तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग २ "नक्षत्र" १. अश्विनी नक्षत्र...

तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा भाग २ "नक्षत्र" १. अश्विनी नक्षत्र... लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.२८.०८.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) नमस्कार मित्रानो नक्षत्र हा जन्मकुंडलीचा एक अविभाज्य भाग आहे. एकूण २७ नक्षत्र असतात. मंगल कार्य किंवा कुठल्याही शुभ कार्याच्या मुहूर्तासाठी नक्षत्रांचा आधी विचार केला जातो. पौर्णिमेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव हिंदू महिन्यांना दिलेले आहे. जसे मार्गाशीष महिन्यात चंद्र मृग नक्षत्रात असतो. ह्या नक्षत्रांच्या राशी अधिपती आहेत आणि ह्या राशींचे जे अधिपती ग्रह आहेत ते ह्या नक्षत्रांचे स्वामी ग्रह मानले जातात. ह्याप्रमाणे जातक ज्या नक्षत्रावर जन्म घेतो त्या नक्षत्राच्या स्वामी ग्रहाची महादशा त्याच्या जन्माच्या वेळी असते. अंकुश नवघरे. जसे आपल्या आयुष्यातील यश अपयश हे ग्रहांवर अवलंबून असते तसेच त्यावर नक्षत्रांचाही खूप मोठा प्रभाव असतो. जसे जातकाच्या कुंडलीतील एखादा ग्रह हा जरी चांगल्या परिस्थितीत असला तरी तो कुठल्या नक्षत्रात म्ह...