जातक क्र. ६
नाव : सांगण्यास परवानगी नाही
जन्म तारीख:- १३.०७.२००२
जन्मवेळ:- ९.१८ सकाळी
जन्मठिकाण- मुलुंड मुंबई
प्रश्न
१. मुलगा ऐकत नाही, सारखा मोबाईल वर पबाजी खेळत असतो
२. शिकण्याची इच्छा आहे पण अभ्यास करायचा कंटाळा करतो
३. घरातले काम करत नाही
४. आता १२ वि कॉमर्स परीक्षा दिली असून त्याला मास मीडियात जायचे आहे तर पुढे कुठल्या क्षेत्रात प्रगती आहे.
मार्गदर्शन
1. लग्न स्थानी चंद्र माणसाला चंचल बनवतो, ह्याच्या लग्न स्थानी चंद्र आणि शुक्र दोन्ही आल्यामुळे चुकीचा योग निर्माण झालेला आहे, ह्या योगामुळे त्याचा स्वभाव अजूनच चंचल आणि विलासी होऊ शकतो, चंद्र म्हणजे चंचलता आणि शुक्र म्हणजे विलासी स्वभाव. अशी माणसे कोणाचे ऐकत नाहीत आणि स्वतःच्या धुंदीत राहतात.
2. ह्याच्या कर्म स्थानात शुक्राची रास असल्याने आणि शुक्र लग्नात असल्याने ह्याचा उत्कर्ष कला क्षेत्रात होणार आहे, मास मीडिया हे कला क्षेत्राशी संबंधात आहे, पण कर्म स्थानात शनी आणि राहू हा श्रापित योग आलेला आहे त्यामुळे भविष्यात ह्याला वाईट संगत, व्यसन इत्यादी लागण्याची संभावना आहे,
3. ज्यावेळी कुटुंबात कुठल्यातरी व्यक्तीचा अपमृत्यु झालेला असतो त्यावेळी हा योग्य बनतो, हा योग अत्यंत वाईट मनाला जातो, तो ज्या स्थानात येतो ते स्थान पूर्णपणे खराब करतो, ह्याच्या कर्मस्थानि हा योग् आलेला आहे, कर्म स्थानावरून माणसाचे करियर, नोकरी तसेच वागणूक आणि कर्म पाहिली जातात. ह्या योगाचे परिमार्जन होण्यासाठी श्रापित योग शांती करावी लागेल.
4. ह्याच्या चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ असून तो व्ययस्थानात बसलेला आहे, त्यामुळे शिक्षणात अडथळे संभवतात, तसेच चतुर्थ स्थानात वृश्चिक चा केतू असल्यामुळे केतू मंगळ ग्रहण योग निर्माण झालेला आहे, त्यामुळे चतुर्थ स्थानाला बळ नाही, चतुर्थ स्थानावरून आई पाहिली जाते, चतुर्थातील केतू मूळे आई आणि वडिलांशी पटणार नाही किंवा थोडे कमी पटेल.
5. बाकी पत्रिका उत्तम आहे, वर सांगितलेल्या योगांची शांती करून घेतली तर आणि जे उपाय देणार आहे ते करून घेतले तर स्वभावात निश्चितच सुधारणा होईल
6. सध्या शुक्राची महादशा चालू आहे आणि त्यात गुरुची अंतर्दशा जानेवारी 2021 पर्यंत आहे आणि शुक्राची महादशा ही 2028 पर्यंत चालू आहे, म्हनजे लग्न स्थान, कर्म स्थान आणि पराक्रम स्थान सक्रिय आहेत, हा काळ प्रगतिकरक आहे,
7. पण जानेवारी 2021 पर्यंत हावितशी प्रगती दिसणार नाही कारण गुरूच्या अंतर्दशे मुळे व्यवस्थान आणि अष्टम स्थान सक्रिय आहेत. जानेवारी 2021 नंतर यशाची घोडदौड चालू होईल पण दिलेले उपाय केले तर त्यात यश मिळेल.
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment