श्रावण प्रभावी तोडगे आणि मंत्र साधना...

श्रावण प्रभावी तोडगे आणि मंत्र साधना...

लेखक:- अॅड.अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.२९.०७.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो नाथ संप्रदायाने आपल्याला खूप काही दिलेले आहे. प्रसिद्ध शाबरी विद्या ही नाथ संप्रदायातूनच उदयाला आली. त्यातील काही मंत्र हे किलीत केलेले आहेत ज्यांना मुक्त करून त्यांची सिद्धी करावी लागते पण, आताही काही मंत्र असे आहेत जे स्वयंसिद्ध असून त्यांचा एक विशिष्ट संख्येने जाप केला असता ते फळ द्यायला सुरुवात करतात. हे सर्व मंत्र मी सुर्यग्रहणाच्या वेळी पोस्ट केलेले होते, त्यावेळी त्यांचे अनुष्ठान करून बऱ्याच लोकांनी अनुभव घेतला. परंतु ज्या लोकांना त्यावेळी ते सिद्ध करता आलेले नाहीत, त्यांनी ह्या पवित्र म्हणजेच श्रावण महिन्यात त्या मंत्रांची सिद्धी करायला घेतली तरी चालणार आहे. हे सर्व मंत्र मला माझ्या सद्गुरूंकडून प्राप्त झालेले होते. त्यांच्या आदेशाने मी ते तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे. सर्वांचे सद्गुरू शरीराने जरी वेगवेगळे असले तरी गुरुतत्व हे एकच आहे त्यामुळे कुठलीही शंका न घेता ह्या श्रावण महिन्याच्या पवित्र मुहूर्तावर येत्या सोमवार चे औचित्य साधून मंत्र साधना करायला घ्या ही नम्र विनंती. माझे काही चुकत असेल तर मोठ्या मनाने माफ करा. 

मंत्र

1.वाकसिद्धी प्रित्यर्थ सिद्धींकर मंत्र
ओं ह्रिम् कामिनी स्वाहा।
हा मंत्र सिद्ध करण्यासाठी साधकाने अनुष्ठानाला बसावे व नित्य ह्या मंत्राचा 3 माळ जाप करावा. एकूण असे अनुष्टान तीन महिने चालू ठेवावे. या काळात साधकाने सात्विक आहार घ्यावा. सत्य बोलावे व व्यवहारही सत्याला धरून करावा, त्यामुळे साधकास वाकसिद्धी प्राप्त होईल आणि सदैव टिकून राहील, मात्र त्यासाठी दारारोज 108 मंत्र म्हणणे गरजेचे आहे.

2. वाणीवेधशक्ती सिद्धीकर मंत्र
ओं ह्रिम् स्वाहा।
एकाच स्थळी व एकाच वेळी हा जाप साधकाने करणे आवश्यक आहे. जपाची जागा निवांत व मन शांत ठेवावे. जाप करताना सुगंधी धूप सोडावा. ह्या मंत्राचा पहिल्या दिवशी जितका होईल तितका जाप करावा परंतु जपसंख्या मोजून ठेवावी. पुढे रोज 1008 वेळा जपावा, जसजसा जाप 1.25 लाख च्या आसपास जाइल तसतसा अनुभव येईल. वाणीची वेधकशक्ती वर्धित होऊन तिचा प्रभाव ऐकनाऱ्यावर होऊन समोरचा प्रभावित होईल.

3. भूत, ग्रह, पातक दोषनिवारक सिद्धीकर मंत्र
हा मंत्र साधकाने पहिल्या दिवशी जमेल तितका जपून त्यानंतर पुढे रोज 108 वेळा जपावा. ह्या मंत्राच्या योगाने भूत, प्रेत, ग्रह, पातक, इत्यादी दोषांचे परिमार्जन होऊन ग्राहशांती होते, तसेच दारिद्य्र निवारण होऊन घरात सुखशांती येते.
मंत्र:- ओं नमः भवे भास्कराय। अस्माकं अमुक (पिडेचा उल्लेख करावा) सर्वग्रहणे। पिडानाशनं कुरु कुरु स्वाहा।

ह्यात मंत्र स्वतःसाठी करायचा असेल तर अस्माकं घ्यावे अमुक काढून टाकावे. दुसऱ्यासाठी करायचा असेल तर अस्माकं आणि अमुक काढून त्या ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्यावे.समजा माणसाचे नाव मुकुंद असेल तर मुकुंदस्य येईल. 

4. सर्वकार्य सिद्धीकर मंत्र
ह्या मंत्राची सिद्धी ग्रहण, होळी किंवा दिवाळीत केली जाते. परंतु अडचणीच्या काळात एखाद्या पवित्र मुहूर्तावर चालू करू शकता. पहिल्या दिवशी जास्तीत जास्त जाप करून त्यानंतर रोज 108 वेळा किंवा जास्त असे 21 दिवस करावा. त्यानंतर हवा तेव्हा त्याचा वापर करावा परंतु रोज कमीत 108 वेळा जाप करावाच. जपला सुरवात करण्यापूर्वी हेतू प्रकट करावा. 
हा मंत्र सर्व प्रकारच्या कामांनासाठी वापरला जातो. अजूनही काही गुप्त गोष्टींसाठी वापरला जातो परंतु त्याची वाच्यता इथे करू शकत नाही.
मंत्र:- 
ओं परब्रम्ह परमात्मने नमः।
उत्पत्तीस्थितीप्रलयकाराय, ब्रम्हहरिहराय, त्रिगुणात्मने, सर्व कौतुकनिदर्शय। दत्तात्रेय नमः। मंत्र तंत्र सिद्धिम् कुरु कुरु स्वाहा।
(ह्या मंत्राचा पुण्याच्या एक ताईंना खूप फायदा झाला हे त्यांनी स्वतः भेटून सांगितले होते)

5. सरस्वती प्रसन्न होण्यासाठी सिद्ध मंत्र
ह्या सिद्धमंत्र असून ह्याची सिद्धी करण्याची आवश्यकता नाही. ह्या मंत्राच्या योगाने आपल्याला वाचसिद्धी आणि दूरदर्शन सिद्धीची प्राप्ती होऊ लागते. ज्योतिष संगणाऱ्यांसाठी हा मंत्र म्हणजे कल्पतरू आहे. ह्या मंत्राच्या योगाने साक्षात सरस्वती माता जिभेवर प्रकट होऊन साधकाचे शब्द खरे होऊ लागतात परंतु त्यासाठी साधकाने सात्विक वृत्ती ठेवणे अत्यंत गरजेचे आहेच.
मंत्र:- ओं ह्रीम् एम् ह्रीम् ओं सरस्वतै नमः।

लेखात दिलेले सर्व प्रयोग तुम्ही करा अथवा करू नका परंतु लेखातील माहिती मोठ्याप्रमाणावर शेयर करून ती तुमच्या जास्तीत जास्त आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक आणि प्रियजनांपर्यंत पोहोचवून ह्या ग्रहण पर्वानिमित्ताने एक प्रकारच्या पुण्य कर्मात स्वतःला सहभागी करून घ्या ही विनंती. तुमचा एक शेयर एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो हे ध्यानात असू द्या. 

हे सर्व सिद्ध मंत्र असून एकदा ह्यांचा अनुभव घेऊन पहावा.

धन्यवाद 

अंकुश नवघरे...





Comments

  1. गुरुजी नमस्कार👏👏
    तुमचे सल्ले खूपच उपयोगी व अनुभवसिद्ध व लोककल्याणकारी आहेत.मी आताच या ब्लॉग ला जॉईन झालो आहे.गुरुजी हे तुम्ही दिलेले मन्त्र फक्त श्रावण महिन्यासाठी आहेत की इतर महिन्यात ही जप केला तर चालेल याचे मार्गदर्शन करावे किंवा इतर महिन्यासाठी वेगळे काही उपाय असतील तर मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  2. सरस्वतीचा मंत्र किती वेळ करावा यावषयी थोडं खुलासा करून सांगणे कृपया विनंती आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...