तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक ४

 तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक ४

लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.११.०८.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)


अंक ४

ह्या अंकांच्या अमलाखाली ४, १३, २२, ३१ ह्या जन्मतारखेना जन्माला आलेल्या जातकांचा समावेश होतो.

१. अंक ४ वर हर्षल ह्या ग्रहाचा प्रभाव असतो.

२. १९ फेब्रुवारी पासून एप्रिल, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यात ४ ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो.

३. ह्या अंकावर हर्षल ग्रहाचा जास्त प्रभाव असल्या कारणाने ह्या अंकाचे गुप्त शत्रू जास्त असतात. अंक ४ च्या जातकांचा स्वभाव हा एकलकोंडा असतो. विरोधकांची अजिबात पर्वा या अंकाच्या जातकांना नसते. नेहमी उत्साही असतात कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करीत नाही. स्वभावामध्ये लहरीपणा असतो, कर्मक विचारांचा अतिरेक असतो, कोणत्याही चांगल्या घटनेकडे विरुद्ध दिशेनेच विचार असतो त्यामुळे आयुष्य हे पश्चाताप करण्यात जाते.

४. ह्या अंकाच्या जातकांना आकाशी आणि सौम्य गुलाबी ह्या रंगाची जास्त आवड असते. अंकुश नवघरे

५. गोमेत, निळा सफायर आणि टायगर्स आय हि अंक ४ ची भाग्यरत्न आहेत. अंकुश नवघरे

६. या अंकाच्या जातकांना कानाचे विकार जडण्याची शक्यता असते. अति विचार करण्याच्या सवयीमुळे निद्रानाश सारखे आजार हमखास या जातकांमध्ये आढळून येतात.

७. ४ , १३, २२, ४० ,४९ ,५८ ही वर्षे ह्या अंकांच्या जातकांसाठी महत्वाची वर्षे असतात. ह्याच वर्षात ह्यांचा भाग्योदय होत असतो. अंकुश नवघरे

८. शनिवार, सोमवार, रविवार हे दिवस ४ अंकाच्या जाताकांसाठी शुभ मानले जातात. त्यांनी ह्या दिवशी महत्वाची कामे करावीत.

९. ४, १३, २२, ३१, २, ११, आणि २० या तारखा ४ अंकांच्या जाताकांसाठी अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या असल्याने ह्या तारखेना महत्वाचे व्यवहार करावेत आणि ह्या तारखाना जर सोमवार असल्यास तो दिवस खूपच शुभ मानला जातो.

१०. अंक ४ च्या जातकांनी अंक १, २, ४ आणि ७ हे अंक असणाऱ्या जाताकांशी विवाह करणे अत्यंत चांगले मानले गेलेले आहे.

अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)


लेख आवडला असेल तर ब्लॉगवर फॉलो, लाईक आणि कंमेंट करायला विसरू नका.

वॉलपेपर मध्ये दिलेले यंत्र सर्वकार्य सिद्धी यंत्र असून एखादा चांगला मुहूर्तावर हे यंत्र काढताना पूर्वेकडे तोंड करून बसावे. हे यंत्र पांढऱ्या कागदावर किंवा भोजपत्रावर डाळिंबाच्या काडीने किंवा नसल्यास कुठल्याही इतर काडीने काढुन त्याची रोज पूजा करावी आणि पूजा पार्वती मातेस अर्पण करावी. हे यंत्र जवळ बाळगल्याने कामे सुरळीत होतात. 

Comments

  1. Khup chaan mahiti. Mazi 4 tarikh ahe. Khup goshti jultayat.
    Kadi ne kagdavar yantra kadhtana. Kontya shai cha vapar karu?

    ReplyDelete
    Replies
    1. अष्टगंध किंवा कुंकू

      Delete
    2. Thank u. Sadhay konta changla muhurta ahe sir?

      Delete
  2. छान माहिती

    ReplyDelete
  3. छान माहिती

    ReplyDelete
  4. खूप छान माहीती

    ReplyDelete
  5. खूप छान माहीती

    ReplyDelete
  6. मी वाचल्या प्रमाणे हर्षल एक स्फोटक ग्रह आहे. तसेच कुठल्याही ग्रहाचा परिणाम वर्ष (year) यावर होत असेल का? म्हणजे २०२० अंक ४ येतो आणि आता जी परिस्तिथी आहे त्याचा याचाशी काही संबंध असू शकतो का? तुमचा लेख व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो या बद्दल आहे पण जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यावर लेख लिहितो, धन्यवाद

      Delete
    2. वाचायला नक्की आवडेल🙏

      Delete
  7. खूप छान माहिती सर. खूप काही नवीन शिकण्यासाठी मिळतं.

    ReplyDelete
  8. आई वडील अशिक्षीत असल्याने किंवा इतर काही कारणांमुळे जातकला त्याची जन्म तारीख माहित नाही व शाळेत दाखला बनवताना टाकलेली तारीख ही अंदाजे लिहिली आहे. आशा जातकांनी कोणता अंक भाग्याकं म्हणून वापरावा.

    ReplyDelete
  9. आई वडील अशिक्षीत असल्याने किंवा इतर काही कारणांमुळे जातकला त्याची जन्म तारीख माहित नाही व शाळेत दाखला बनवताना टाकलेली तारीख ही अंदाजे लिहिली आहे. आशा जातकांनी कोणता अंक भाग्याकं म्हणून वापरावा.

    ReplyDelete
    Replies
    1. जो शाळेत टाकला आहे तोच, कारण सगळीकडे तोच उच्चारला जाणार.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...