नियती...
ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक संकेत... भाग १
नियती....
लेखक:- अॅड.अंकुश नवघरे., (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- १३.०४.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो कधी कधी काही जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करताना काही अगम्य अशा गोष्टी बाहेर येतात, पत्रिकेत सर्वकाही ठीक ठाक असते आणि समस्या काहीतरी वेगळीच असते, हे असे का होते त्याचे उत्तर माझ्याकडेही नाहीय, मीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की ज्योतिषांनी सर्व प्रकारच्या अनुभवांतून जायला तयार असले पाहिजे. कारण कोण जातक तुमच्यासमोर काय ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.(ANavghare)
नमस्कार मित्रांनो आज मी जो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो वेगळा असा आहे. मी ज्योतिष पाहतो, मार्गदर्शन करतो, कित्येक लोकांना त्याचा गुण आलेला आहे. एकदा माझ्याकडे पत्रिका पाहिल्यावर मला त्या जातकाने कधीही संपर्क केला तरी मी त्याची विनामूल्य मदत करतो कारण माझ्या सद्गुरुंचा तसा आदेशच आहे की, कोणालाही खाली हात पाठवू नकोस, कारण येणारा जातक हा पण ईश्वरीय अंश असतो. गुरू वाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी असे म्हटले गेलेले आहे. मला माझ्या सद्गुरूंकडून काही मंत्र सिद्धी पण मिळालेल्या आहेत ज्याच्या साहाय्याने मी लोकांना इंद्राजाल, हातजोडी, रुद्राक्ष, वैजयंती माळा, व्यवसायाच्या भरभराटी साठी काळी हळद पासून बनलेली वस्तू ह्या सारख्या वस्तू बनवून दिलेल्या आहेत आणि लोकांना त्याचा गुण पण आलेला आहे, असे असले तरी त्याला अपवाद म्हणून नियती नावाची एक गोष्ट आहेच. पत्रिकेतील काही ग्रह हे इतके शक्तिशाली असतात की त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी ते कुठल्याही पातळीवर जाऊ शकतात किंवा काहीही करू शकतात. मला पूर्वी हे सर्व खोट वाटायच की ग्रह हे कसं काय घडवू शकत असतील. जर का आपण त्यावर उपाय केले तर ग्रहांची काय बिशाद की ते काही घडवतील, पण मित्रांनो त्या एक घाटनेनंतर मला विश्वास पटला की हे सर्व सत्य आहे.(ANavghare)
त्यावेळी मी मोफत पत्रिका मार्गदर्शन करायचो, कधी कोणी खूपच आग्रहाने दक्षिणा देऊ केली तर त्याला सांगायचो की ह्या पैशात तू एखाद्या गरिबाला अन्नदान कर. पण मित्रानो कधी कोणाला फुकटात मार्गदर्शन करू नये आणि कोणी घेऊ पण नये कारण जर का मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही अध्यात्मिक पातळीची असेल तर त्याच्या मागे त्याच्या सद्गुरूंचे आशीर्वाद आणि शक्ती कार्य करत असते, ती शक्ती पाहत असते की जर आपल्या साधकाला कोणी मदत करत असेल किंवा निस्वार्थी पणे दक्षिणा देत असेल तर तीही त्याची मदत करायला मागेपुढे पाहत नाही आणि हेच ते कारण आहे की मी आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेल्या ९९% जातकाना गुण आलेलाच आहे कारण ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सद्गुरू परंपरेशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे सद्गुरू त्यांचा कैवार घेणारच.(ANavghare)
असच एकदा मी माझ्या ऑफिस ला बसलो असताना माझा एक मित्र त्याच्या सोबत त्याच्या ताईला घेऊन आला होता. ताईंनी सोबत जन्मपत्रिका आणल्या होत्या. मी त्यांना त्यांची समस्या सांगण्यास सांगितली असता त्या म्हणाल्या की मी मुंबई महानगर पालिकेत चांगल्या पदावर कामावर आहे, मला चांगला पगार आहे त्यामुळे तसे पैशाची चणचण नाही, आमचा प्रेम विवाह आहे, माझ्या नवऱ्याचे शिक्षण बीकॉम झालेले आहे, ते ही अकाउंटंट म्हणून एक चांगल्या कंपनीत कमला होते पण काहीतरी राजकारण झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेल्यामुळे त्यांना वैफल्य येऊन त्याचाच परिणाम म्हणून आमच्या छोट्या छोट्या कारणावरून वाद होऊ लागलेत. त्यामुळे आमचं लाईफ खूप सफर करत आहे, मला पाच वर्षाची मुलगी आहे त्यामुळे त्या भांडणामुळे तिच्याही मनावर परिणाम होत आहे. आमच्यात भांडण चालू झाले की ती रडायला लागते, घाबरते. मला हे आता सर्व असह्य होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, ह्यांना परत नोकरी लागली पाहिजे हे माझे प्रश्न आहेत. त्या ताईंनी ज्या पत्रिका सोबत आणलेल्या होत्या त्या जुन्या काळातील हस्तलिखिताच्या होत्या. आधी मी त्या ताईंची पत्रिका पहिली असता मला जरा त्यांचे नेचर दुसऱ्यावर प्रभाव टाकणारे म्हणजे डोमीनेटिंग असावे असे दिसले. जेव्हा मी त्यांच्या मिस्टरांच्या पत्रिकेची तपासणी केली असता असे दिसले की त्यांचा नवरा खूपच वैफल्य ग्रस्त झाला होता. म्हणून मी त्या ताईंना विचारले की तुमचे मिस्टर कधी कधी मी आत्महत्या करिन असे काही म्हणतात का, त्यावर त्या ताईंनी होकारात्मक मान हलवली आणि त्या म्हणाल्या की प्रत्येक भांडणाच्या वेळी मी माझ्या जीवच काही बरवाईट करून घेईन असे सारख म्हणत असतात. त्यांच्या अशा वागण्याच मला खूपच टेन्शन आलेले आहे. त्यांनी खरंच तस काही केलं तर असे म्हणून त्या रडू लागल्या. मी त्यांना धीर दिला आणि म्हटलं की ताई काळजी करू नका सर्व काही ठीक होईल. मी तुमची आणि तुमच्या मिस्टरांची पत्रिका परत मोबाईल वर काढून पाहतो कारण मला पत्रिकेतील महादशा आणि अंतर्दशा पहायच्या आहेत त्यावरून आपल्याला कळेल की अस काही घडू शकते का किंवा भविष्यात घडण्याची शक्यता आहेत का. असे म्हणून मी त्या ताईंची पत्रिका मोबाईल अँप वर काढली असता मला दिसले की त्यांच्या पत्रिकेत लग्न मोडण्याचे संकेत आहेत, पण मी त्यांना तसे काही सांगितले नाही. त्यानंतर मी त्यांच्या मिस्टरांची पत्रिका काढण्यासाठी अँप मध्ये तपशील भरला आणि पत्रिका दाखवा वर क्लीक केले परंतु पुढची स्क्रीन एरर 440 असे काहीतरी आले, आणि त्यांची पत्रिका निघालिच नाही. मी परत प्रयत्न केला पण तसच, मला वाटलं की माझ्या फोन किंवा नेटवर्क मध्ये समस्या असेल म्हणून मी त्यांना म्हटलं की तुमच्या फोन मध्ये आपण सॉफ्टवेअर टाकुन पाहूया, तसे केले तरीही सॉफ्टवेअर currupt असे आले. मी कॉम्प्युटर वर करून पाहिला तरीही तसेच झाले. शेवटी कंटाळून मी ध्यान लावले असता मला असे दिसले की त्यांच्या मिस्टरांच्या जीवाला धोका आहे, पण कधी ते कळत नव्हतं. पण आता हे ह्यांना सांगणार कसे कारण सर्वच लोकांना ध्यान इत्यादी वर विश्वास ठेवतातच असे नाही आणि डायरेक्ट मृत्यूचे भाकीत करायचे म्हणजे ते चुकलं तर परत काय ह्या द्विधा मानस्तीतीत मी त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या परत ह्या पण काळजी घ्या, स्वतःवर मनावर नियंत्रण ठेवा. उद्या आपण परत पत्रिका काढून पाहतो किंवा मग आज घरी जाऊन प्रयत्न करतो. त्यादिवशी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी मी पत्रिका काढण्याचा प्रयन्त केला असता ती पहिल्याच फटक्यात निघाली असता मी महादशा आणि गोचर तपासले असता पाहतो तर काय की खरच त्यांच्या पत्रिकेत स्ट्रॉंग मृत्यूयोग तयार झालेला होता, हे त्यांना लगेच सांगावं असे मला वाटले पण आता रात्री कॉल करणार तरी कसा, तरीही मी त्यांना कॉल केला पण त्यांनी तो उचलला नाही, रात्री एखाद्या स्त्री ला कॉल करणे हे योग्य नाही म्हणून मी माझ्या मित्राला कॉल केला तर त्याचा मोबाईल बंद होता, शेवटी नाईलाजाने मी सकाळ होण्याची वाट पाहू लागलो.(ANavghare)
दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत त्यांना कॉल केला पण त्यांनी तो उचलला नाही, म्हणून मी माझ्या मित्राला लावला पण त्यानेही तो उचलला नाही. शेवटी कंटाळून मी विचार केला की जाऊदे ह्यानाच गरज नाही तर आपण तरी का तसदी घ्यावी. म्हणून मी परत कॉल लावला नाही. काही दिवसांनी माझा मित्र मला भेटला आणि जे बोलला ते ऐकून मला ठाम विश्वास बसला की ग्रह म्हणजेच नियती आणि नियतीच्या पुढे सद्गुरुंच्या शिवाय कोणीच जाऊ शकत नाही. हे संगण्याच दुसरं पण एक कारण असे आहे की ज्या लोकांनी मला पत्रिका मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण दिलेली आहे त्यांना मी प्रार्थमिक बोलणे झाल्यावर सांगतो की मला मार्गदर्शन करायला 4 ते 5 दिवस लागतील मग आपण बोलूया, पण कधीकधी वरील प्रकारच्या कारणामुळे मला जास्त वेळ पण लागतो, कधी कधी तर 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस लागतात, कधी कधी मी पत्रिका पाहायला घेतो आणि माझे डोके दुखायला लागते, कधी वेगळीच समस्या उभी राहते, पण हे सर्व त्या जातकाना माहीत नसते, की त्यांचे काही अशुभ ग्रह त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळू नये म्हणून कार्यरत असतात आणि असे काही घडवतात त्यामुळे मग ते तगादा लावतात की गुरुजी 3 दिवस होऊन गेले, 5 दिवस होऊन गेले तुम्ही अजून काही सांगितले नाही, मग मी त्यांना क्षमायाचना करून अजून वेळ मागून घेतो, कित्येकांना मी फी परत दिलेली आहे. पण मित्रांनो हे सर्व घडते कारण शेवटी एक ज्योतिषाच्या वर, सर्वांच्या वर एक नियती काम करत असते, तीच ठरवते की कोणाला कधी किती आणि काय द्यायचे. तसेच त्या दिवशीही झाले. माझा मित्र मला म्हणाला की ज्या दिवशी आम्ही तुला भेटून गेल्यानंतर घरी बहिणीचे मिस्टर खूप चांगले वागू लागले होते, त्यांनी छोटीला त्यांच्या हाताने भरवलं, आणि रात्री साडेबाराच्या दरम्यान ते म्हणाले की मला झोप येत नाही म्हणून जरा हॉल मध्ये टीव्ही पाहत बसतो. ते इतके चांगले वागत होते की कोणाच्या मनात ही काही आले नसेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे माझ्या बहिणीने सहज पाहिले तर त्यांचा मृतदेह फॅन ला लटकला होता. पोस्ट मार्टम मध्ये समजले की मृत्यू हा पावनेबारा ते एक च्या दरम्यान झालेला होता. त्यावेळी मला खूप फील झालं की जार त्या दिवशी ती पत्रिका मोबाईल वर उघडली असती तर कदाचित हे सर्व घडलेच नसते, हे थांबवता आले असते, पण नियतीच्या मनात दुसरेच काही होते जे मला थांबवता आले नाही किंवा ज्या शक्तीने मोबाईल सारखे उपकरण पण बिघडवले होते. धन्यवाद...
अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
लेख कसा वाटला हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment