पारदेश्वर...

ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक संकेत... भाग ३

पारदेश्वर...

लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.१६.०६.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

     नमस्कार मित्रांनो कधी कधी काही जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करताना काही अगम्य अशा गोष्टी बाहेर येतात, पत्रिकेत सर्वकाही ठीक ठाक असते आणि समस्या काहीतरी वेगळीच असते, हे असे का होते त्याचे उत्तर माझ्याकडेही नाहीय, मीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की ज्योतिषांनी सर्व प्रकारच्या अनुभवांतून जायला तयार असले पाहिजे. कारण कोण जातक तुमच्यासमोर काय ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.(अंकुश नवघरे)
      तो अनुभव आठवला तरी काळजात चरर होत. कोणावरही अशी वेळ येऊ नये जी त्या कुटुंबावर आली होती. वास्तुदोषामुळे असाही प्रकार घडू शकतो ह्यावर सहजा सहजी कोणीच विश्वास ठेवणार नाही. त्या जातकाच्या जन्म पत्रिकेचा खोलवर अभ्यास करूनही काहीच हाताला न लागल्याने शेवटी त्याच्या घराचे वास्तू परीक्षणावरच जास्त भर द्यायचा निर्णय घेतला. त्या जातकाच्या घरी पाऊल ठेवलं तसा एक उग्र दर्प नाकात शिरला, मनात आलं, इतकी नकारात्मकता एखाद्या ठिकाणी असू शकते? मग देवघरात गेलो, सर्व देव दाटीवाटीने मांडलेले होते. त्यांच्या आजूबाजूला त्यांना फिरायला अजिबात जागा ठेवली नव्हती. त्यांना जस एकाच जागेवर जखडून टाकलं होत. अशा परिस्थितीत ते तरी मदतीला कसे धावून येणार. माझे सद्गुरू सांगायचे दोन देवांच्या मध्ये त्यांच्या वहिवाटा साठी जागा असावी नाहीतर त्यांच्यातील भांडणे आपल्यात होऊ लागतात. घराची शांती भंग होते, आणि आपल्याला मुख्य कारण कधीच कळत नाही, म्हणून घरात काहीही झालं तर पहिला आपला देव्हारा चेक करायला हवा. त्यांच्या देव्हाऱ्यात दगडाच एक शिवलिंग स्थापित होत, ते पाहून डोक्यात एकच सणक गेली. अजूनही कित्येक लोकांना माहीत नसते की देव्हाऱ्यात पारद शिवलिंगाशिवाय इतर कुठलेही शिवलिंग कधीच स्थापन करू नये आणि केलंच चुकून तर ते एकदम छोट म्हणजे अंगठ्याच्या वरच्या भागाच्या उंची इतकं असावं, पण त्याहून मोठं नसावं नाहीतर हा मोठा दोष लागतो असे माझे सद्गुरू मला सांगायचे. मुळात दगडी शिवलिंग घरात स्थापन करूच नये. पूर्वीच्या काळी देवघरं वेगळ्या खोलीत असायची, ते एक मंदिर सारखाच असायचं म्हणून हे चालवून घेतलं जायचंप किंवा चालायचं. आपणच असे कित्येक वास्तुदोष घरात स्वतःहून निर्माण करत असतो आणि मग त्यामुळेच बाहेरच्या शक्तींना पण घरात घुसायला वाव मिळतो. (अंकुश नवघरे)
       घरात एकामागोमाग एक असे पाच मृत्यू झालेले होते, आधी मोठया भावाने गळफास लावून घेतला, मग वडील हार्ट अटॅक ने गेले, मोठ्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा अकॅसिडेंट मध्ये मृत्यू झालेला, लहान बहीण न्यूमोनियाने गेली आता आई, मुलगा आणि त्याच्या बायकोशिवाय एकमेकांना दुसरा कोणाचाच आधार राहिला नव्हता. ते त्या घरात आल्यापासून काही चांगलं झालं असेल असे त्यांना आठवतही नव्हतं. सततची आजारपणं, पैशाच्या समस्या, घरातील लोक चांगली कमावती असूनही पैसे न टिकणे, भांडणे, घरात कोणाला मुलबाळ नाही, मनाला शांती नाही, सुख जे काही असते ते त्या घराने कधी अनुभवलेलच नव्हतं, असे एक ना अनेक समस्यांनी ते घर घेरले होते. खरेतर हा अनुभव मला लिहायची इच्छाच होत नव्हती पण म्हटलं कळुदे त्या नास्तिक जागालाही की अशा गोष्टीही घडतात, त्याला शास्त्रीय आधार असतो. माझे पूर्ण घर फिरून झाले, हे घर जुने पिढ्यांपिढीचे होते, पण बांधकाम इतके मजबूत की, आताच्या घरालाही लाजवेल असे, त्यामुळे वास्तूला कुठे नाव ठेवायला जागा शिल्लक नव्हती. मी माझा पहिला प्रश्न विचारला, हे सर्व कधी पासून सुरू झालं? त्याने सांगायला सुरवात केली, हे सर्व खूप आधीपासूनच सुरू होत पण कदाचित आमच्या लक्षात आले नसावे, ह्या घरात आल्यानंतर माझ्या जन्माच्या आधी माझ्या आईची दोन मुलं गेली, त्यानंतर माझी मोठी बहीण, मग मोठा भाऊ मग मी आणि त्यानंतर लहान बहीण जन्माला आलो. त्यानंतरही दिवस सुखाचे असे नव्हतेच. माझें वडील सरकारी खात्यात मोठ्या पदावर होते, मान मरातब होता, पगार ही चांगला होता, पण महिना अखेरीस हातात काहीच नसायचे, कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यांच्या पगारात अजून दोन कुटुंबाचं भागल असत पण आमचं भागत नव्हतं, अर्थात आम्ही लहान असल्याने फक्त हे कांनावर पडायचं, त्याची झळ आमच्यापर्यंत पोहोचायला अजून उशीर होता. माझ्या आईला बोलताना नेहमी ऐकायचो की नक्कीच ह्या वास्तूत काहीतरी दोष आहे पण माझ्या वडिलांचा हे सर्व पटायच नाही, त्यांना वास्तुदोष इत्यादी कशावरच विश्वास नव्हता. त्याकाळी इतकं चांगलं घर तस स्वस्तात मिळालं म्हणूंन घेतलं, सुरवातीला घरात थोडिशी डागडुजी करून घेतली. असेच दिवस जात होते, आम्ही सर्व मोठे झालो, पण घरात सतत आजारपण असायचं, काहींना काही त्रास असायचाच, कधी कधी बाबांनी दुसरं घर शोधायचा खूप प्रयत्न केला, पण काही ना काही होऊन व्यवहार मोडायचा, आणि नंतर तो विषय मागे पडायचा. (अस म्हणतात की काही दूषित घर आपल्या मालकांना सोडायला तयार नसतात.) नंतर मोठ्या बहिणीचे लग्न झाले, मग दादाला नोकरी लागली म्हणून तो दुसऱ्या शहरात गेला, त्याने तिथेच लग्न केलं, काही दिवसानी लहान बहिणीच लग्न झालं मग मीही माझं लग्न उरकलं. नंतर एकदिवस अचानक दादाचा कॉल आला की काहीतरी कारणाने त्याची नोकरी गेली आणि तो त्याच्या बायकोला घेऊन इथेच राहायला आला, त्या दिवसापासून त्यांच्यात सतत वाद होत. स्थैर्य नीट नसल्याने त्यानी मुला बाळांचा कधी विचार केला नाही, शेवटी भांडणे विकोपाला जाऊन एक दिवस त्याची बायको त्याला सोडून गेली, तो खूप खचला आणि नेहमी एकटाएकटा राहू लागला. अशातच एक दिवस त्याने गळफास लावून घेतला, आम्ही काही करायच्या आताच तो आम्हाला कायमचा सोडून गेला होता. आम्ही सर्व तुटून गेलो, वडील तर कोसळलेच, त्यांनी तर अंथरूणच पकडलं. एकदिवस मोठ्या ताईंच्या आणि तिच्या यजमानांच्या अकॅसिडेंट ची बातमी आली, त्यानंतर काही दिवसानी वडीलही अचानक अटॅक ने गेले. वाडीलांनंतर आमचा तर आधारच गेला होता. एक दिवस लहान बहीण आईला भेटायला घरी आली आणि किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तीही देवाघरी गेली. त्या दिवसानंतर मला असे वाटायला लागले की हे होण्यामागे नक्कीच काहींना काही कारण असावे. पण मला असल्या कुठल्याच गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. तरीही मी कुठे कुठे माहिती काढायला सुरवात केली. घराचा पूर्व इतिहास काढला, पण त्यात असेच दिसून आले की पाहिले ज्याच्या ताब्यात हे घर होते ते चांगले सधन होते. मग मी एक वास्तू परिक्षकला बोलावले, त्याने सांगितले की घरात सर्वकाही वास्तूप्रमाणेच आहे, कसलाच दोष नाही. शेवटी मी हरलो. काही दिवसानी माझी बायको खूप आजारी पडली, टेस्ट केली असता तिला गर्भाशयाचा कॅन्सर आहे असे सांगितले, आम्हाला धक्काच बसला, कारण आम्हाला मुलं होण्यात पण अडचणी येत होत्या. पण तो नुकताच पहिली स्टेज ओलांडून पुढे गेला होता, बरा होण्यासारखा होता, पण आम्ही दोघेही आता हादरलो होतो. ह्यावेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचूकली की आता पाचवा बळीही ह्या घरात जातो की काय. मला रडू कोसळले, पुढे तो म्हणाला की, मध्यंतरी मी एकदा कुठेतरी तुमचे पाताळ भैरवी नावचे आर्टिकल वाचले होते, त्यावरून मला असे वाटले की तुम्हीच मला ह्या संकटातून बाहेर काढू शकता, म्हणून तुमच्याशी संपर्क साधला. मी त्याला म्हटले की मी एक साधा ज्योतिषी आहे, आणि वास्तू परीक्षण करतो, तरीही मी प्रयत्न करीन, बाकी सर्व परमेश्वराची इच्छा. (अंकुश नवघरे)
       ठरल्याप्रमाणे मी त्याच्या घराला भेट देण्यासाठी निघालो असता गाडीचा टायर पंचर होणे, गाडी मध्येच बंद पडणे असे प्रकार घडले, पण शेवटी मी पोहोचलोच. सर्वात आधी मी त्याची जन्म पत्रिका पाहिली, कारण माझी पद्धत हीच आहे, जन्म कुंडलीवरून वास्तुदोष कळतात, बरंच काही कळू शकते, शनी मंगळ सारख्या युती असलेल्या पत्रिकांच्या जातकाना नेहमी वास्तूदोष असलेली घरेच मिळतात असे पाहण्यात आलेले आहे. चतुर्थात राहू, केतू, शनी, मंगळ असणाऱ्यांनी आपली वास्तू नक्कीच चेक करावी. त्यांच्या वास्तूत नक्कीच दोष असतो किंवा त्यांना दोष वाली वास्तू किंवा श्रापित वास्तू पण मिळते. ह्याच्या चतुर्थात राहू आणि मंगळ युती होती. तसे वरकरणी पाहिले तर, घरात कुठलाच वास्तूदोष दिसत नव्हता. पण घरात शिरल्या बरोबर मला काहीतरी विचित्र जाणवले होते आणि एक उग्र दर्प नाकात शिरला होता. देव्हाऱ्याचे इत्यादी दोष त्यांना सांगून मी एक जागेवर बसून आधी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित केले. मग एक दीर्घ श्वास घेऊन माझ्या पद्धतीने डोळे मिटून ध्यान लावले. जेव्हा आपण एखाद्या घराचे वास्तू परीक्षण करायला जातो त्यावेळी काही नियंम कटाक्षाने पाळावे लागतात, ते म्हणजे त्या घरातील पाणीही न पिणे, आधी आपला कुठला स्वर चालू आहे हे पाहून त्याप्रमाणे पुढची पावले उचलणे. हे नियम नाही पाळले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच जेव्हा तुम्ही कुठे वास्तू परिक्षणाला जाता तेव्हा तुम्हाला तिकडच्या समस्यांमुळे खूप विरोध होऊ शकतो, कारण त्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तिथे पसंत करत नाही, त्यामुळे रक्षात्मक तयारी करूनच अशा ठिकाणी जायला हवे नाहीतर काही वेळा तुमच्या जिवावरही बेतू शकते. डोळे मिटून ध्यान करत असताना (ही माझी पद्धत आहे) मी माझ्या सद्गुरूंना विनंती करत होतो की ह्या घरातील दोष मला माझ्या डोळ्यांनी दिसत नाहीय म्हणून तुम्ही काही संकेत देण्याची कृपा करावी. हे करत असताना माझ्या डोळ्यासमोर आधी जुन्या काळातल्या जेवण शिजवायच्या चुली आल्या, त्यानंतर एक प्रखर आणि तेजस्वी प्रकाश दिसून त्यातून एक पारद शिवलिंग प्रकट झाले. त्याकडे ध्यानातून एकटक पाहत असताना मला अचानक माझ्या सद्गुरूंचे बोल आठवले, एकदा ते म्हणाले होते की, पारद शिवलिंग कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नाहीसे करण्यात सक्षम असते. (अंकुश नवघरे)
       त्यांचे ते बोल आठवून आणि ध्यानात दिसलेले पारद शिवलिंगाच्या तेजाने मला संकेत मिळाले की ह्या जातकाच्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना केली तर त्याच्या घरातील वास्तुदोषाची उकल होऊन तो नष्ट करता येईल. त्यामप्रमाणे मी त्यांना सांगितले की तुम्हाला पारद शिवलिंगाची स्थापना तुमच्या घरात करावी लागेल. त्यावर ते म्हणाले की तुम्हाला जे योग्य वाटते ते करा पण आम्हाला ह्या सर्वातून बाहेर काढा. त्याबरोबर मी उद्या येतो असा त्यांचा निरोप घेऊन माझ्या सद्गुरूंनी सांगितलेल्या पारदेश्वर सिद्ध विधीने संस्कारित असे एक ग्रहण काळात सिद्ध केलेले पारद शिवलिंग दुसऱ्यादिवशी त्यांच्या घरी स्थापना करण्यासाठी घेऊन गेलो, त्यादिवशी ही आदल्या दिवशी सारख्या काही न काही अडचणी येतच होत्या. त्या दिवशी त्यांच्या घरचे वातावरण एकदम प्रसन्न वाटत होते. जाताना घराच्या बाहेर अचानक भारद्वाज पक्षाचे दर्शन झाल्याने नक्कीच काहीतरी शुभ घडणार असे प्रतीत होत होते. शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना झाल्यानंतर एक खूप प्रसन्न अशी चेतना मनात निर्माण झाली होती.  आदल्यादिवशी नाकात शिरलेला उग्र दर्प कुठल्याकुठे पळून गेला होता. अचानक एक संकेत आला की जातकाला रात्री पडणारे स्वप्न अवलोकन करायचे होते, त्यातुनच कदाचित घरातील वास्तूदोषांची उकल होणार हाती. मी त्याप्रमाणे त्यांना सांगून त्यांचा निरोप घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या कॉल ची वाटत पाहत असताना त्याचा कॉल आला. ते खुप भारावल्या सारखे वाटत होते, त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता, त्यांनी मला ताबोडतोब त्यांच्या घरी बोलावून घेतले. घरी गेल्यावर त्यांनी सविस्तरपणे त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितले. त्यात त्यांना त्यांचे किचन दिसले आणि किचन मध्ये पूर्वीच्या काळच्या जेवण बनवायच्या चुली दिसल्या. मलाही ध्यानात चुली दिसल्या होत्या. मी त्यानंतर किचन मध्ये पेंडुलम वापरून एक जागा निर्धारित केली आणि त्यांना सांगितले की आपल्याला ह्या जागेवर खणावे लागेल. त्यांनी माणसांना बोलावून खणायला सुरवात केल्यानंतर त्याठिकाणी २ चुली आणि १ भट्टी दिसून आली. त्यासंबंधी त्यांना विचारणा केली असता त्यांच्या आईने मला सांगितले की ज्यावेळी घर घेतले तेव्हा ह्या चुली इथे होत्या पण त्या काढल्या असत्या घराच्या मूळ आखड्याला इजा पोहोचत असल्यामुळे आम्ही त्या तशाच ठेऊन त्या बुजवून टाकल्या आणि त्यावर किचनचे काम करून घेतले होते. झाला सर्व प्रकार आता माझ्या लक्षात आला होता. खरंतर आधी मला ह्या गोष्टीची शंका होतीच पण खात्री नव्हती. त्यानंतर त्यांनी त्या सर्व चुली पूर्णपणे काढून टाकल्या आणि परत बांधकाम केले. आज एक वर्ष जास्त होऊन गेले असेल त्यांच्या घरात आता सर्वकाही छान चाललं आहे, त्यांच्या पत्नीचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यांच्या घरात लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. (अंकुश नवघरे)
      माझे सद्गुरू मला एकदा म्हणाले होते की ज्या घरात कोठेही जमिनीच्या पातळीच्या खाली तयार केलेली चूल किंवा भट्टी असेल पण नंतर ती नुसती माती टाकून बुजवली असेल तर ती कायमची चूल असे मानावे, तिचे अस्तित्व तिथे कायम असते. अशी चूल ज्याच्या घरात असेल अशा जातकाच्या घरात जेव्हा पुढे मुलगा जन्माला येईल आणि त्याच्या आठव्या स्थानात मंगळ असेल, तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर त्या जातकाच्या घरात आणि त्याच्या जवळच्या नातलगांच्या घरामध्ये मृत्यूचे तांडव सुरू होईल, जणूकाही त्या भट्टीत सर्वकाही जळून बेचिराख होईल. ह्यावर फक्त एकाच उपाय असतो, तो म्हणजे ती चूल पूर्णपणे खणून काढून त्याचा एक ना एक दगड किंवा माती वाहत्या पाण्यात सोडून देणे. माझ्या पाहण्यात असे आलेले आहे की, काही लोकांना सवय असते की एखादे जुने घर पाडले असता त्यातील काही चांगल्या गोष्टी काढून नवीन घरासाठी त्या वस्तूंचा वापर केला जातो, ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे, ह्याने त्या जुन्या घरातील नकारात्मक ऊर्जा, नवीन घरात प्रवेश करत असते असा माझा अनुभव आहे, अशावेळी नवीन घराचे काम कुठे ना कुठे अडकत राहते, लवकर पूर्ण होत नाही. हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे ह्या सुर्यग्रहणाच्या निमित्ताने वास्तुदोषावर पारद शिवलिंगाचे महत्व विशद करणे हा आहे. (अंकुश नवघरे)
      पारा हा भगवान शंकरांचे वीर्य मानला जातो. अभ्रकस्तव बीजं तू, ममं बीजं तू पारद: अनर्योर्यमिलनं देवि मृत्यु दारिद्रय नाशनं, असे वर्णन रसेश्वरदर्शनात केलेलं आढळून येते. काही वनस्पतींच्या रसाचे पाऱ्यासोबत मिश्रण करुन विशिष्ट वेळी पाऱ्याचे स्तंभन करून त्याला शिवलिंगाचा आकार दिला जातो किंवा शिवलिंग बनवले जाते. ह्यासाठी उच्च कोटींची साधना येत असणेही तितकेच महत्वाचे आहे. पारद शिवलिंगात पारा हा योग्य प्रमाणातच असावा लागतो तरच त्याचे फळ मिळते. परंतु ते योग्य मुहूर्तावर बनवलेलं आणि सिद्ध केलेलं असणं अत्यंत गरजेचं असत. अशा प्रकारे निर्माण केलेल्या पारद शिवलिंगात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. त्याच बरोबर पारद शिवलिंग हे भयनाशक, शिवपूजकांसाठी श्रेष्ठ, अविद्यानाशक, शत्रूपीडा नाशक आणि सर्व संकटांचा नाश करणारे असते. तसेच ते त्याची पूजा करणाऱ्या पूजकाचे सर्व पाप हरण करून त्याला सुख, समृद्धी, धन, संपदा, विद्या प्रदान करते आणि त्याच बरोबर अडकलेली, रेंगाळलेली कामे होणे, अडकलेले पैसे येणे, कर्जमुक्ती, यश, दीर्घायुष्य, संतती, आरोग्य देऊन त्याचे सर्व बाजूने रक्षण करते, अपमृत्यु टाळते. जिथे पारद शिवलिंगाची स्थापना होते अशा वास्तूत कुठल्याही प्रकारचे भय नांदत नाही, करणी, बाधा, नजर, लक्ष्मी बंधन ह्यासारखे प्रकार घडत नाहीत, त्या घरातील कुठल्याही प्रकारचा वास्तूदोष समुळ नष्ट होतो आणि तिथे सुखसमृद्धी नांदते. तुम्हीही अशाप्रकारे तुमच्या घरातील वास्तू परीक्षण करून वास्तुदोष असेल किंवा नसेल, पारदेश्वराची सेवा करून तुमचे आयुष्य सुखी करून घ्यावे. लेख कसा वाटला हे सांगायला विसरू नका. काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या नंबर वर उद्या संध्याकाळी ७ नंतर संपर्क करा, किंवा मेसेंजर ला संपर्क करा.
धन्यवाद...
अॅड. अंकुश नवघरे.
(ज्योतिष विशारद)
संपर्क ९००४३८९०४२

वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.

लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका. 




Comments

  1. मला हे पारद शिवलिंग मिळेल का??

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...