तसेच नवीन गाडी, स्कुटर, ई वस्तू ह्या नक्षत्री खरेदी करण्याने खूप लाभ होतात, त्यांचे आयुष्य वाढते. वस्तू हरवली असेल आणि हे नक्षत्र असेल तर ती हरवलेली वस्तू निश्चितच पूर्व किंवा दक्षिण दिशेला मिळते. अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणावर जातकाचा जन्म झाल्यास गणेशोपासना करावी, दुसर्या चरणावर जन्म झाल्यास देवीची आराधना करावी, तिसऱ्या चरणावर जन्म झाल्यास गणपती व बालाजीची उपासना करावी आणि चतुर्थ चरणावर जन्म झाल्यास शंकराची आराधना करावी. असे केल्याने लवकर भाग्योदय होतो. लेख आवडला असेल तर कंमेंट, फॉलो, लाईक आणि शेयर करायला विसरू नका. काही प्रश्न असल्यास खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. 

 अॅड. अंकुश नवघरे.

(ज्योतिष विशारद)

(9004389042)

(संध्याकाळी 6 नंतर कॉल करणे)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...