तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक १

तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक १

लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०६.०८.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)



नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रा बद्दल कुतूहल नसेल असा माणूस सापडणे कठीणच आहे. सर्वाना असे वाटत असते की आपल्याला ज्योतिष शास्त्राबद्दल काही ना काही ज्ञान असावे. आपल्याला पण भविष्य कळावे, पण ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाचा पसारा पाहता खूप कमी लोक असतात जे ह्या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात आणि हल्लीचा ट्रेण्ड पाहता लोकांना हल्ली थांबायची इच्छाच नसते, त्यांना सर्व काही जलद गतीने व्हावे असे वाटत असते. ज्योतिष शास्त्राच्या खूप शाखा आहेत आणि त्यात अंकशास्त्राचाही समावेश होतो. प्रत्येक अंकावर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा प्रभाव असतो, आणि त्यामुळे त्या त्या अंकांच्या तारखांना जन्माला येणाऱ्या जातकांवर त्या त्या ग्रहांच्या स्वभावाचा प्रभाव पडत असतो. ह्याच सूत्राचा उपायोग करून आपण जर त्या अंकांच्या स्वभावांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला तर आपण आपल्यापुरते तरी ज्योतिष नक्कीच बनू शकतो, किंवा आपल्या आयुष्यात काही ना काही सकारात्मक बदल नक्कीच निर्माण करून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त १ ते ९ ह्या अंकांबद्दल जाणून घ्यायचे आहे कारण की जगातील सर्वच अंक ह्याच अंकांचे मूळ रूप आहेत. जसे १० ह्या अंकाची १+० अशी बेरीज केली तर आपल्याला एक हाच अंक प्राप्त होतो, म्हणजे जे नियम एक ह्या अंकाला लागू होतात तेच १० ह्या अंकालाही लागू होतात हेच ह्या शास्त्राचे सूत्र आहे. म्हणून आपण आजपासून रोज क्रमाने १ ते ९ ह्या अंकांपैकी रोज एकेक अंकांचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. 
 
अंक १

ह्या अंकांच्या अमलाखाली १, १०, १९, २८   ह्या जन्मतारखेना जन्माला आलेल्या जातकांचा समावेश होतो. 
१ ह्या अंकावर रवी म्हणजेच सूर्याचा प्रभाव असतो. रवी ह्या ग्रहाला सर्व ग्रहांचा राजा मानला गेलेला आहे. त्यावरून आपली आत्मशक्ती पाहिली जाते. तो आत्मशक्तीचा मुख्य स्रोत आहे. एप्रिल, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात रवीची स्पंदने जास्त प्रमाणात राहतात. तसेच प्रत्येक महिन्याच्या १, १०, १९, २८ ह्या तारखांवर रवीचे प्रभुत्व जास्त असते. रवीच्या प्रभावतील व्यक्ती विश्वासू, स्थिरदृष्टीचे, स्वाभिमानी आणि जबरदस्त आत्मविश्वास असणारे असतात. त्यांच्यात इतरांप्रति आदर व विश्वास ठासून भरलेला असतो, ह्यामुळे कधीकधी ह्यांची फसवणूक होऊ शकते. ह्यांच्या समोर कोणी रडले की हे लगेच पाघळतात. मागचा पुढचा विचार न करता स्वतःला काहीही न ठेवता सर्व दान करतात. अनेक गुणांचे संयमन असल्याने जीवापाड मैत्री करता रवी व्यक्ती अतिशय चांगली मनाली गेलेली आहे. 
राविप्रधान व्यक्तींना गतिमान संगीताची विलक्षण आवड असते.
१. अंक १ च्या जातकाना शक्यतो सफेद, सोनेरी, आकाशी रंगाची जास्त आवड असते.
२. ह्यांना रक्तदाब, हृदयरोग ह्या सारखे आजार होऊ शकतात.
३. १, १०, १९, २८, ३७, ४६, ५५, ६४, ७३, ८२, ९१ हे ह्या जातकांचे शुभांक आहेत, महिन्याच्या ह्या तारखांना ह्यांनी काम केले तर चांगले फळ मिळते. 
४. मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट हे महिने ह्या अंकांच्या जातकांसाठी विशेष लाभदायक असतात. 
५. रविवार, सोमवार ह्या दिवशी १, २, ४, ७, १९ या तारखा पडल्या तर ह्यांच्यासाठी तो दिवस अतिशय लाभदायक ठरू शकतो. 
६. ह्या अंकांच्या जातकांना माणिक हे रत्न खूप लाभदायक असे मानले गेलेले आहे.
७. व्यवसायाचा विचार करता मोठे सरकारी अधिकारी, कुशल राजकारणी, अध्यात्म व तत्व-ज्ञानी ह्या वर्गामध्ये हे अग्रेसर असतात. 
८. ह्या जातकानि अंक ४ किंवा ८ ह्या अंकांचा जोडीदार निवडला तर ह्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होऊ शकते. 
धन्यवाद..
अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
9004389042

माहिती आवडली असेल तर इथे लाईक आणि कंमेंट करायला विसरू नका.

Comments

  1. छान खूपच छान पुस्तक कुठे मिळेल सर

    ReplyDelete
    Replies
    1. पुस्तक लवकरच येणार आहे, असेच लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी ब्लॉग ला भेट देत जा.

      Delete
  2. खूपच छान माहिती

    ReplyDelete
  3. खुप छान माहिती,लवकरच सर्व अंकांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे.

    ReplyDelete
  4. खुप छान माहिती ,अंकशास्त्र आपल्या जिवनात किती महत्त्वाचे हे कळले.

    ReplyDelete
  5. खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद������

    ReplyDelete
  7. भाग्यांक आणि मुलांक यात फरक काय? कुठला अंक व्यक्ती वर जास्त प्रभावी असतो?

    ReplyDelete
    Replies
    1. जन्मतारखेचा अंक म्हणजे मूलांक आणि पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून आलेला अंक भाग्यांक असतो, सर्वात महत्वाचा अंक भाग्यांक असतो, पण तो विषय वेगळा आहे, इथे आपण भाग्यांक आणि मूलांक दोघांचा विचार केलेला आहे.

      Delete
    2. उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏

      Delete
  8. खुप छान माहिती दिलीत सर धनयवाद 🙏

    ReplyDelete
  9. सर्वांचे खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  10. छान माहिती, धन्यवाद

    ReplyDelete
  11. खूपच छान माहिती🙏

    ReplyDelete
  12. 8 अंक जोडीदार म्हणून कसा निवडायचा सर 8 म्हणजे शनी व 1 म्हणजे रवी व शनी व रवी दोघांचे आपआपसात वैर मग ?

    ReplyDelete
  13. Dada अंक शास्त्र या विषयी . माहिती खूप महत्वाची आहे आपली पुस्तकाची निर्मिती लवकर होवो. सर्वांना फायदा होईल आपण आपले कार्य चालू ठेवावे 🙏🙏🙏

    ReplyDelete
  14. Dada अंक शास्त्र या विषयी . माहिती खूप महत्वाची आहे आपली पुस्तकाची निर्मिती लवकर होवो. सर्वांना फायदा होईल आपण आपले कार्य चालू ठेवावे 🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...