कितीही पूजा आराधना, साधना करून अनुभव का येत नाही.. (हे माझ्या सद्गुरूंचे मार्गदर्शन आहे) लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.०५.०९.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रांनो काल सकाळी आपण एक विषय घेतला होता की कित्येक लोक असे विचारतात की आम्ही इतका जपतप करतो, ध्यान धारणा करतो, पोथ्या पुराणे वाचतो तरीही आम्हाला त्याचे फळ का मिळत नाही. माझ्या सद्गुरूंनी ह्यावर सुंदर असे स्पष्टीकरण दिलेले होते ते मला तुमच्यासमोर मांडायचे आहे. असे होण्याचे करण म्हणजे, हे सर्व अशा गोष्टी करणारे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात, ते कधीही कोणाला दुखावत नाही, त्यांच्याकडून कोणासाठीही कुठला श्राप इत्यादी निघत नाही, पण आशिर्वाद मात्र निघत असतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण असे कित्येकदा तुमच्या बाबतीतही होत असेल की तुम्ही कोणाला असे सहजपणे सांगता की तुझं भल होईल, तुझं कल्याण होईल, तेव्हा नेमकं काय होतं? तर ते बोललेलं कधीही फुकट जात नाही, म्हणजे त्यावेळी तुम्ही जी रोज साधना करत असता, त्या साधनेचे पुण्य त्या माणसाला जाऊन त्या...