जातक क्र. २

नाव:- सांगण्यास परवानगी नाही
जन्म तारीख:- 06/11/1988
जन्मवेळ:- 00:37am
जन्मठिकाण:- पुणे

प्रश्न:-
१. व्यवसायाने वकील पण व्यवसाय नीट चालत नाही
२. सतत आरोग्याच्या तक्रारी असतात
३. ज्योतिष शास्त्र शिकण्याची आवड
४. नजर लागते
५. पुढील शिक्षण घ्यायची इच्छा आहे
६. विवाह योग 

मार्गदर्शन

1. ह्यांच्या पत्रिकेत अष्टम स्थानात कुंभ राशीचा राहू आहे, ह्याचा अर्थ ह्यांच्या घराण्यात कुठल्यातरी स्त्री चा अपमृत्यु झालेला आहे, तसेच अष्टमतील राहू नेहमी आजार देतोच, आजाराचे निदान होत नाही, सतत काही न काही आजार होतात आणि त्याचा संबंध नजर लागण्याशी सुद्धा असू शकतो करण राहू हा जारन मारण साठी ओळखला जातो. 

2. अष्टमतील राहू चांगली फळे देत नाहीत, तसेच अष्टमात शनी असल्याने हाडांचे विकार इत्यादी होण्याचा संभव आहे, कारण शनी हा परत शष्ट स्थानात म्हणजे रोग स्थानातच बसलेला आहे. 

3. पराक्रमांत चंद्र शुक्र ही युती चांगली नसून त्यामुळेच कुठलेही कार्य केले तरी नाव लौकिक न मिळता बदनामी होते, 

4. ह्यांच्या पत्रिकेनुसर जर ह्यांनी क्रिमिनल साईड ला प्रॅक्टिस केली तर ह्यांची वकिली चांगली चालू शकते, पण न्यायचा कारक शनी हा षष्ठात आणि त्याची रास अष्टमात असल्याने वकिली जैसे थे अशीच चालणार, कर्म स्थानानुसार ह्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे पोलीस ऑफिसर, किंवा सरकार दरबारी मोठ्या ऑफिसर ची नोकरी असे आहे, 

5. राहू अष्टमत असल्यामुळे अमानवीय शक्तींकडून त्रास होतो कीवा त्या त्रास देऊ शकतात त्यासाठी रक्षा कवच घालावे.

6. धनस्थानात केतू असून तो सिव्ह राशीचा आहे म्हणजे केतू रवी ग्रहण योग तयार झालेला आहे कारण केतूला स्वतःची रास नाही, तो त्याची फळे देणार, केतू निरस ग्रह असल्याने तो प्रगतीसाठी अडथळे आणेल, उच्च शिक्षण पण होऊ देणार नाही, त्यासाठी रवी केतू ग्रहण योग शांती करावी लागेल. 

7. विवाह स्थानाचा स्वामी शनी असल्याने विवाह उशिरा म्हणजे वय वर्ष 30 ते 32 पर्यंत व्हायला हवेत, आणि तो शनी षष्ठात असल्याने विवाहाला जास्त विलंब लावत आहे, तसेच त्याची एक राहू सोबत असल्याने ही श्रापित योग निर्माण होऊन विवाहाला विलंब होत आहे. त्यासाठी श्रापित योग शांती करावी लागेल.

8. ह्यांना वाचा सिद्धी आहे, त्याचा उपायोग ज्योतिष शास्त्र साठी होऊ शकतो. 

9. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता राहू महादशा चालू आहे, राहू महादशेत माणसाची वाताहत होते, ह्यांचा राहू अष्टमात असल्याने ही अष्टमाची महादशा झाली, अष्टम स्थानावरून मान अपमान पहिला जातो, ह्या महादशेमुळे ह्यांचे सामाजिक नाव बिघडते, लग्न जमान्यात अडथळे हे सर्वच आहे. 

10. खालील उपाय केले तर परिस्थितीत लवकर सुधारणा होईल.

वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.

पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका. 











Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...