वेळ...
ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक संकेत... भाग २
वेळ....
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.०७.०५.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो कधी कधी काही जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करताना काही अगम्य अशा गोष्टी बाहेर येतात, पत्रिकेत सर्वकाही ठीक ठाक असते आणि समस्या काहीतरी वेगळीच असते, हे असे का होते त्याचे उत्तर माझ्याकडेही नाहीय, मीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की ज्योतिषांनी सर्व प्रकारच्या अनुभवांतून जायला तयार असले पाहिजे. कारण कोण जातक तुमच्यासमोर काय ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.(ANavghare)
हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे आजच एक ताईंचा मला कॉल आला होता. त्या ताईंना मी त्यांची पत्रिका पाहून ज्योतिष मार्गदर्शन केले होते आणि त्यानंतर काही प्रश्न असतील तर कॉल करा असे सांगितले होते. आज त्यांचा कॉल आला आणि बोलता बोलता त्या म्हणाल्या की आमच्या घरात खुपच प्रॉब्लेम चालू आहेत, कुठेच कसलाच मार्ग सापडत नव्हता, मी गोंदवलेकर महाराजांचा सद्गुरू मंत्र घेतलेला आहे. मी तुमचे लेख नेहमी वाचत असते पण कधी तुम्हाला कॉल कारावास वाटला नाही पण एकदा सद्गुरू मंत्र जपत असताना सद्गुरूंना कळकळीची विनंती केली की आता सहन होत नाहीय तर तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि त्यावेळी अचानक मला तुमचा चेहरा माझ्या बंद डोळ्यासमोर येऊ लागला, आणि आतून कोणीतरी म्हणाले की ह्या व्यक्तीला तुझी पत्रिका दाखवली तर तुझ्या समस्येवर निश्चित मार्ग सापडेल. असा दृष्टांत झाल्या नंतर शेवटी मी तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शनासाठी कॉल केला असे त्या ताई मला म्हणाल्या. ते ऐकून मला आश्चर्य ह्या साठी वाटलं की काही दिवसांपूर्वीही एक ताईंनी मला असेच काही सांगितले होते पण त्यावेळी त्यांना श्री स्वामी समर्थांकडून असा दृष्टांत झाला होता, पण मी तेव्हा ह्यावर जास्त लक्ष नाही दिले. मी असा विचार केला की, मी एक साधा ज्योतिष आहे, देव कशाला कोणाला माझे नाव सुचवतील. पण जेव्हा हे बऱ्याच लोकांनी मला सांगितले तेव्हा मला वाटले की ही सगळी सद्गुरू कृपाच आहे बाकी काही नाही.
सद्गुरुकृपा झाली की देव पण आपली मदत कारायला सरसावतात. कारण श्री गुरूचरित्रात म्हटलं आहेच की देव रागावला तर सद्गुरू वाचवू शकतात पण सद्गुरू रागावले तर देव पण वाचवू शकत नाही, म्हणून विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे आपले सद्गुरुदेव. श्री गुरूचरित्रात सद्गुरूंचा महिमा सांगणारे खूप अध्याय आहेत, मुळात संपूर्ण श्रीगुरुचरित्र हे सद्गुरूंचा महिमा सांगणारा अद्वितीय असा ग्रंथच आहे. मी वेळ मिळेल तसे श्रीगुरूचरित्राचे पारायण करत असतो. ते वाचत असताना मनासमोर देखावे उभे राहतात. मन भावावस्थेत जाते आणि तेथूनच काहीतरी दृष्टांत होऊन कोनाकोणाच्या समस्यांवर उपाय सापडतात. असे कित्येकदा झाले आहे, अगदी माझ्यासोबत पण झाले आहे, तो अनुभव मी नंतर केव्हातरी सांगीन पण मला एक अनुभव सांगावासा वाटतो तो हा की..(ANavghare)
साधारण चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा माझ्या बऱ्याच वाऱ्या गाणगापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ला होत असत. तिथून जाऊन आल्यानंतर मी श्रीगुरुचरित्र पारायण करायला घेत असे. पारायण करत असताना मन भावावस्थेत जात असे, उचंबळून येत असे, सद्गुरूनविषयी ची ओढ जास्त वाटत असे. मला त्यातील शिष्य शिरोमणी संदीपकची कथा खूप आवडते. त्याने आपल्या सद्गुरूंनाच सर्वस्व मानून महादेव आणि भगवान श्रीविष्णूंनी देऊ केलेल्या वरदनांनाही नकार देऊन शेवटी सद्गुरुंच्या आज्ञेनंतर मला सद्गुरुंच्या चरणांची सेवा आणि भक्ती निरंतर मिळावी असे वरदान मागून घेतले होते. किती ही मोठी गुरुभक्ती की जिथे संपूर्ण जगाचे ऐश्वर्य मागता आले असते पण फक्त सद्गुरुंची भक्ती मागितली, कारण सद्गुरूकृपा ज्याच्यावर होते त्याच्या ऐश्वर्या समोर जगातील सर्व ऐश्वर्य शून्य आहेत. असेच एकदा मला स्वतःला मुलंबाळ व्हावं म्हणून शेवटी एकदा मी संकल्पित पारायण करायला घेतलं होत. संकल्पित पारायण जेव्हा संपते तेव्हा आपला जो संकल्प आहे त्याचाच विचार परायणाच्या उद्यापनाच्या वेळी ठेवायचा असतो आणि आपली इच्छा बोलून दाखवायची असते, नाहीतर तो संकल्प कधी कधी पूर्ण होण्यात अडथळे येतात. पारायण संपले आणि मी संकल्पित विषय डोळ्यासमोर आणणार इतक्यात बाजूलाच ठेवलेला माझा मोबाईल कंप पावला. नकळतपणे माझे लक्ष मोबाईल स्क्रीनवर गेले. तो माझा मित्र दीपकचा कॉल होता, झालं, मी माझ्या स्वतःच्या संकल्पाचा विचार करणार इतक्यात मला दृष्टांत झाला की दीपकला शिर्डीला जाऊन साईबाबांना त्याची समस्या सांगून नवस घ्यायला सांग त्याचे काम होईल. ह्याआधी मी दिपकची पत्रिका पाहिली होती तेव्हा, त्यात त्याची शुक्राची महादशा चालू असून शुक्राची एक रास त्याच्या अष्टम स्थानात होता, त्यामुळे मुलं न होण्यामागे काही काही शारीरिक कारणे होती पण जेव्हा शुक्राची महादशा संपली तरिही त्याला मुलं होत नव्हते म्हणून मी त्याचे वास्तू परीक्षण करायला त्याच्या घरी गेलो असता मला त्याच्या घरातील त्याच्या रूमच्या मागच्या बाजूनेच जाणारा एक ओढा दिसून आला. ओढ्याला खूप जास्त पाणी नव्हते पण माझ्या दृष्टीने त्याच्या मुलं न होण्याच्या वैद्यकीय कारणामागे एक कारण त्या ओढ्यामुळे निर्माण झालेले होते म्हणून मी त्याला एकतर तो ओढा बुजव किंवा घर बदल असा सल्ला दिला होता. ओढा नैसर्गिक असल्यामुळे बुजवणे शक्य नव्हते म्हणून शेवटी त्याने भाड्याने दुसरीकडे घर घेतले. दुसरीकडे घर घेतल्यानंतर त्याचे सर्व रिपोर्ट पोसिटीव्ह आले पण तरीही सहा महिने उलटून गेले तरीही त्याला मुलं होत नव्हते. सर्व पत्रिका तपासली पण काहीच दोष दिसत नव्हता, जेव्हा काहिच दोष नसतात तेव्हा बाहेरचे काही असू शकते, ते मला कळते पण ह्याच्या बाबतीत नीट कळत नव्हते. त्यानंतर मी त्याला काही उपाय देऊन प्रयत्नात राहायला सांगितले होते. (ANavghare)
श्रीगुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या वेळी मी दिपकचा कॉल घेतला नाही पण त्याचे नाव समोर आल्याने त्याचा चेहरा समोर आला आणि नकळत पणे माझ्या तोंडून उच्चरले गेले की दिपकला लग्नाला आठ वर्ष उलटून गेली तरी अजून मुलबाळ नाही आणि तत्क्षणी मला तो दृष्टांत झाला की त्याला शिर्डीला जाऊन साईबाबांचा नवस घ्यायला सांग त्याचे काम होईल. नकळत माझ्या हातून ते घडले आणि माझा स्वतःचा संकल्पित विषय बाजूलाच राहिला. खरेतर नियतीची तीच इच्छा असावी, किंवा माझं प्रारब्ध तेच असावं किंवा माझी अजून वेळ आलेली नसावी असा विचार करून आरती झाल्यावर मी दिपकला कॉल करून सांगितले की तू लवकरात लवकर शिर्डीला जाऊन यावे असा मला संकेत आलेला आहे. दीपक माझा खूपच जवळचा मित्र आहे, त्यालाही माझ्यावर खूप विश्वास असल्याने तो म्हणाला, "तू बोल कब जानेका" तू साथ हॊगा तो जलदी ही जाऍंगे, मी म्हटले की ये संडे को जाते है,. दीपक ने त्यानंतर जाण्याची सर्व तयारी करून, सकाळच्या काकड आरतीची तिकिटे काढून, माझ्याकडून एक पैसा ही न घेता मला तिकडे घेऊन गेला, आणि त्यानंतर तीनच महिन्यांनी दीपक कडे गुड न्युज आली. त्याला आता मुलगी आहे. सांगायचे तात्पर्य हे आहे की जो पर्यंत तुमची वेळ येत नाही तो पर्यंत तुम्ही कितीही उपासना करा, पारायण करा, काहीच फायदा होत नाही, पण जर का तुमची वेळ आलेली असेल तर तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शक भेटतो आणि तुमची नय्या पार लावतो. पत्रिका पाहण्यासाठी आलेले जातक खूप घाई करत असतात, रोज मेसेज येतात झाली का बघून झाली का बघुन, त्यांना माझं सांगणं आहे की पत्रिका बघणे पोरखेळ नाही, एखादा उपाय चुकला तरी त्याची उलट फळे मिळू शकतात. काही लोक सांगतात की फी कमी नाही का होणार, तर त्यांना माझं इतकंच सांगणं आहे की पत्रिकेतुन तुमच्या पुढे येणाऱ्या भविष्या विषयी तुम्हाला कळणार आहे तर तुमच्या पूर्ण भविष्याची किंमत इतकी कमी आहे. तर शेवटी वेळ आल्याशिवाय काहीच घडत नाही हे ध्यानात ठेवा म्हणून त्यांना तशी उपरती होत असते. धन्यवाद.
अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
संपर्क:-९००४३८९०४२
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment